सय्यद अता हसनैन यांचा कॉलम:युद्धात भूभागावर ताब्याचे महत्त्व‎ आता पूर्वीसारखे राहिले नाही‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎युद्धांचे स्वरूप बदलत आहे. भूभागावरील नियंत्रण‎आजही महत्त्वाचे आहे, मात्र एखाद्या प्रदेशावर दीर्घकाळ‎कब्जा ठेवण्यापेक्षा आपली पोहोच, दबाव आणि प्रभाव‎यांच्या माध्यमातून अपेक्षित रणनीतिक उद्दिष्टे साध्य‎करण्याला देश अधिक प्राधान्य देत आहेत. इतिहासात‎मात्र लष्करी विजयाचा थेट अर्थ संबंधित भूभागावर ताबा‎मिळवणे असा होता. सैन्ये प्रदेश जिंकत, राजधानींवर‎नियंत्रण मिळवत आणि त्याद्वारे राजकीय परिणाम‎थोपवत. रोमन साम्राज्याच्या संघर्षांपासून ते जागतिक‎महायुद्धांपर्यंत भूभाग हेच लक्ष्य, विजयाचे प्रमुख‎मोजमाप होते. यामागील तर्कही सरळ होता—एखाद्या‎राष्ट्रावर किंवा जनतेवर वर्चस्व प्रस्थापित करायचे‎असेल तर त्याची भूमी, संसाधने आणि संस्थांवर‎नियंत्रण आवश्यक असते. भौगोलिक अंतर ही एक ‎‎रणनीतिक अडचण मानली जात होती, कारण अंतर‎वाढले की लष्करी शक्तीचा प्रभाव कमी होत जात असे.‎ मात्र आजच्या संघर्षांमध्ये अनेक देश भूभागावर प्रत्यक्ष‎ताबा न मिळवता रणनीतिक उद्दिष्टे साध्य करण्याचा‎प्रयत्न करत आहेत. लांब पल्ल्याचे अचूक हल्ले, ड्रोन, ‎‎सायबर कारवाया, आर्थिक दबाव, माहितीविषयक‎मोहिमा यांच्या माध्यमातून प्रतिस्पर्ध्यावर प्रभाव‎टाकण्याचा प्रयत्न होतो . दीर्घकालीन वर्चस्वाच्या‎जबाबदाऱ्यांना झटकता येते . उद्दिष्टे तीच असली तरी ती‎साध्य करण्याच्या पद्धती बदलल्या. यामागे भूभागावर‎कब्जा टिकवण्याच्या आर्थिक फायद्या-तोट्यांचाही‎विचार आहे. अफगाणिस्तानातील सोव्हिएत संघाचा‎अनुभव तसेच इराक, अफगाणिस्तानातील अमेरिकेचा‎अनुभव हे दाखवून देतात की, लष्करी वर्चस्व आपोआप‎टिकाऊ राजकीय नियंत्रणात रूपांतरित होत नाही.‎आधुनिक सैन्ये एखादा प्रदेश वेगाने ताब्यात घेऊ‎शकतात, परंतु तीव्र प्रतिकाराच्या परिस्थितीत त्या भागाचे‎प्रशासन चालवणे अधिक कठीण ठरते.‎ आज एखाद्या प्रदेशावर कब्जा मिळवणे म्हणजे‎आंतरराष्ट्रीय देखरेख, सातत्यपूर्ण प्रसारमाध्यमांचे लक्ष‎व दीर्घकालीन प्रतिकार यांना आमंत्रण देणे होय. त्याची‎आर्थिक व राजकीय किंमत मोठी असते. त्यामुळे‎लष्करी यश हे एखाद्या मोहिमेचा शेवट न ठरता मोठ्या‎रणनीतिक ओझ्याची सुरुवात ठरू शकते. एकविसाव्या‎शतकातील संघर्षांनी वारंवार दाखवून दिले आहे की,‎एखादा भूभाग ताब्यात घेणे आणि त्यातून अपेक्षित‎परिणामांवर नियंत्रण ठेवणे या आता वेगळ्या गोष्टी‎बनल्या आहेत. तंत्रज्ञानामुळे दूरवरच्या प्रदेशांपर्यंत प्रभाव‎टाकण्याची क्षमता लक्षणीयरीत्या वाढली आहे. अचूक‎लक्ष्यभेदी शस्त्रास्त्रे, लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे, ड्रोन,‎सायबर क्षमता, उपग्रह निरीक्षण व्यवस्था आणि कृत्रिम‎बुद्धिमत्ता यांच्या मदतीने देशांना अशा संधी उपलब्ध‎झाल्या की, आपल्या सीमांपासून हजारो किलोमीटर दूर‎मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात न करताही ते घटनांवर‎प्रभाव टाकू शकतात.‎ युक्रेनमधील युद्ध अचूक व तीव्र हल्ल्यांचे महत्त्व‎अधोरेखित करते. दोन्ही बाजू आघाडीपासून शेकडो‎किलोमीटर दूर असलेल्या लष्करी, औद्योगिक आणि‎ऊर्जा पायाभूत सुविधांना लक्ष्य करत आहेत.‎रणांगणावरील कौशल्याचे प्रदर्शन करण्यापेक्षा ते‎आपल्या दूरवर पोहोचण्याच्या क्षमतेद्वारे रणनीतिक‎परिणाम साध्य करण्याचा प्रयत्न करत आहेत.‎इस्रायल-इराण संघर्षातही तीव्र लष्करी चकमकी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎असूनही कोणताही पक्ष प्रत्यक्ष भूभाग ताब्यात घेण्याचा‎प्रयत्न करताना दिसलेला नाही. हा संघर्ष प्रतिरोधक‎क्षमता, रणनीतिक प्रभाव निर्माण करणे आणि दूरवरून‎हानी पोहोचवण्याच्या क्षमतेभोवती फिरताना दिसतो.‎परदेशी भूभागावर सैन्य तैनात करणे आणि ते दीर्घकाळ‎टिकवून ठेवणे हा युद्धाचा अत्यंत खर्चिक,‎राजकीयदृष्ट्या संवेदनशील आणि लष्करीदृष्ट्या‎धोकादायक प्रकार ठरला आहे. अशा मोहिमांसाठी‎मोठ्या प्रमाणात रसद व्यवस्था आणि दीर्घकालीन‎राजकीय बांधिलकी आवश्यक असते. तुलनेने लहान‎आणि कमकुवत प्रतिस्पर्ध्यांनाही ही वस्तुस्थिती माहीत‎असते.प्रतिस्पर्ध्याच्या हालचाली अधिक प्रभावीपणे पाहू,‎ऐकू आणि समजू शकतो, तो पक्ष मोठ्या प्रमाणावर‎सैनिकांचे जीव धोक्यात न घालता महत्त्वाची आघाडी‎मिळवू शकतो. गुप्तचर माहिती, देखरेख व्यवस्था व‎अचूक लक्ष्यभेदी हल्ले ही साधने आता अनेक बाबतीत‎जमिनीवरील प्रत्यक्ष लष्करी उपस्थितीइतकीच प्रभावी‎ठरत आहेत. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)‎ आज एखाद्या प्रदेशावर ताबा‎मिळवण्याचा अर्थ म्हणजे सततची‎देखरेख आणि दीर्घकालीन प्रतिकाराला‎सामोरे जाणे. त्याची किंमत खूप मोठी‎असते. अशा परिस्थितीत लष्करी यश हे‎मोहिमेचा शेवट नसून मोठ्या रणनीतिक‎ओझ्याची सुरुवात ठरू शकते.‎

This post was originally published on this site.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *