नवी दिल्ली : भारताने शांततेच्या काळात प्रथमच १२ अण्वस्त्रे सक्रिय पद्धतीने तैनात केली आहेत. गेल्या वर्षी ही संख्या शून्य होती. या घडामोडींमुळे भारताच्या अण्वस्त्र धोरणात महत्त्वपूर्ण बदल झाल्याचे संकेत मिळाले आहेत, असा निष्कर्ष स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (सिप्री) पाहणीतून काढण्यात आला आहे.
शांततेच्या काळात बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांसारख्या प्रक्षेपण यंत्रणांपासून अण्वस्त्रे वेगळे ठेवण्याची भारताची दीर्घकालीन पद्धत आता बदलली असल्याचे त्यातून दिसून येते.
कोणाकडे किती अण्वस्त्रे? (जानेवारी २०२६ ची आकडेवारी):
| देश | तैनात अण्वस्त्रे (२०२६) | एकूण अण्वस्त्रे (२०२६) | एकूण अण्वस्त्रे (२०२५) |
| अमेरिका | १,७७० | ५,१७७ | ५,०४२ |
| रशिया | १,७९६ | ५,४५९ | ५,४२० |
| चीन | ३४ | ६०० | ६२० |
| फ्रान्स | २८० | २९० | ३७० |
| ब्रिटन | १२० | २२५ | २२५ |
| भारत | १२ | १९० | १८० |
| पाकिस्तान | – | १७० | १७० |
| इस्रायल | – | ९० | ९० |
| उत्तर कोरिया | – | ५० | ६० |
| एकूण | ४,०१२ | १२,२४१ | १२,१८७ |
चीन सर्वाधिक वेगाने वाढवतोय अण्वस्त्र साठा:
सिप्रीने म्हटले आहे की, चीनपर्यंत सहज पोहोचू शकणाऱ्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्र प्रणाली विकसित करण्यावर सध्या भारताने प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले आहे. भारताने इतिहासात पहिल्यांदाच १२ अण्वस्त्रे पूर्णपणे तैनात केली आहेत, तर दुसरीकडे चीनकडे सध्या ६२० अण्वस्त्रे असून त्यापैकी ३४ तैनात आहेत. चीनच्या तैनात अण्वस्त्रांची संख्या २०२५ मध्ये २४ होती. चीन जगात इतर कोणत्याही देशापेक्षा वेगाने आपला अण्वस्त्र साठा वाढवत आहे.
शेजाऱ्यांना धडकी भरेल अशी अस्त्रे:
भारताकडे आता एकूण १९० अण्वस्त्रे आहेत. वर्षभरापूर्वी (२०२५ मध्ये) ही संख्या १८० इतकी होती. म्हणजेच भारताच्या ताफ्यात १० नव्या अण्वस्त्रांची भर पडली आहे. त्यापैकी १२ अण्वस्त्रे थेट तैनात करण्यात आली आहेत. भारताच्या अण्वस्त्र साठ्याचा काही भाग अशा प्रकारे 'सक्रिय पद्धतीने तैनात' असल्याचे निरीक्षण या जागतिक संस्थेने प्रथमच नोंदविले आहे. ताज्या आकडेवारीनुसार जानेवारी २०२६ पर्यंत भारताकडे १२ तैनात आणि १७८ साठवून ठेवलेली अशी एकूण १९० अण्वस्त्रे आहेत.
भारताने ऑगस्ट २०२४ पासून अणुऊर्जेवर चालणाऱ्या दोन महत्त्वपूर्ण बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुड्या—'आयएनएस अरिघात' (INS Arighat) आणि 'आयएनएस अरिदमन' (INS Aridaman)—कार्यान्वित केल्या आहेत. या दोन्ही पाणबुड्या अण्वस्त्रसज्ज बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे वाहून नेण्यास आणि समुद्रातून मारा करण्यास पूर्णपणे सक्षम आहेत, ज्यामुळे भारताची ताकद प्रचंड वाढली आहे.
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!


























Subscribe to my channel



