तुम्हाला आजोबांचा काळ आठवतो का? ते रोज संध्याकाळी कुठे जायचे- एखाद्या मंदिरात, शाळेत किंवा सामुदायिक सांस्कृतिक बैठकीला. आमच्या आजी अनेकदा स्वयंपाकघरात म्हणायच्या- ‘माहित नाही त्या ठिकाणी असं काय आहे की दिवसभराच्या कामानंतर परतल्यावर 15 मिनिटेही घरात थांबत नाहीत.’ इतरांबद्दल तर मला माहिती नाही, पण आमच्या चाळीत त्या काळातील बहुतांश वृद्ध कोणत्या ना कोणत्या सांस्कृतिक उपक्रमात नक्कीच व्यस्त असायचे. नंतर माझे वडीलही असेच झाले. नागपुरात ‘सरस्वती विद्यालय’ चालवणाऱ्या ‘साऊथ इंडियन असोसिएशन’ या संस्थेत त्यांची सोमवारी बैठक असायची. याच शाळेत मी शिकलो होतो आणि तीन युनिट्समध्ये पसरलेल्या त्या 150 घरांपैकी जवळपास 90% मुले तिथेच शिकायची. त्या घरांमधील बहुतांश लोक कोणत्या ना कोणत्या मंदिराशी जोडलेले होते, ज्यांच्या बैठका मंगळवारी किंवा गुरुवारी व्हायच्या. शनिवार, रविवारी सांस्कृतिक कार्यक्रम असायचे. जसे, कर्नाटक म्युझिक कॉन्सर्ट, भटक्या मंडळींचे नाटक. कधी मुलांचे ‘अरंगेत्रम’, ज्यामध्ये ते पहिल्यांदा सार्वजनिक नृत्य सादरीकरण करायचे किंवा मग दक्षिण भारतातून एखादे संत येऊन 15 दिवस किंवा एक महिन्यापर्यंत रामायण, भगवान शिव, त्यांचे पुत्र भगवान कार्तिकेय किंवा दुर्गा माता यांसारख्या विषयांवर धार्मिक प्रवचन द्यायचे. आता या विषयापेक्षा वेगळी एक गोष्ट सांगतो. माझ्या कुटुंबातील आणि जिथे मी बालपण घालवले, त्या परिसरातील बहुतांश पुरुष- जे स्वतःला सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रिय ठेवायचे- 90 वर्षांपेक्षा जास्त किंवा किमान 80 च्या पुढे तर नक्कीच जगले. तर त्यांच्या पत्नींचे निधन आधी झाले. तेव्हा आपल्यापैकी कोणालाही माहित नव्हते की याचा कला-संस्कृतीमध्ये वेळ घालवण्याशीही काही संबंध असू शकतो. पण मला हा किस्सा या बुधवारी आठवला, जेव्हा मी युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनचे एक संशोधन वाचले की आठवड्यातून एकदा सांस्कृतिक उपक्रमात सहभागी झाल्याने वय वाढीचा वेग किमान एक वर्षाने कमी होऊ शकतो. संशोधन सांगतो की आजच्या काळातील सांस्कृतिक उपक्रमांमध्ये वाचन करणे, म्युझिक कॉन्सर्ट ऐकणे, आर्ट गॅलरी आणि थिएटरमध्ये जाणे, पेंटिंग करणे, वाद्य वाजवणे, आर्ट डॉक्युमेंट्री पाहणे आणि म्युझियम किंवा प्रदर्शनांना भेट देणे यांचा समावेश आहे. खरेतर, माझ्या प्रौढ आयुष्यापेक्षा जास्त सांस्कृतिक कार्यक्रम मी बालपणी माझ्या आजी-आजोबांसोबत पाहिले होते. माझे आजोबा सकाळ-संध्याकाळ मंदिरात जाणे कधीच सोडत नसत. त्यांच्याकडूनच मला संगीत कार्यक्रम आणि प्रवचन ऐकण्याची सवय लागली. एवढेच नव्हे तर आजही मी पवई फाईन आर्ट्स सोसायटी आणि षण्मुखानंद सभा यांसारख्या अनेक ‘सभांचा’ आजीवन सदस्य आहे. लाईव्ह परफॉरमन्स पाहणे माझ्यासाठी खूप आनंददायक असते. मी स्वतः एक परफॉर्मर असल्यामुळे, मी कलाकारांची देहबोली, शब्दरचना आणि विनोदबुद्धी यातून शिकतो. लाईव्ह परफॉरमन्स मला सिनेमापेक्षा जास्त शिकवते. नुकतेच 12 मे रोजी माझी मुलगी न्यूयॉर्कच्या म्युझियम ऑफ मॉडर्न आर्टमध्ये गेली होती आणि संपूर्ण दिवसात ती 5 मजली इमारतीचे तीनपेक्षा जास्त मजले पाहू शकली नाही. मुंबईत बसल्या-बसल्या तिने मला व्हिडिओ कॉलवर ते मजले दाखवले. परिणामी, आज मी मॉडर्न आर्टवर किमान पाच मिनिटे तरी बोलू शकतो. अशी जोडलेली नाती मला माझ्या ‘सिसिफस’ सारख्या न संपणाऱ्या टू-डू लिस्टबद्दल विचार करत राहण्यापासून वाचवतात. मग ते स्टेडियममध्ये फुटबॉल किंवा क्रिकेट मॅच पाहणे का असेना, मला बाहेर जाऊन अशा गोष्टीशी जोडले जाणे आवडते, जी माझ्यापेक्षा खूप मोठी आहे आणि जी मी एकटा करू शकत नाही. एखाद्या वेगळ्या जगात डोकावून पाहणे आणि स्वतःच्या क्षमतांना समजून घेणे मला रोमांचित करते. फंडा असा आहे की, आधुनिक संशोधन जरी असा दावा करत असला की सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभागी झाल्याने आयुष्याची काही वर्षे वाढतात, परंतु कदाचित आपल्या पूर्वजांना हे आधीपासूनच माहित होते की याने आयुष्य नक्कीच अधिक अर्थपूर्ण बनते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नवी मुंबई: पनवेल महापालिकेत पुन्हा 'अतिक्रमण हटाव'चा ४७ कोटींचा प्रस्ताव महासभेपुढे; खर्चावरून चर्चांना उधाण
- पुणे: लोहगावात ५५ कोटींची भव्य वास्तू उभी, पण उपचारासाठी रुग्णांच्या वाट्याला केवळ 'रेफर टू ससून'!
- पुणे: राजकीय हस्तक्षेप खपवून घेणार नाही! स्वच्छता कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या राजकीय दबावावर पुणे महापालिका आयुक्तांचा कडक इशारा!
- मुंबई: पर्यावरणाला धक्का! पुनर्विकास प्रकल्प आणि रुग्णालयाच्या बांधकामासाठी तब्बल १८२ झाडे तोडण्यास मंजुरी!
महाराष्ट्र
- चंद्रपूर: तहसीलदारांना पुलाखाली फेकण्याची धमकी देणाऱ्या आमदार बच्चू कडूंसह ६ जणांवर गुन्हा दाखल
- नवी मुंबई: पनवेल महापालिकेत पुन्हा 'अतिक्रमण हटाव'चा ४७ कोटींचा प्रस्ताव महासभेपुढे; खर्चावरून चर्चांना उधाण
- सिंधुदुर्ग: बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांपासून उद्धव ठाकरे पूर्णपणे दूर गेलेत कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांचा ठाकरेंवर घणाघात
- पुणे: लोहगावात ५५ कोटींची भव्य वास्तू उभी, पण उपचारासाठी रुग्णांच्या वाट्याला केवळ 'रेफर टू ससून'!
गुन्हा
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: नागरिकांना मोठा दिलासा जमीन आणि वनाशी संबंधित सर्व समस्या तातडीने सोडवणार, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची ग्वाही!
- दिल्ली: बॉन्ड तोडण्याचं आणि रेजीम चेंजचे नारे देण्याचं कारण काय? जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान दिल्ली हायकोर्टाने सीजेपी नेत्यांना चांगलेच धारेवर धरले!
- नवी दिल्ली: राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ जगन मोहन रेड्डींनी निवडणूक आयुक्त निवडीच्या प्रक्रियेवर उठवले प्रश्न; जुन्या निर्णयावर व्यक्त केला पश्चात्ताप!
- नवी दिल्ली: अभिजित दिपकेंना कोर्टाकडून मोठा दिलासा! तिरंगा मोर्चादरम्यान अटकेप्रकरणी जामीन मंजूर, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच होणार सुटका!




























Subscribe to my channel




