ज्येष्ठ नेते शरद पवारांची प्रकृती बिघडली; तब्येतीविषयी डॉक्टरांनी काय सांगितलं? माहिती समोर|VIDEO

image

देशाचे जेष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची अचानक तब्येत बिघडल्याची बातमी समोर आली आहे.संपूर्ण राज्यात आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितिचे निकाल सुरू असतानाच आता शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याचे सांगितले जात आहे. रुबी हॉल प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार शरद पवार यांना खोकल्याचा त्रास होत असल्यामुळे त्यांची आधी तपासणी होईल आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करून घ्यायचं का घरी सोडायचं यावर निर्णय घेतला जाईल.

आज सकाळपासूनच शरद पवार यांना खोकल्याचा त्रास होत आहे. रुबी हॉल चे डॉक्टर ग्रँट यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही वेळात शरद पवार यांना आम्ही तपासून घेऊ. त्यांच्यावर काय उपचार करायचे आहेत ते ठरवलं जाईल आणि जर गरज वाटली तर त्यांना ऍडमिट केलं जाईल. परिस्थितीनुसार आम्ही निर्णय घेऊ. असे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *