Doctors Successfully Remove Button Stuck in Toddler’s Nose

बीडमध्ये चिमुरडीचा जीव टांगणीला! नाकात अडकलं होतं कापडी बटण; डॉक्टरांनी शिताफीने केली सुटका

Doctors Successfully Remove Button Stuck in Toddler’s Nose  
बीड: खेळता-खेळता चिमुकलीच्या नाकात अडकले बटण; श्वास घेण्यास अडथळा, डॉक्टरांनी केली सुटका माजलगाव (बीड):बीड जिल्ह्यातील माजलगाव परिसरातून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. खेळता-खेळता तीन वर्षांच्या चिमुकलीच्या नाकात कपड्याचे एक बटण अडकल्यामुळे तिला श्वास घेण्यास त्रास होत होता.

एवढेच नाही तर, तिच्या नाकातून रक्तस्रावही सुरू झाला होता. मात्र, डॉक्टरांनी योग्य वेळी दुर्बिणीद्वारे (Endoscopy) तपासणी करत अत्यंत शिताफीने हे बटण बाहेर काढले. यामुळे चिमुकलीचा जीव थोडक्यात वाचला आहे.

नेमकी घटना काय ? मुलगी खेळत असताना तिला अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि नाकातून रक्त येऊ लागले. मुलीची अवस्था पाहून पालकांनी तातडीने तिला माजलगाव येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. सुरुवातीच्या तपासणीत डॉक्टरांना नाकातील वस्तू सहजासहजी दिसत नव्हती.
मात्र, त्यांनी दुर्बिणीचा (Endoscope) वापर करून बारकाईने तपासणी केली असता, नाकाच्या आत खोलवर कापडी बटण अडकल्याचे दिसून आले.

डॉक्टरांचे यशस्वी प्रयत्न: रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर लक्ष्मीकांत यादव यांनी कोणतीही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया न करता, दुर्बिणीच्या मदतीने हे बटण यशस्वीपणे बाहेर काढले. या प्रक्रियेमुळे चिमुकलीला मोठा दिलासा मिळाला असून तिचा श्वास आता सुरळीत झाला आहे.

पालकांसाठी सल्ला: या घटनेच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर लक्ष्मीकांत यादव यांनी पालकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. "लहान मुले खेळताना अनेकदा छोट्या वस्तू नाकात किंवा तोंडात घालतात. पालकांनी मुलांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. जर अशी काही दुर्घटना घडली,

तर घाबरून न जाता तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि रुग्णालयात दाखल करावे," असे त्यांनी सांगितले. वेळेवर वैद्यकीय मदत मिळाल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.



शहर

महाराष्ट्र

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *