मुंबई: आषाढी एकादशी यात्रेनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या लाखो विठ्ठलभक्तांच्या आणि वारकऱ्यांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) यंदाही पूर्ण ताकदीने सज्ज झाले आहे. भाविकांचा प्रवास सुरक्षित, सुलभ आणि सुखकर व्हावा या उद्देशाने एसटी महामंडळाने राज्यभरातून तब्बल ५ हजार ५०० विशेष बसेस सोडण्याचे भव्य नियोजन केले आहे. या संदर्भातील महत्त्वाची माहिती राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
गावातून थेट पंढरपूर बससेवा आणि विशेष सवलती
मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केले की, राज्यातील कोणत्याही गावातून जर ४० किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित मागणी केली, तर थेट त्या गावातून पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाईल. वारकऱ्यांनी यासाठी आपल्या जवळच्या एसटी आगाराशी (Depot) संपर्क साधून नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या विशेष बस फेऱ्यांमध्येही शासनाच्या सर्व प्रवासी सवलती नेहमीप्रमाणे लागू राहतील:
-
७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक: 'अमृत ज्येष्ठ नागरिक योजना' अंतर्गत पूर्णपणे मोफत प्रवास.
-
महिला प्रवाशी: 'महिला सन्मान योजना' अंतर्गत तिकीट दरात ५० टक्के विशेष सवलत.
चार तात्पुरती बस स्थानके आणि कडक नियोजन
आषाढी वारीदरम्यान पंढरपूर येथे होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाने शहरात चार तात्पुरती बस स्थानके उभारण्याचा निर्णय घेतला आहे:
१. चंद्रभागा बस स्थानक
२. भीमा बस स्थानक (देगाव)
३. विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक
४. पांडुरंग बस स्थानक (आयटीआय महाविद्यालय)
या तात्पुरत्या स्थानकांवर पिण्याचे शुद्ध पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष आणि मार्गदर्शन फलक अशा सर्व आवश्यक सुविधा पुरवल्या जाणार आहेत. तसेच, एकादशीच्या दिवशी परतीच्या प्रवासाची कोंडी टाळण्यासाठी ३६ हून अधिक वाहतूक नियंत्रक आणि सुरक्षा रक्षक स्थानिक पोलिसांच्या समन्वयाने वाहतूक व्यवस्था सांभाळणार आहेत.
कर्मचाऱ्यांसाठी मोफत भोजनाची व्यवस्था
"वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा" या भावनेने अहोरात्र रात्रंदिवस कर्तव्य बजावणारे चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी आणि पर्यवेक्षक अशा सुमारे १३ हजार कर्मचाऱ्यांसाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतःच्या खर्चाने चहा, नाश्ता आणि भोजनाची उत्तम व्यवस्था केली आहे. मागील वर्षी एसटीने ५,२०० बसेसद्वारे २१ लाख ९५ हजार भाविकांना सेवा दिली होती, यंदा ५,५०० बसेससह हे नियोजन अधिक सक्षम करण्यात आले आहे.
सविस्तर वाचा, लिंक कमेंट मध्ये https://punenews24.in/
शहर
- नाशिक: मालेगावची वाहतूक कोंडी फुटणार! पोलिसांच्या मदतीसाठी महापालिकेचे १५ 'वाहतूक वॉर्डन' रस्त्यावर तैनात
- नवी मुंबई: पनवेल महापालिकेत पुन्हा 'अतिक्रमण हटाव'चा ४७ कोटींचा प्रस्ताव महासभेपुढे; खर्चावरून चर्चांना उधाण
- पुणे: लोहगावात ५५ कोटींची भव्य वास्तू उभी, पण उपचारासाठी रुग्णांच्या वाट्याला केवळ 'रेफर टू ससून'!
- पुणे: राजकीय हस्तक्षेप खपवून घेणार नाही! स्वच्छता कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या राजकीय दबावावर पुणे महापालिका आयुक्तांचा कडक इशारा!
महाराष्ट्र
- कोल्हापूर: ऊस दराचा तिढा सुटणार का? स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे रविवारी कोल्हापूर जिल्ह्यात भव्य रॅली; राजू शेट्टींचा इशारा
- चंद्रपूर: तहसीलदारांना पुलाखाली फेकण्याची धमकी देणाऱ्या आमदार बच्चू कडूंसह ६ जणांवर गुन्हा दाखल
- नवी मुंबई: पनवेल महापालिकेत पुन्हा 'अतिक्रमण हटाव'चा ४७ कोटींचा प्रस्ताव महासभेपुढे; खर्चावरून चर्चांना उधाण
- सिंधुदुर्ग: बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांपासून उद्धव ठाकरे पूर्णपणे दूर गेलेत कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांचा ठाकरेंवर घणाघात
गुन्हा
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: नागरिकांना मोठा दिलासा जमीन आणि वनाशी संबंधित सर्व समस्या तातडीने सोडवणार, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची ग्वाही!
- दिल्ली: बॉन्ड तोडण्याचं आणि रेजीम चेंजचे नारे देण्याचं कारण काय? जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान दिल्ली हायकोर्टाने सीजेपी नेत्यांना चांगलेच धारेवर धरले!
- नवी दिल्ली: राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ जगन मोहन रेड्डींनी निवडणूक आयुक्त निवडीच्या प्रक्रियेवर उठवले प्रश्न; जुन्या निर्णयावर व्यक्त केला पश्चात्ताप!
- नवी दिल्ली: अभिजित दिपकेंना कोर्टाकडून मोठा दिलासा! तिरंगा मोर्चादरम्यान अटकेप्रकरणी जामीन मंजूर, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच होणार सुटका!




























Subscribe to my channel




