India vs Namibia : दिल्लीतील खेळपट्टी कोणाला मदत करणार? फलंदाज की गोलंदाज! जाणून घ्याImage Credit source: BCCI Twitter
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील 18वा सामना भारत आणि नामिबिया या संघात होणार आहे. भारताचा हा दुसरा आणि नामिबियाचा पहिलाच सामना आहे. हा सामना 12 फेब्रुवारीला दिल्लीच्या अरूण जेटली मैदानात होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाने कसून सराव केला आहे. टीम इंडियाला दुखापतीचं ग्रहण लागलं असलं तरी टीम इंडियाची बाजू नामिबियाच्या तुलनेत भक्कम आहे. त्यामुळे या सामन्यात भारताचं पारडं जड आहे. असं असलं तरी नाणेफेकीचा कौल हा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. कारण हा सामना संध्याकाळी 7 वाजता आहे. त्यामुळे दुसऱ्या डावात दव फॅक्टर महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकल्यावर प्रथम गोलंदाजी घेणं दोन्ही संघ पसंत करतील. त्यात ही खेळपट्टी कोणाला मदत करेल? असाही प्रश्न आहे. चला जाणून घेऊयात सविस्तर
खेळपट्टी कोणाला मदत करणार?
अरूण जेटली स्टेडियममधील खेळपट्टी फलंदाजांना पुरक आहे. त्यामुळे या स्पर्धेत मोठी धावसंख्या पाहायला मिळेल. या खेळपट्टीवर आरामात धावसंख्येचा पाठलाग करता येईल. कारण चेंडूला उसळी मिळते आणि आरामात बॅटवर येतो. त्यामुळे फलंदाजांना फटकेबाजी करण्यासाठी सोपं जाईल. फिरकी गोलंदाजांच्या तुलनेत वेगवान गोलंदाजांना थोडी फार मदत होऊ शकते. पण फलंदाजांना अधिक फायदेशीर असणार आहे. एक्युवेदरच्या रिपोर्टनुसार, सामन्याच्या दिवशी तापमान 22 ते 16 अंश सेल्सिअस असू शकते. दव पडणार हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे दुसऱ्या डावात गोलंदाजी करणं थोडं कठीण जाईल.
भारत नामिबिया सामन्यात कोण वरचढ?
भारत आणि नामिबिया यांच्यात द्विपक्षीय मालिका वगैरे होत नाहीत. त्यामुळे आयसीसी स्पर्धेतच भिडण्याची शक्यता आहे. आतापर्यंत दोन्ही संघ एकदाच आमनेसामने आले आहेत. हा सामना भारताने जिंकला आहे. टी20 वर्ल्डकप 2020 मध्ये हे दोन्ही संघ भिडले होते. या सामन्यात नामिबियाने प्रथम फलंदाजी करताना 8 गडी गमवून 132 धावा केल्या होत्या. तर भारताने हे आव्हान 15.2 षटकात पूर्ण केलं होतं. आता जवळपास पाच वर्षांनी हे दोन संघ भिडणार आहे. असं असलं तरी भारत हा सामना सहज जिंकेल अशी स्थिती आहे.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!


























Subscribe to my channel

