अमरावती जिल्ह्यातील पर्यटन स्थळ असलेल्या चिखलदरा तालुक्यात आणि संपूर्ण मेळघाट परिसरात उन्हाची तीव्रता वाढताच भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत कोरडे पडले असून विहिरी आणि कूपनलिका तळाला गेल्या आहेत. पाण्यासाठी ग्रामस्थांना, विशेषतः महिलांना तीव्र उन्हात तासनतास भटकंती करावी लागत आहे. गावांमधील पाणी संकट निवारण्यासाठी प्रशासनाने टँकर सुरू केले आहेत, मात्र टँकर येताच पाण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी आणि झुंबड उडत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.
महिला आणि बालकांचे पाण्यासाठी हाल
चिखलदरा तालुक्यातील अतिदुर्गम आणि डोंगराळ भागातील गावांमध्ये परिस्थिती अतिशय चिंताजनक बनली आहे. मोथा, खडीमल, आकी, बहाद्दरपूर यांसारख्या अनेक गावांमध्ये पाण्यासाठी हाहाकार माजला आहे. प्रशासनाकडून गावांमध्ये टँकरद्वारे विहिरीत पाणी सोडले जाते किंवा थेट टँकर उभे करून पाणी वाटप केले जाते. मात्र, गावाच्या लोकसंख्येच्या तुलनेत टँकरच्या फेऱ्या अपुऱ्या पडत असल्याने पाणी मिळवण्यासाठी नागरिकांमध्ये प्रचंड स्पर्धा सुरू होते. टँकर गावात येताच महिला, पुरुष आणि लहान मुले हंडे, ड्रम आणि बादल्या घेऊन टँकरभोवती गर्दी करतात. अनेकदा वेळेवर आणि पुरेसे पाणी न मिळाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
अनेक गावांमध्ये विहिरींचे अधिग्रहण
मिळालेल्या माहितीनुसार, चिखलदरा तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या २० पेक्षा जास्त टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच पाणी संकट कमी करण्यासाठी प्रशासनाने सुमारे १७ हून अधिक गावांमध्ये खासगी विहिरी आणि बोअरवेलचे तात्पुरते अधिग्रहण केले आहे. मात्र, उन्हाची पातळी ४2 अंशाच्या पार गेल्याने विहिरींमधील पाणी साठा झपाट्याने कमी होत आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दिवसातील ५ ते ६ तास घालवावे लागत असून, त्यामुळे त्यांच्या रोजगारावरही परिणाम होत आहे.
प्रशासनाकडून तातडीच्या उपाययोजनांची मागणी
मे महिन्याच्या अखेरीस परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता स्थानिक प्रशासनाने आणि ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. केवळ टँकरवर अवलंबून न राहता गावांमध्ये कायमस्वरूपी नळ योजना किंवा पाण्याचे टँकर वाढवून देण्याची मागणी मेळघाटातील आदिवासी बांधवांकडून केली जात आहे. वेळेवर पाणी न मिळाल्यास येत्या काळात पाणीटंचाई अधिक तीव्र होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती वर्तवली जात आहे.
शहर
- नाशिक: पेठ पोलीस ठाण्याचा अंमलदार ९० हजारांची लाच घेताना एसीबी च्या जाळ्यात.
- सायबर भामट्यांनी पैसे लुटलेत? घाबरू नका! 'गोल्डन अवर'मध्ये करा 'हे' काम आणि मिळवा संपूर्ण पैसे परत!
- अभ्यासाचा कंटाळा आल्याने नाशिकचा तरुण पुणे सोडून थेट कोल्हापुरात; राजारामपुरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे झाली सुखरूप पुनर्भेट!
- लेकरांना कवेत घेताच बंदिस्त आई-वडिलांच्या डोळ्यांत तरळले आनंदाश्रू; नागपूर मध्यवर्ती कारागृहात रंगला भावूक 'गळाभेट' सोहळा!
महाराष्ट्र
- रत्नागिरी: संगमेश्वरात उभारणार छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक; मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा
- नाशिक: पेठ पोलीस ठाण्याचा अंमलदार ९० हजारांची लाच घेताना एसीबी च्या जाळ्यात.
- सायबर भामट्यांनी पैसे लुटलेत? घाबरू नका! 'गोल्डन अवर'मध्ये करा 'हे' काम आणि मिळवा संपूर्ण पैसे परत!
- अभ्यासाचा कंटाळा आल्याने नाशिकचा तरुण पुणे सोडून थेट कोल्हापुरात; राजारामपुरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे झाली सुखरूप पुनर्भेट!
गुन्हा
- ठाणे: विनायक राऊतांच्या सुनेने केलेले गंभीर आरोप, छळवणूक आणि जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- नवी मुंबई: पनवेलमधील हाय-प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; ६ महिलांची सुटका, ३ जण गजाआड
- तेलंगणा: पोक्सो प्रकरणातील आरोपीने पत्नी, मुलांसह ६ जणांची केली हत्या.
- पुणे: पती-पत्नीच्या वादातून संतापलेल्या पतीने घर पेटवले; तीन निष्पाप मांजरांचा होरपळून मृत्यू
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
- आजचे राशिभविष्य १० जुलै २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार कमाई; या ४ राशींसाठी दिवस अत्यंत भाग्याचा!
- आर्थिक राशिभविष्य ९ जुलै २०२६: सुनफा, सुकर्मा आणि सर्वार्थ सिद्धी योगामुळे या राशींवर बरसणार धन, कामात मिळणार यश!
- हाय ब्लड प्रेशरचे ५ गंभीर संकेत! शरीरात ही लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष.
मनोरंजन
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ओमान किनाऱ्यावर व्यापारी जहाजावर भीषण हल्ला, भारताकडून तीव्र निषेध; १० भारतीय क्रू मेंबर्स सुखरूप, १ बेपत्ता!
- तेलंगणा: पोक्सो प्रकरणातील आरोपीने पत्नी, मुलांसह ६ जणांची केली हत्या.
- उत्तर प्रदेश: गाझियाबाद मध्ये ७ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून हत्या; मॉलच्या बेसमेंटमध्ये आढळला मृतदेह
- जुनी गाडी असणाऱ्यांना मोठा दिलासा! पेट्रोल पंपावर शुद्ध किंवा 'E10' पेट्रोलचा पर्याय का उपलब्ध नाही? पेट्रोलियम मंत्रालयाने दिले सर्वात मोठे कारण

























Subscribe to my channel


