Gadchiroli | गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल…

गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागात मोठ्या प्रमाणावर लाल मिरचीचे पीक घेतले जाते. तब्बल चार वर्षांनंतर यंदा या मिरचीला बाजारात चांगली मागणी मिळत असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी मिरचीचे दर लक्षणीय वाढले आहेत. सध्या बाजारात लाल मिरचीला प्रतिक्विंटल 20 हजार रुपयांपेक्षा अधिक दर मिळत असून, मार्च महिन्याच्या अखेरीस हा दर 25 हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत.

मिरचीचे पीक घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मेहनत आणि खर्च करावा लागतो. हवामानातील बदल, कीडरोग आणि बाजारातील चढ-उतार यांचा सामना करत शेतकरी हे पीक घेतात. मात्र यंदाच्या वाढलेल्या दरामुळे उत्पादन खर्च भरून निघण्यास मदत होणार असून चांगला नफा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरवाढीमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *