ओमानच्या किनाऱ्याजवळ (स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ) 'जीएफएस गॅलेक्सी' (GFS Galaxy) या व्यावसायिक मालवाहू जहाजावर झालेल्या भीषण हल्ल्याचा भारताने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या जहाजावर एकूण ११ भारतीय नागरिक उपस्थित होते, ज्यांपैकी १० जणांना सुखरूप वाचवण्यात आले असून एका भारतीय नागरिकाचा शोध अद्याप सुरू आहे. परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) या घटनेबद्दल तीव्र चिंता व्यक्त करत या भागातील वाढता तणाव तत्काळ कमी करण्याचे आवाहन केले आहे.
इराणकडून 'वॉर्निंग शॉट' आणि जहाजाला आग
सायप्रसचा ध्वज असलेल्या 'जीएफएस गॅलेक्सी' या जहाजावर इराणच्या 'इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स' (IRGC) कडून हल्ला करण्यात आला. इराणच्या दाव्यानुसार, हे जहाज अनधिकृत मार्गावरून जात असल्यामुळे हा 'वॉर्निंग शॉट' (इशारा देणारा हल्ला) मारण्यात आला होता. या हल्ल्यानंतर जहाजाच्या इंजिन रूमचे मोठे नुकसान झाले आणि जहाजाला भीषण आग लागली. यामुळे कर्मचाऱ्यांना जीव वाचवण्यासाठी जहाजावरून पळ काढावा लागला. या घटनेनंतर इराणने 'स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ' हा सागरी मार्ग बंद करण्याची घोषणा केली आहे.
अमेरिकेचे इराणवर मोठे हवाई हल्ले
या हल्ल्यानंतर अमेरिका आणि इराणमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (CENTCOM) दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्राध्यक्षांच्या आदेशानंतर अमेरिकेने इराणच्या सुमारे १४० लष्करी तळांवर आणि क्षेपणास्त्र स्थानांवर जोरदार प्रत्याक्रमण (Strikes) केले आहे. व्यापारी जहाजांचे संरक्षण करण्यासाठी अमेरिका कटिबद्ध असल्याचे CENTCOM ने म्हटले आहे.
भारताची भूमिका आणि बचावकार्य
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी अधिकृत निवेदन जारी करून म्हटले आहे की, "व्यावसायिक जहाजांवर होणारे हे सातत्यपूर्ण हल्ले अत्यंत चिंताजनक आहेत. आंतरराष्ट्रीय सागरी नियमांनुसार व्यापारी जहाजे आणि नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे त्वरित थांबले पाहिजे."
ओमानमधील भारतीय दूतावास स्थानिक प्रशासनाशी सतत संपर्कात असून बेपत्ता असलेल्या एका भारतीय नागरिकाचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर 'सर्च अँड रेस्क्यू' ऑपरेशन सुरू आहे. भारताने ओमान प्रशासनाने केलेल्या तातडीच्या मदतीबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. तसेच, जागतिक शांततेसाठी या वादावर राजनैतिक तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे.
शहर
- मुंबई: शिंदेसेनेत अंतर्गत बंडाळी उफाळली! अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी श्रीकांत देशपांडे यांचे दोन उमेदवारी अर्ज दाखल
- मुंबई: पर्यावरणपूरक गणेशोत्सव गिरगाव चौपाटीवर नागरिकांनी समुद्रात न टाकता निर्माल्य थेट प्रतिष्ठानकडे केले सुपूर्द
- ठाणे: हत्येनंतर उद्धव ठाकरेंचा ठाणे दौरा; प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन
- मुंबई: आगामी ४ ऑक्टोबरच्या मोर्चात पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून सर्व कार्यकर्ते सहभागी होणार; राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांची घोषणा
महाराष्ट्र
- पुणे: गजबजलेल्या रस्त्यावर थरार; नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलणाऱ्या तरुणाचे प्राण अग्निशमन जवानांनी वेळीच वाचवले
- मुंबई: शिंदेसेनेत अंतर्गत बंडाळी उफाळली! अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी श्रीकांत देशपांडे यांचे दोन उमेदवारी अर्ज दाखल
- मुंबई: पर्यावरणपूरक गणेशोत्सव गिरगाव चौपाटीवर नागरिकांनी समुद्रात न टाकता निर्माल्य थेट प्रतिष्ठानकडे केले सुपूर्द
- सातारा: दुष्काळाची भीषण परिस्थिती; माण आणि खटाव परिसरात नद्या-विहिरी कोरड्या, पिके वाळून गेल्याने शेतकरी संकटात
गुन्हा
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप



























Subscribe to my channel




