Brutal Dowry Harassment in Pune: Pregnant woman assaulted with a belt and cricket bat for ₹10 lakh; Husband booked in Loni Kalbhor.

पुण्यात माणुसकीला काळीमा! १० लाखांच्या हुंड्यासाठी गर्भवती पत्नीला बेल्ट आणि क्रिकेट बॅटने बेदम मारहाण; लोणी काळभोर पोलिसांत गुन्हा दाखल!

Brutal Dowry Harassment in Pune: Pregnant woman assaulted with a belt and cricket bat for ₹10 lakh; Husband booked in Loni Kalbhor.पुणे: हुंड्यासाठी महिलांचा होणारा छळ अद्यापही थांबण्याचे नाव घेत नाहीये. लोणी काळभोर परिसरातून समोर आलेल्या एका घटनेने संपूर्ण पुणे जिल्हा हादरला आहे. १० लाख रुपयांच्या हुंड्यासाठी एका गर्भवती महिलेला तिच्या पतीकडून अमानवीय मारहाण करण्यात आली. आरोपी पतीने पत्नीला बेल्ट आणि क्रिकेट बॅटने मारहाण करत शारीरिक व मानसिक छळ केला.

 

 

घटनेचा सविस्तर तपशील:

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नानंतर काही काळ सर्व काही व्यवस्थित सुरू असतानाच, पतीने तिला नोकरीसाठी सक्ती करण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर, माहेरून १० लाख रुपये घेऊन येण्यासाठी तिच्यावर वारंवार दबाव टाकला जाऊ लागला. मागणी पूर्ण न केल्याने त्याने तिचा छळ सुरू केला.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, ती महिला गरोदर असतानाही पतीने तिची कोणतीही दयामाया न दाखवता तिला बेल्ट आणि क्रिकेट बॅटने मारहाण केली. याशिवाय, तिच्याकडील सोन्याचे दागिने बळकावणे आणि तिच्या नावे कर्ज काढून तिचा गैरवापर करणे, असे प्रकारही आरोपीने केले आहेत. अखेर, पीडितेने हिंमत एकवटून लोणी काळभोर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी संबंधित नराधम पतीवर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.



महाराष्ट्र

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *