Shocking Murder in Beed: 19-Year-Old Killed by 4 Friends Over Social Media Photo Dispute

मैत्रीला काळिमा फासणारी घटना! पत्नीचे फोटो व्हायरल केल्याच्या संशयावरून १९ वर्षीय तरुणाची मित्रांकडून हत्या

Shocking Murder in Beed: 19-Year-Old Killed by 4 Friends Over Social Media Photo Disputeबीड: बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील बेलुरा गावातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. आपल्या पत्नीचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याच्या संशयावरून चार मित्रांनी मिळून एका १९ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?
सुमित सुशांत गवते (वय १९) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी रुस्तुम गोवर्धन गवते याला संशय होता की सुमितने त्याच्या पत्नीचे काही आक्षेपार्ह फोटो इतरांना दाखवले आहेत आणि ते सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावरून गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होते. याच रागातून २६ एप्रिल रोजी रात्री साडेसात ते साडेआठ वाजेच्या दरम्यान आरोपींनी सुमितला गाठले. चौघांनी त्याचे हातपाय पकडले आणि धारदार चाकूने त्याच्या पोटावर वार केले.

उपचारापूर्वीच मृत्यू:
हल्ल्यानंतर सुमित रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी वाहन उपलब्ध होऊ शकले नाही. प्रचंड रक्तस्राव झाल्यामुळे सुमितचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

होमगार्डसह चौघांवर गुन्हा; एक जेरबंद:
या प्रकरणी शिरूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत ज्ञानेश्वर लाटे या आरोपीला अटक केली आहे. या गुन्ह्यात एकूण चार आरोपींचा समावेश असून, त्यामध्ये रितेश सतीश बहिर (होमगार्ड), रुस्तुम गोवर्धन गवते आणि सूरज मच्छिंद्र नागरगोजे हे अद्याप फरार आहेत. पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

भररस्त्यात घडलेल्या या क्रूर हत्येमुळे बेलुरा गावात भीतीचे वातावरण पसरले असून, संशयापोटी एका तरुण जिवाचा बळी गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *