Raids Across 7 Districts in Chhatrapati Sambhajinagar; 2.47 Crore Worth of Adulterated Goods Seized

छत्रपती संभाजीनगर: विभागातील ७ जिल्ह्यांत एकाच वेळी छापेमारी; २.४७ कोटींचा भेसळयुक्त साठा जप्त.

Raids Across 7 Districts in Chhatrapati Sambhajinagar; 2.47 Crore Worth of Adulterated Goods Seized 
छत्रपती संभाजीनगर: अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाने भेसळखोर आणि गुटखा तस्करांविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे छत्रपती संभाजीनगर विभागातील ७ जिल्ह्यांमध्ये १ जून ते ९ जून २०२६ या नऊ दिवसांच्या कालावधीत एफडीएने धडक मोहीम राबवून मोठी कारवाई केली आहे

कारवाईचा तपशील: एकाच वेळी धाडी: या नऊ दिवसांत विभागातील २७ विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले

जप्त माल: कारवाईमध्ये २ कोटी ४७ लाख ७५ हजार रुपयांचा प्रतिबंधित आणि संशयित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे

कायदेशीर कारवाई: एफडीएने केवळ माल जप्त न करता कायदेशीर बडगाही उगारला आहे. या मोहिमेत एकूण ९ एफआयआर (FIR) दाखल करण्यात आले असून ९ जणांना अटक करण्यात आली आहे

 

प्रशासनाचा इशारा:आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले आहे की, "जनतेच्या आरोग्याशी खेळ अजिबात खपवून घेतला जाणार नाही. नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित अन्न मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे" 'सुरक्षित अन्न, सुरक्षित औषध, सुरक्षित महाराष्ट्र' (Safe Food, Safe Drugs, Safe Maharashtra) हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *