valentine’s day special : व्हॅलेंटाईन वीक म्हटलं की अनेकदा आनंदी शेवट, गोड प्रेमकथा आणि रोमँटिक दृश्यांचीच अपेक्षा असते. पण जर तुम्हाला याच आठवड्यात काही वेगळं, हृदय पिळवटून टाकणारं आणि प्रेमाच्या वेड्या टोकापर्यंत घेऊन जाणारं काही बघायचं असेल तर 2 तास 20 मिनिटांची ‘रांझणा’ हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. आनंद एल. राय यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा चित्रपट आजही भारतीय सिनेमातील सर्वात प्रभावी आणि वेदनादायी प्रेमकथांपैकी एक मानला जातो.
ही कथा सुरू होते बनारसच्या अरुंद गल्ल्यांमधून जिथे ब्राह्मण मुलगा कुंदन (धनुष) लहानपणापासूनच मुस्लिम मुलगी जोया (सोनम कपूर) हिच्यावर जीवापाड प्रेम करत असतो. कुंदनचं प्रेम साधं नाही तर ते वेडाच्या सीमेला स्पर्श करणारं आहे. जोयासाठी तो मार खातो, मनगट कापतो आणि एक आशिक जे काही वेडेपण करू शकतो ते सगळं करतो. त्याच्यासाठी प्रेम म्हणजे त्याचं संपूर्ण आयुष्य असतं.
मात्र कथा तेव्हा वळण घेते जेव्हा जोया पुढील शिक्षणासाठी दिल्लीतील जेएनयूमध्ये जाते. तिथे तिच्या आयुष्यात अकरम उर्फ अभिमन्यु (अभय देओल) येतो आणि ती त्याच्या प्रेमात पडते. अनेक वर्षे जोयाची वाट पाहणाऱ्या कुंदनसाठी ही गोष्ट स्वीकारणं अशक्य ठरतं. इथूनच सुरू होते प्रेम, फसवणूक, राजकारण, अपराधी भावना आणि गुंतागुंतीचा प्रवास जो संपूर्ण चित्रपटाला वेगळ्याच दिशेने घेऊन जातो.
प्रेक्षकांना अस्वस्थ करून टाकणारी कथा
‘रांझणा’ हा धनुषचा बॉलिवूडमधील पहिला चित्रपट ठरला आणि या सिनेमातून त्याने आपल्या निरागसतेने आणि जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. कुंदनच्या भूमिकेत त्याने असा प्रेमवेडा साकारला आहे ज्याच्यावर कधी राग येतो तर कधी त्याच्यासाठी डोळे भरून येतात. त्याचा त्रास, त्याचं प्रेम आणि त्याचं अपयश प्रेक्षकांना अस्वस्थ करून जातं.
या चित्रपटातील ‘तुम तक’ पासून ते ‘रांझणा’ या टायटल ट्रॅकपर्यंत प्रत्येक गाणं आजही लोकांच्या मनात घर करून आहे. हा चित्रपट स्पष्टपणे सांगतो की प्रेम नेहमीच सुंदर आणि सुखद असतंच असं नाही तर कधी कधी ते अत्यंत वेदनादायकही ठरू शकतं. चित्रपटाचा शेवट हा असा टप्पा आहे जिथे प्रेक्षक आपल्या भावना आवरू शकत नाहीत. म्हणूनच या व्हॅलेंटाईन वीकमध्ये जर तुम्हाला फक्त गुलाबी स्वप्नांपलीकडचं वास्तवाच्या वेदनेला भिडणारं प्रेम पाहायचं असेल तर ‘रांझणा’ हा चित्रपट नक्की पाहा.
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर


























Subscribe to my channel




