वर्धा जिल्ह्यातील सिंदी (रेल्वे) स्थानकावर रविवारी (७ जून) सकाळी एका २५ ते ३० वर्षीय मनोरुग्ण तरुणाने प्रचंड हैदोस घातला. या तरुणाने केवळ प्रवाशांवरच जीवघेणा हल्ला केला नाही, तर रेल्वे स्थानकावरून जाणाऱ्या हाय-स्पीड 'पुणे-अजनी वंदे भारत एक्सप्रेस' आणि 'दक्षिण एक्सप्रेस'वर जोरदार दगडफेक केली. या घटनेमुळे रेल्वे स्थानक परिसर आणि प्रवाशांमध्ये कमालीची दहशत आणि घबराट निर्माण झाली होती.
शौचालयातून बाहेर पडला आणि हल्ला चढवला:
-
काचेच्या तुकड्याने वार: प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी दक्षिण एक्सप्रेस नागपूरच्या दिशेने येत असताना हा तरुण गाडीच्या शौचालयात जाऊन बसला होता. बराच वेळ तो बाहेर न आल्याने प्रवाशांनी दार ठोठावले. सकाळी १० ते १०.३० च्या सुमारास गाडी सिंदी स्थानकावर थांबली तेव्हा तो बाहेर आला. त्याने आधीच शौचालयाच्या व्हेंटिलेटरची काच तोडून त्याचा धारदार तुकडा हातात ठेवला होता. बाहेर वाट पाहणाऱ्या प्रवाशांनी त्याला रागावताच, त्याने हातातील काचेच्या तुकड्याने त्यांच्यावर हल्ला केला, ज्यामध्ये दोन प्रवासी जबर जखमी झाले.
-
वंदे भारतवर दगडफेक: प्रवाशांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता तो डब्यातून खाली उतरला आणि रुळांवरील दगड उचलून फलाटावर उभ्या असलेल्या दक्षिण एक्सप्रेसवर आणि त्याच वेळी तिथून जाणाऱ्या पुणे-अजनी वंदे भारत एक्सप्रेसवर फेकू लागला.
-
RPF जवानालाही केले जखमी: या मनोरुग्णाला आवरण्यासाठी धावलेल्या रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) एका जवानावरही त्याने हल्ला करून त्याला जखमी केले.
प्रवाशांनी केली धुलाई, पोलिसांकडून अटक:
या गोंधळानंतर रेल्वे सुरक्षा दल (RPF) आणि गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस (GRP) चा ताफा तात्काळ घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी त्याला जेरबंद करताच, संतापलेल्या प्रवाशांनीही त्याची चांगलीच धुलाई केली.
तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण मूळचा बिहारचा रहिवासी आहे. नागपूरच्या मेयो रुग्णालयात प्राथमिक तपासणी केली असता तो पूर्णपणे मनोरुग्ण असल्याचे निष्पन्न झाले, ज्यामुळे त्याची रवानगी नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात करण्यात आली आहे. या प्रकरणी रेल्वे कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून वर्धा आरपीएफचे निरीक्षक छेदीलाल कनोजिया आणि नागपूरचे निरीक्षक सत्येंद्र यादव या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
शहर
- पुणे: संसाराचा गाडा हाकतानाच आता रिक्षाचे स्टेअरिंगही हाती! शीतल मोळवडेंच्या जिद्दीला सलाम, महिलांसाठी ठरल्या प्रेरणास्थान
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- पुणे: मानवतेला काळिमा फागणारी घटना; ३ वर्षांच्या 'डॅनी' श्वानाला बेल्टने बेदम मारहाण करत भिंतीवर आपटले, नराधम मालक परदेशीविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: कोट्यवधी रुपये 'सांडपाण्यात'! दर्जाहीन मलवाहिन्या आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे मुळा-मुठा नदीची बिकट अवस्था
महाराष्ट्र
- कोल्हापूर: संकश्र्वरजवळ भीषण अपघात! तिरुपती दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारचा मालवाहू ट्रकला मागून जोरदार धडक; नाशिकमधील तरुणाचा जागीच मृत्यू
- अमरावती: समृद्धी महामार्गावर भीषण थरार! धामणगाव रेल्वे परिसरात टायर फुटल्याने ट्रकला अचानक लागली भीषण आग; चालकाचा जिवंत जळून मृत्यू, तर दुसऱ्याचा पुलावरून खाली पडून अंत
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
गुन्हा
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
- सिंधुदुर्ग: कणकवलीत महिला पोलिस हवालदार स्मिता माने यांचा जंगलात संशयास्पद मृत्यू ; नातेवाईकांच्या गंभीर आरोपानंतर पोलिस पती सचिन माने अखेर अटकेत!
- बीड: अहिल्यानगर महामार्गावरील कासार ओढ्यात आढळला निर्वस्त्र व दाढी वाढलेल्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; आष्टी परिसरात उडाली खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: एकाला मंत्री बनवलं, दुसऱ्याला पद्मविभूषण दिलं… मुख्य निवडणूक आयुक्तांच्या वादावरून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा काँग्रेसवर आणि राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
- नवी दिल्ली: पोलिसांना मोठा चकवा! CJP चे नेते अजिंक्य शिंदे, सौरभ दास आणि आशुतोष रांका थेट जंतरमंतरवर; पोलिसांची धावाधाव, पुन्हा घेतले ताब्यात!
- नवी दिल्ली: सुटकेनंतर ध्रुव राठीचा धक्कादायक खुलासा ;पोलिसांनी माफी मागितली, सर्व इच्छा पूर्ण केल्या, पण ते डिटेंशन नव्हे तर अपहरण होतं!
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!


























Subscribe to my channel




