नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अभूतपूर्व लोकप्रियता मिळवलेल्या आणि तुफान चर्चेत असलेल्या 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) या उपरोधात्मक (Satirical) डिजिटल मोहिमेवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. या डिजिटल चळवळीचे अधिकृत एक्स (X - पूर्वीचे ट्विटर) हँडल आणि इन्स्टाग्राम अकाऊंट्स बंद झाल्यानंतर आता या पक्षाची अधिकृत वेबसाईटही बंद करण्यात आल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यावर आणि त्यांच्या चळवळीवर चहूबाजूंनी मोठा डिजिटल हल्ला (Crackdown) करण्यात आला आहे. त्यांचे वैयक्तिक इन्स्टाग्राम अकाऊंट आणि पक्षाचे कोट्यवधी फॉलोअर्स असलेले इन्स्टाग्राम पेज हॅक झाले आहे. यापूर्वीच केंद्र सरकारच्या सूचनेनंतर गुप्तचर विभागाच्या (IB) अहवालाचा हवाला देत 'एक्स'ने या पक्षाचे अधिकृत हँडल भारतात प्रतिबंधित (Withheld) केले होते. त्यानंतर त्यांनी सुरू केलेले पर्यायी अकाऊंटही काढून टाकण्यात आले आहे, तर आता या संपूर्ण मोहिमेची वेबसाईटही बंद झाली आहे.
अभिजीत दिपके यांनी स्पष्ट केले आहे की, सध्या त्यांच्याकडे त्यांच्या कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म किंवा डिजिटल माध्यमांचे नियंत्रण उरलेले नाही. त्यामुळे या प्लॅटफॉर्मवरून यापुढे येणाऱ्या कोणत्याही पोस्ट किंवा विधानांना पक्षाचे अधिकृत वक्तव्य समजले जाऊ नये.
काय आहे 'कॉकरोच जनता पार्टी'चा वाद?
सर्वोच्च न्यायालयाच्या एका सुनावणीदरम्यान बेरोजगार तरुण आणि सोशल मीडिया कार्यकर्त्यांवर करण्यात आलेल्या कथित 'झुरळ आणि परजीवी' (Cockroaches & Parasites) या टिप्पणीनंतर तरुणांच्या संतापातून ही डिजिटल मोहीम उपरोधात्मक पद्धतीने सुरू झाली होती. अवघ्या काही दिवसांतच या पेजने इंस्टाग्रामवर कोट्यवधी फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला होता. मात्र, वाढत्या लोकप्रियतेसोबतच अभिजीत दिपके यांना व्हॉट्सॲपवर जीवे मारण्याच्या धमक्याही आल्या होत्या, ज्यात त्यांना ही मोहीम बंद करण्यासाठी किंवा एका विशिष्ट पक्षात सामील होण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचे त्यांनी उघड केले होते. आता या डिजिटल स्ट्राईकमुळे सोशल मीडियावरील हे मोठे वादळ सध्यातरी शांत झाले आहे.
शहर
- अहिल्यानगर: पहाटेच्या अंधारात निघाला, खड्डा न दिसल्यानं बाईकसह पुलाखाली कोसळला; अहिल्यानगरमधील जामखेड येथे भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू
- पुणे: धनकवडी येथील शंकर महाराज उड्डाणपुलावर साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा मोठा धोका; वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- मुंबईकरांसाठी मोठी बातमी! पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा ८३ टक्क्यांवर पोहोचला, महानगरपालिकेने जाहीर केली जलसाठ्याची आकडेवारी"
- सातारा: पुणे-बेंगळुरू महामार्गावर खंडाळा तालुक्यातील धनगरवाडीजवळ भरधाव खासगी बसची उभ्या ट्रकला धडक; १५ प्रवासी गंभीर जखमी
महाराष्ट्र
- पंढरपुर: आषाढी एकादशीच्या दिवशी मोठी दुर्घट घटना; वारीच्या बंदोबस्तावर आलेल्या SRPF जवानाने स्वतःवर गोळ्या झाडून संपवले आयुष्य
- अहिल्यानगर: पहाटेच्या अंधारात निघाला, खड्डा न दिसल्यानं बाईकसह पुलाखाली कोसळला; अहिल्यानगरमधील जामखेड येथे भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू
- पुणे: धनकवडी येथील शंकर महाराज उड्डाणपुलावर साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा मोठा धोका; वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- मुंबईकरांसाठी मोठी बातमी! पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा ८३ टक्क्यांवर पोहोचला, महानगरपालिकेने जाहीर केली जलसाठ्याची आकडेवारी"
गुन्हा
- उत्तर प्रदेश: हुंड्यात बुलेट बाइक मिळाली नाही म्हणून नराधम पतीने केली २२ वर्षीय पत्नीची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; अवघ्या दोन वर्षांपूर्वीच झाले होते लग्न
- मुंबई: 'पंतप्रधान आवास'मध्ये १८ कोटींचा घोटाळा; तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, नेमके प्रकरण काय?
- अकोला: पोलिसाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आत्महत्येच्या प्रयत्नानंतर पीडित मुलगी कोमात
- उत्तर प्रदेश: संपत्तीच्या हव्यासापोटी बायकोने पार केली क्रूरतेची सीमा तिसऱ्या पतीला बाथरुममध्ये कोंडून जिवंत जाळल्याची अत्यंत संतापजनक घटना
राजकीय
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
इतर
- आजचे राशिभविष्य २४ जुलै २०२६: शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला, इच्छापूर्ती होणार!
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: 'आताची पिढी प्रश्न विचारतेय, ऐकून घ्यायला हवं'; CJP आंदोलनावर सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य
- बंगळुरू : BMTC बसमध्ये महिलेची छेडछाड, चालकाने आरोपीला दिली कडक शिक्षा
- उत्तर प्रदेश: दंडाची पावती फाडून संतापलेल्या रिक्षाचालकाने स्वतःच्या अंगावर ओतले तेल, पोलिसांची उडाली धावपळ
- उत्तर प्रदेश: संपत्तीच्या हव्यासापोटी बायकोने पार केली क्रूरतेची सीमा तिसऱ्या पतीला बाथरुममध्ये कोंडून जिवंत जाळल्याची अत्यंत संतापजनक घटना

























Subscribe to my channel



