पश्चिम बंगालच्या निवडणुकीत डावे कुठे आहेत?‎:मुख्य प्रवाहातील डावेही कडेला गेले असतील, तर त्यासाठी ते स्वतःच जबाबदार आहेत‎

काँग्रेस - लेफ्ट फ्रंट यांचा‎ उरल्यासुरल्या मतांसाठी संघर्ष‎ पश्चिम बंगालच्या निवडणुकीत डावे पक्ष‎आणि काँग्रेस उरलेल्या वाट्यासाठी स्पर्धा‎करत आहेत. पूर्व-मध्य भारतात‎माओवादाला पूर्णपणे संपवण्यात आले‎आहे, तर केरळमध्ये कॉम्रेड‎सरकारविरोधी दुहेरी भावनेशी झुंज देत‎आहेत. डाव्या विचारधारेला आता बाजूला‎सारण्यात आलेले दिसते.‎ ‎‎‎‎‎‎‎‎‎‎बंगालमधील भिंतींवर लिहिलेला संदेश तुम्ही कोलकाता‎आणि त्याच्या बाहेर फिरल्याशिवाय कसा वाचणार? तर‎चला, माझ्यासोबत उत्तरेला ६०० किमीवरील‎सिलीगुडीच्या ६० किमी अरुंद कॉरिडॉरमध्ये जाऊया किंवा‎बंगालच्या मुख्य भूमीला उत्तर आणि पूर्वेकडील‎हिमालयीन जिल्ह्यांशी जोडणाऱ्या ९० किमी रुंद पट्ट्यात‎जाऊया. चला, नक्षलबाडीच्या भिंतींपासूनच सुरुवात‎करूया. कुणी या गोष्टींकडे लक्ष दिले असते, तर आपण‎आज १९६७ च्या सशस्त्र आंदोलनाची ५९ वा स्मृती दिन‎साजरा केला असता. म्हणूनच आम्ही बेंगाईजोतेपासून‎सुरुवात केली. हे गाव नक्षलबाडीचाच भाग आहे. तेथे‎बंडाची पहिली ठिणगी पडली होती.‎ मला येथे त्या विसरल्या गेलेल्या क्रांतीच्या स्मारकांची‎साफसफाई आणि रंगकाम करत असलेले दोन कॉम्रेड‎भेटले. या स्मारकावर मार्क्स, लेनिन, एंगेल्स, स्टॅलिन,‎माओ, चारू मजूमदार आणि सरोज दत्ता यांच्या मूर्ती‎बसवण्यात आल्या आहेत. पहिले पाच नेते अशा महान‎व्यक्ती होत्या. त्यांची नावे या क्रांतीच्या प्रार्थनांमध्ये घेतली‎जात होती. उरलेले दोघे त्यांचे उत्तराधिकारी होते आणि‎क्रांतीचे स्थानिक संस्थापक होते. पण माओच्या खांद्याला‎खांदा लावून मार्शल लिन प्याओ (बियाओ)ही उभे होते.‎ते चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’चे सर्वात‎शक्तीशाली प्रमुख होते आणि त्यांना अनेकदा चीनच्या‎कम्युनिस्ट पक्षातील दुसरे सर्वात ताकदवान नेते म्हटले‎जात होते. पण अचानक एक दिवस १३ सप्टेंबर १९७१‎रोजी त्यांचे निधन होते. एका विमानातून ते कुटुंबासह‎प्रवास करत होते. ते मंगोलियात अपघातग्रस्त झाले. या‎अपघाताबद्दल चीनी सरकारने स्पष्टीकरण दिले की,‎कथित ‘प्रोजेक्ट ५७१’ तख्तापलट अयशस्वी झाल्यानंतर‎ते पळून जात होते. असे मानले जाते की ते पळून सोव्हिएत ‎‎संघात जात होते. लिन यांना गद्दार घोषित करण्यात आले ‎‎आणि त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला की ते माओ‎यांच्या पत्नी जियांग क्विंग यांच्यासोबत मिळून‎सत्तापालटाची योजना करत होते. या दोघांना चीनच्या ‎‎कम्युनिस्ट पक्षाने ‘प्रति-क्रांतिकारी’ घोषित केले. पण‎जगात बेंगाईजोते एक अशी जागा आहे. तेथे तुम्ही माओ ‎‎आणि लिन यांना एकमेकांच्या शेजारी पाहू शकता. नक्षल ‎‎आंदोलनाची ५९ वी वर्षपूर्ती आणि लेनिन जयंती (२२ ‎‎एप्रिल) साजरी करण्यासाठी त्यांच्या स्मारकाची‎साफसफाई करणारे दलित कॉम्रेड पुण्य सिंह राजबोंग्सी‎यांना याबद्दल काही अडचण नाही.‎ मी त्यांना विचारतो : तुम्ही माओ आणि लिन बियाओ‎यांना एकत्र कसे ठेवू शकता? ते म्हणतात : कारण ते‎महान कॉम्रेड होते. मी म्हणतो : पण, लिन यांनी माओ‎यांना धोका दिला नव्हता का, आणि माओ यांनी त्यांची‎हत्या करवली नव्हती का? राजबोंग्सी यांनी ठामपणे‎सांगितले : नाही, ताे सर्व अपप्रचार आहे. त्यांच्या विरोधात ‎‎लिउ शाओकी यांनी कट रचला होता. मी त्यांना हे‎आठवण करून दिले नाही की लिउ यांचे दोन वर्षांपूर्वीच ‎‎निधन झाले होते. भक्तांशी वाद कशाला. दरम्यान, दुसरे ‎‎ज्येष्ठ कॉम्रेड स्मारकातील वॉलपेपर चिकटवत होते.‎त्यावर बंगालीत काही लिहिले होते त्याचा अर्थ असा होता‎: "मुक्ती मतदानाने मिळणार नाही. मुक्ती फक्त क्रांतीनेच‎मिळेल.’ यानंतर काही दिवसांनी नक्षलबाडीमध्ये ९२‎टक्के मतदान नोंदवले गेले. आज लोक फक्त मतदानातून‎होणाऱ्या क्रांतीवरच विश्वास ठेवू लागले आहेत. क्रांतीचा‎जन्म नक्षलबाडीत झाला, तर तिचा अंतही तिथेच झाला.‎२०२१ मध्ये ही विधानसभा जागा भाजप उमेदवार‎आनंदमय बर्मन यांनी सुमारे ७१ हजार मते म्हणजे ५८‎टक्के मतांनी जिंकली. आम्ही त्यांना माटीगारा (या‎निवडणूक क्षेत्राला आता माटीगारा-नक्षलबाडी म्हटले‎जाते) येथे घराघरांत जाऊन प्रचार करताना पाहिले.‎मृदुभाषी शिक्षक आणि आरएसएस कार्यकर्ते आनंदमय‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎बर्मन म्हणतात की त्या आंदोलनाने लोकांना गरिबीशिवाय‎काहीच दिले नाही.‎ पश्चिम बंगालच्या यावेळच्या निवडणुकीत डावे पक्ष‎आणि काँग्रेस यांच्यात स्पर्धा सुरू आहे की उरलेल्या‎वाट्यातून कुणाला मोठा हिस्सा मिळतो. ही स्थिती‎पूर्व-मध्य भारतात नक्षलांच्या नव्या रूपाला पूर्णपणे‎संपवण्यात आले तेव्हा दिसते. दूर दक्षिणेत केरळमध्ये‎डाव्या पक्षांना सरकारविरोधी दुहेरी लाटेचा सामना करावा‎लागत आहे. ४ मे रोजी त्यांनी काही चमत्कार करून‎दाखवला नाही, तर आपण असे जाहीर करू शकतो की‎आता डाव्या विचारांना निर्णायकपणे कडेला ढकलण्यात‎आले आहे. सशस्त्र कम्युनिझमचा अंत होणे ही फक्त‎काळाची गोष्ट होती. पण मुख्य प्रवाहातील डावेही कडेला‎गेले असतील, तर त्यासाठी ते स्वतःच जबाबदार आहेत.‎२००४ मध्ये ५३ लोकसभा जागांसह ते शिखरावर पोहोचले‎होते. त्यामागे फक्त एक भावनेची लाट होती : अमेरिका‎विरोध. ते यूपीए सरकारपासून वेगळे झाले होते आणि‎अमेरिकेसोबतच्या अणुकराराच्या मुद्द्यावर भाजपसोबत‎हातमिळवणी करून त्या सरकारला पाडण्याचाही प्रयत्न‎केला होता. त्यानंतर ते अधोगतीच्या मार्गावरच गेले. .‎१९८८ मध्ये मला हे पाहून आश्चर्य वाटले की बीजिंग‎आणि मॉस्कोमध्ये कम्युनिस्ट बदलत होते. पण‎कोलकात्यात नाही. या उत्सुकतेने मला कोलकात्यात‎आणले. मी माकपचे प्रदेश सचिव सरोज मुखर्जी यांना‎विचारले होते : देंग व गोर्बाचेव्ह यांनी साम्यवाद बदलला.‎भारतातील कम्युनिस्ट सुधारणा का करत नाहीत? त्यांनी‎सांगितले : कारण माझा कम्युनिझम देंग, गोर्बाचेव्ह यांच्या‎कम्युनिझमपेक्षा अधिक शुद्ध आहे.‎ जवळपास वीस वर्षांनंतर त्यांचे एक उत्तराधिकारी बुद्धदेब‎भट्टाचार्य यांनी बदलण्याचा प्रयत्न केला होता. मी त्यांना‎विचारले होते की तुम्ही खासगी आणि विदेशी‎भांडवलाला आमंत्रण देत आहात. ते तुमच्या‎विचारधारेशी कसे जुळते. त्यांनी सांगितले होते : माझा‎विश्वास हीच माझी विचारधारा आहे. पण मी क्रांतिकारी‎सरकार चालवत नाही. मला संविधानानुसार काम करावे‎लागते. त्यांनी सिंगूर, नंदीग्राममध्ये औद्योगिक नगर‎उभारण्याची योजना केली होती. तिच्याविरोधातील‎जनआंदोलन त्यांच्या स्वतःच्या कट्टर डाव्या कॉम्रेडांनी‎चालवले होते. त्यांनी भट्टाचार्य यांचे स्वप्न मोडले. त्यांच्या‎पक्षाला संपवले. ममता बॅनर्जी त्याला दफन करण्यासाठी‎उभ्या राहिल्या. भाजप त्या कबरीवर नवा महाल‎उभारण्यात व्यग्र आहे.‎ (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)‎

This post was originally published on this site.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *