अभिषेक शर्माला रुग्णालयातून डिस्चार्ज, क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढली! आता पुढे काय?Image Credit source: PTI
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत टीम इंडियाने विजयाने सुरूवात केली. पहिल्याच सामन्यात भारताने अमेरिकेला पराभूत केलं. या सामनयात अभिषेक शर्माकडून फार अपेक्षा होत्या. मात्र पहिल्याच सामन्यात त्याला खातंही खोलता आलं नाही. पण त्याची तब्येत बिघडल्याने क्रीडाप्रेमीची धाकधूक वाढली आहे. कारण स्पर्धा नुकतीच सुरू झाली आहे. त्यात अभिषेक शर्मासारखा बुरूज ढासळणं टीम इंडियासाठी चांगली गोष्ट नाही. अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना त्याला अस्वस्थ वाटू लागलं. पोटात गडबड जाणवत असल्याने त्याने मैदान सोडलं. त्यानंतर मैदानात क्षेत्ररक्षणासाठी उतरलाच नाही. त्यानंतर त्याला थेट रूग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. त्यामुळे लवकर बरा होईल ना अशी चिंता क्रीडाप्रेमींना लागून होती. आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. अभिषेक शर्माला रुग्णालयातून डिस्चार्ज दिला गेला आहे.
अभिषेक शर्माला डिस्चार्ज दिला असला तरी दुसऱ्या सामन्यात खेळेल की नाही हे स्पष्ट नाही. नामिबियाविरुद्ध भारताचा दुसरा सामना आहे. या सामन्यानंतर भारताचा सुपर 8 फेरीचा मार्ग खुला होणार आहे. त्यामुळे या सामन्यात काहीही करून मोठा विजय अपेक्षित आहे. टीम इंडियाचा फलंदाज तिलक वर्माने एका पत्रकार परिषदेत स्पष्ट सांगितलं की, ‘जेव्हा आम्ही दिल्लीला आलो तेव्हा तपासणीसाठी रूग्णालयात दाखल केलं होतं. आता त्याला डिस्चार्ज दिला आहे. आशा आहे की तो या सामन्यासाठी फीट होईल. अजून आमच्याकडे एक दिवस आहे. यावर उद्या काय तो निर्णय घेतला जाईल.’
अभिषेक शर्मा रिकव्हर झाला नाही तर या सामन्यात संजू सॅमसनचं नशिब उघडू शकतं. कारण त्याची जागा संजू सॅमसनला मिळू शकते. इशान किशन सोबत सलामीला उतरेल. संजू सॅमसनची सध्या प्लेइंग 11 मध्ये जागा होत नाही. इशान किशनचा फॉर्म पाहता त्याला बेंचवर बसण्याची वेळ आली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत निराशाजनक कामगिरीमुळे त्याचा प्लेइंग 11 मधून पत्ता कट झाला आहे. पण पुन्हा त्याच्या चाहत्यांचा आशा पल्लवित झाल्या आहेत. जर त्याला संधी मिळाली आणि मोठी धावसंख्या करण्यात यशस्वी ठरला, तर त्याला पुढे संधी मिळण्याची शक्यता वाढेल.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

