इतिहास स्वतःची पुनरावृत्ती करतो. आज घडणाऱ्याघटनांकडे पाहिले तर 1973 मध्ये देशासमोर उभ्याराहिलेल्या ऐतिहासिक संकटाची चाहूल पुन्हा लागल्याचेदिसते. अर्थात, सध्या तरी याला प्रलयाची चाहूल म्हणतायेणार नाही. कारण मागील 53 वर्षांत भारत अधिकमजबूत झाला आहे. इंदिरा गांधी यांनी 1971 ची निवडणूक प्रचंड बहुमतानेजिंकली होती. आपल्या सहकारी भारतीय कम्युनिस्ट पक्षआणि द्रविड मुनेत्र कळघम यांच्या मदतीने त्यांनीजवळपास 80 टक्के जागांवर विजय मिळवला होता.त्याच वर्षी पाकिस्तानवर विजय मिळवत बांगलादेशाचीनिर्मिती झाली. पुढील वर्षी 19 राज्ये आणि केंद्रशासितप्रदेशांतील निवडणुकांत 15 राज्यांत त्यांनी निर्णायकविजय मिळवला. मणिपूर, मेघालय, मिझोरम आणि गोवाया चार राज्यांत त्यांना यश मिळाले नव्हते. ती लहान राज्येहोती. त्यावेळी मिझोरम आणि गोवा हे केंद्रशासित प्रदेशहोते. इंदिरा गांधी त्या काळात सत्ता व प्रतिष्ठेच्या सर्वोच्चशिखरावर होत्या. इतकी आव्हानविरहित सत्ता भारतातीलकोणत्याही नेत्याला मिळालेली नाही. नरेंद्र मोदी हे त्यांच्याजवळ पोहोचलेले दिसतात. मात्र परिस्थिती नाट्यमयरीत्या बदलली. 1972-73 मध्येसलग दोन वर्षे मान्सून अपयशी ठरला. 1965-66 मध्येहीभारताने अशी परिस्थिती अनुभवली होती. त्या काळात मुख्यतः कृषिप्रधान अर्थव्यवस्थेलाहरितक्रांतीमुळे मिळालेला फायदा या संकटाने पुसूनटाकला. 1973 मध्ये योम किप्पूर युद्ध झाले आणि पश्चिमआशियाई देशांनी प्रथमच तेलाचा वापर शस्त्र म्हणून करतजागतिक तेलसंकट निर्माण केले. तेलटंचाई आणिवाढत्या किमतींमुळे दुष्काळाचे संकट अधिक गडद झाले. भारतातील तरुणांचा संताप उफाळून आला आणि त्याची सुरुवात गुजरातमधून झाली. आर्थिक संकटाचा परिणाम प्रत्येकावर — बेरोजगारी, भाडेवाढ आणि महागाई.कॉलेज वसतिगृहांच्या मेस फी वाढीमुळे या आंदोलनाची ठिणगी पडली. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री चिमनभाई पटेल यांच्याविरोधात भ्रष्टाचारविरोधी आंदोलन उभे राहिले.लवकरच बिहारमध्ये लालू प्रसाद यादव आणि नीतीशकुमार यांसारख्या विद्यार्थी नेत्यांनी ‘छात्र संघर्ष समिती’ स्थापन करून महागाई आणि भ्रष्टाचाराविरोधात जोरदार आंदोलन उभारले. त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्याकडे आंदोलनाचे नेतृत्व सोपवले. इंदिरा गांधींनी याला प्रत्युत्तर म्हणून अनेक पावलेउचलली. चिमनभाई पटेल यांना हटवले. बिहारमध्येअब्दुल गफूर 1974 पर्यंत सत्तेवर राहिले. पण एप्रिल 1975 मध्ये त्यांनाही जावे लागले. 1974 च्या उन्हाळ्यात इंदिरा गांधींनी ‘पोखरण-1’ ही पहिली अणुचाचणी केली. त्यांनी परदेशी शक्ती, सीआयए सरकार अस्थिर करण्याचा कट रचत असल्याचा आरोप केला. मात्र जनतेचा मूडबदलण्यात त्यांना यश आले नाही. कारण बेरोजगारी शिखरावर पोहोचली होती आणि 1974 मध्ये महागाई दर29 टक्क्यांवर गेला होता. सप्टेंबरमध्ये तो 34.68 टक्क्यांवर पोहोचला होता. अशीसुनामी कोण थांबवू शकले असते? अशा परिस्थितीतइंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केली. भारतीयलोकशाहीवरील हा कायमस्वरूपी डाग ठरला. अखेरीसत्यामुळेही त्यांना वाचवता आले नाही. 1977 मधीलनिष्पक्ष निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. आता मागील 18 महिन्यांतील घटनांकडे आणिभविष्यातील संकेतांकडे पाहा. पश्चिम आशियातीलयुद्धामुळे पुन्हा एकदा तेलसंकटाचे धक्के बसत आहेत.विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात पैसेकाढत आहेत. त्यामुळे 20 अब्ज डॉलर देशाबाहेर गेलेआहेत. अनेक मोठ्या भारतीय कंपन्या परदेशातगुंतवणूक करत आहेत. परिणामी थेट विदेशी गुंतवणुकीचेचित्र जवळपास शून्यावर आले आहे. या सगळ्यामुळेडॉलर कमकुवत होत असतानाही रुपयावर दबाव वाढतआहे. यूपीए सरकारच्या अखेरच्या काळात रुपयाच्या‘मजबुती’ला मुद्दा बनवून भाजपने मोठी चूक केली होती.आता त्याचे उलट परिणाम दिसत आहेत आणिक्रिकेटमधील ‘नर्व्हस नाइंटी’सारखी अस्वस्थता जाणवतआहे. डॉलरच्या तुलनेत रुपया 100 चा टप्पा पार करेल,अशी भीती सरकारला वाटत आहे. मात्र चलनाची ताकद ही जागतिक बाजारपेठ आणिअर्थव्यवस्थेच्या स्थितीनुसारच ठरते. चीनकडून आपणधडा घ्यायला हवा होता. त्यांनी आधीच ओळखले होतेकी आपले चलन तुलनेने कमजोर ठेवण्यातच फायदाआहे. तेलामुळे बसलेला धक्का हा 1973 चीच पुनरावृत्तीआहे. सरकार अखेरीस वाढलेल्या किमतींचा भारग्राहकांवर टाकणार. महागाई वाढेल आणि बेरोजगारीअधिक वेदनादायक ठरेल. 1973 मध्ये जसा मान्सूनअपयशी ठरला होता, तसाच इशारा यंदा अल-नीनोवर्षाबाबत दिला जात आहे. त्याचा परिणाम काय होईल, हेअजून स्पष्ट नाही. आज जीडीपीमध्ये शेतीचा वाटा कमीअसला तरी कृषी संकटाचा परिणाम सर्वाधिक लोकांवरहोतो. त्यामुळे लोकांच्या मनातील भावना ओळखणेआवश्यक आहे. काही संकेत अगदी स्पष्ट आहेत. नीटपरीक्षेभोवतीचा वाद हा या संतापाचे प्रतिबिंब आहे. सरकार ‘ईज ऑफ डुइंग बिझनेस’ची भाषा करते, पणरोजगार देणाऱ्या शिक्षणासाठीची स्पर्धा किती क्रूर झालीआहे, हे पाहणे गरजेचे आहे. कॅट, नीट, जेईई, क्लॅट,यूपीएससी, एनडीए, आयएमए, अग्निवीर आणि आतासीयूईटीसारख्या प्रवेश परीक्षांमुळे भारतीय तरुण एकाचक्रव्यूहात अडकला आहे. त्यामुळे आधीच त्रस्त मध्यमवर्गाची बचत संपत आहे, तरनिम्न मध्यमवर्ग कर्जाच्या खाईत ढकलला जात आहे.आणि शेवटी काही फसवे लोक संपूर्ण व्यवस्था हाताळूनपरीक्षा रद्द करवतात, पुन्हा नव्याने तयारी करण्याची वेळविद्यार्थ्यांवर येते. कल्पना करा, हे तरुण किती संतप्त असतील. विशेषतःसरकारचे उत्तर इतकेच असते की दोषींना तुरुंगात टाकूआणि परीक्षा पुन्हा घेऊ. सतत पुनरावृत्ती होणाऱ्या यादुष्टचक्रासमोर लोक हतबल झाले आहेत. हा संताप 1973-74 मधील गुजरातच्या मेस फी वाढकिंवा बिहारमधील महागाईविरोधातील आंदोलनाइतकाचतीव्र आहे का, हे सांगणे कठीण आहे. मात्र ‘कॉक्रोचजनता पार्टी’च्या समर्थनार्थ निर्माण झालेली मोठी लाटकाही स्पष्ट संकेत नक्कीच देते.
(लेखकाचे हे वैयक्तिक मत आहे. )
तरुणांमधील आक्रोश वाढतोय...आज तरुणांमध्ये दिसत असलेलाअसंतोष तो 1973-74 मध्ये गुजरातच्याकॉलेज मेस फी वाढ किंवा बिहारमधीलमहागाईविरोधातील आंदोलनाइतकाचतीव्र आहे का? याचे उत्तर सध्या देणेकठीण आहे. मात्र ‘कॉक्रोच जनतापार्टी’च्या समर्थनार्थ निर्माण झालेलीमोठी लाट काही संकेत नक्कीच देत आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- अमरावतीत: २४ तासांत तीन आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा, आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी चाललाय खेळ
- मुंबईत सायबर गुन्हेगारीचा मोठा धक्का! दिल्ली पोलिसांच्या नावे आभासी अटकेत ठेवून वृद्ध व्यावसायिकाची तब्बल आठ कोटी रुपयांची फसवणूक"
- मुंबईच्या वारशाला नवी ओळख! गिरगावमधील ३०० वर्षे जुन्या ऐतिहासिक विठ्ठल-रखुमाई मंदिराचा 'हेरिटेज' श्रेणीत समावेश होणार; प्रशासनाकडून हरकती-सूचना मागवल्या
- पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! माळशेज घाटात रस्ता खचल्याने वाहतूक पूर्णपणे बंद; प्रशासनाकडून पर्यायी मार्गांची घोषणा"
महाराष्ट्र
- अमरावतीत: २४ तासांत तीन आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा, आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी चाललाय खेळ
- मुंबईत सायबर गुन्हेगारीचा मोठा धक्का! दिल्ली पोलिसांच्या नावे आभासी अटकेत ठेवून वृद्ध व्यावसायिकाची तब्बल आठ कोटी रुपयांची फसवणूक"
- सांगली: ग्रामसेवकाच्या समोरच तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाकडून महिलेला जातीवरून शिवीगाळ, गावात तणाव
- मुंबईच्या वारशाला नवी ओळख! गिरगावमधील ३०० वर्षे जुन्या ऐतिहासिक विठ्ठल-रखुमाई मंदिराचा 'हेरिटेज' श्रेणीत समावेश होणार; प्रशासनाकडून हरकती-सूचना मागवल्या
गुन्हा
- चंद्रपुर: हॉटेलमध्ये घुसून एमआयएमच्या एकमेव नगरसेवकावर १५ ते १६ जणांकडून प्राणघातक हल्ला, राजकीय वर्तुळात चिंता
- चंदीगड: ट्यूशन घेणाऱ्या पत्नीचे २० वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत अफेअर, पतीने रंगेहाथ पकडल्यानंतर उचलले टोकाचे पाऊल
- पुणे: सोशल मीडियावरील मैत्री ठरली घातक; पुण्याच्या कोंढव्यात शिक्षिकेच्या घरून १४ लाखांचा ऐवज लांबवणारा मित्र अखेर गुजरातधून जेतीत
- उत्तर प्रदेश: हुंड्यात बुलेट बाइक मिळाली नाही म्हणून नराधम पतीने केली २२ वर्षीय पत्नीची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; अवघ्या दोन वर्षांपूर्वीच झाले होते लग्न
राजकीय
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
इतर
- आजचे राशिभविष्य २५ जुलै २०२६: विठूरायाची कृपा आणि शनीची साथ, या राशींचा दिवस ठरणार सोन्याचा!
- आजचे राशिभविष्य २४ जुलै २०२६: शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला, इच्छापूर्ती होणार!
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

नाशिक शहरातील गोदावरी नदीच्या पाणीपातळीत घट होऊ लागल्याने रामकुंड परिसरातील पूर हळूहळू ओसरत आहे.
🚨 सिन्नर एमआयडीसी बायपासवर भीषण अपघात #PuneNews #Nashik #Sinnar #AccidentNews #CCTV #BreakingNews
Massive Landslide Hits Tata Sumo in Himachal's Pangi Valley; Feared 10 Dead
देश विदेश
- नवी दिल्ली: झारखंड हायकोर्टाचा मोठा निर्णय: रात्री २ वाजता बायकोने काजळ-लिपस्टिक लावले म्हणजे ती मानसिक रोगी ठरत नाही
- नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सोनम वांगचुक यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- 'हा लोकशाहीचा विजय'
- नवी दिल्ली: 'आताची पिढी प्रश्न विचारतेय, ऐकून घ्यायला हवं'; CJP आंदोलनावर सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य
- बंगळुरू : BMTC बसमध्ये महिलेची छेडछाड, चालकाने आरोपीला दिली कडक शिक्षा

























Subscribe to my channel



