
Pankaja Munde : मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या ऊसतोड मजूर संघटनांच्या मागण्यांसाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे रस्त्यावर उत्तरणार आहे. पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या ऊसतोड मजूर संघटना 6 जानेवारीला आंदोलन करणार आहेत. ऊसतोड मजुरांच्या आणि मुकादमांच्या मागण्यांसाठी हे आंदोलन केले जाणार असून, स्वतः पंकजा मुंडे या देखील या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पाच उसतोड मजूर संघटना या 5 जानेवारीनंतर आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी रस्त्यावर उतरणार आहेत. या आंदोलनामध्ये स्वतः पंकजा मुंडे यादेखील सहभागी होणार आहेत. मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्रातला एकही साखर कारखाना चालू देणार नाही असा इशारा ऊसतोड मजुरांच्या संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. याच संदर्भात पंकजा मुंडे यांच्यासोबत सर्व संघटनांनी चर्चा केली आहे. त्यानंतर आज ऊसतोड मजूर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बीडमध्ये पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
|
|
'या' आहेत मागण्या...
- ऊस तोडणीसाठी मजुरांना देण्यात येणाऱ्या दरात दुप्पट वाढ करण्यात यावी.
- मुकादमांना 19 टक्के ऐवजी 35 टक्के कमिशन देण्यात यावे.
- त्याचबरोबर ट्रॅक्टर आणि ट्रकमधून होणाऱ्या वाहतुकीच्या दरामध्ये देखील वाढ करण्यात यावी
- ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी प्रत्येक तालुक्यात शाळा आणि वस्तीग्रह उभारण्यात यावेत.
आंदोलन काळात सर्व कारखाने बंद करण्यात येतील
आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यात यावेत यासाठी अनेक दिवसांपासून ऊसतोड मजूर आणि मुकादम संघटनांकडून वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत आहे. दरम्यान, याचवेळी या संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. शेवटी पंकजा मुंडे यांनी मध्यस्थी केल्यानंतर आता 5 जानेवारीपर्यंतची साखर संघाला मुदत देण्यात आली आहे. मात्र, 5 जानेवारीपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास 6 जानेवारीला पंकजा मुंडे या आपल्या संघटनांसह रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे. या काळात सर्व कारखाने बंद करण्यात येतील असेही सांगण्यात आले आहेत.
अन्यथा राज्यात कोयता बंद राहील
यापूर्वी 25 डिसेंबरचा साखर संघाला अल्टिमेटम देण्यात आला होता. मात्र, पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस यांची साखर संघाशी चर्चा झाली आणि त्यांनी 5 जानेवारीपर्यंत वेळ वाढवून मागीतीली. त्यामुळे आता साखर संघाला 5 जानेवारीपर्यंत वेळ देण्यात आला आहे. मात्र, तरीही निर्णय न झाल्यास आम्ही 5 जानेवारीनंतर पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्यासह रस्त्यावर उतरून ऊसतोड मजूर संघटना आंदोलन करणार आहे. यावेळी राज्यात कोयता बंद राहील. मशीनने ऊस तोडणी केल्यास जादा दर दिला जात आहे, मात्र, आमच्या ऊस तोड कामगारांना योग्य दर दिला जात नाही. त्यामुळे आमच्या मजुरांची खूप पिळवणूक सुरु आहे. मागील तीन वर्षांपासून आमच्या मागण्या प्रलंबित असून, मागीच चार महिन्यापासून सतत पाठपुरावा केला जात आहे. मात्र, साखर संघ आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने आता आम्ही आंदोलनाची भूमिका घेतली असल्याची माहिती, ऊसतोड मजूर संघटना अध्यक्ष सुखदेव सानप यांनी दिली आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



