
Navi Mumbai : नवी मुंबईत मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. करावे गाव परिसरात भरधाव वेगात असलेल्या इनोव्हा कारने रस्त्यावर उभी तसेच सुरू असलेली अनेक वाहने जोरदारपणे धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे अपघात करणाऱ्या कारवर ‘पोलीस’ अशी नेमप्लेट असून, वाहनातून वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचे ओळखपत्र सापडल्याने प्रकरण अधिकच गंभीर बनलं आहे.
भरधाव इनोव्हाची वाहनांना धडक
घटना घडली त्यावेळी रस्त्यावर वर्दळ होती. अचानक भरधाव इनोव्हा कारने एका मागोमाग एक वाहनांना धडक दिल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झालं. अपघाताचा आवाज इतका भीषण होता की नागरिकांनी धाव घेत घटनास्थळी गर्दी केली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कारचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचं स्पष्टपणे जाणवत होते. नशेत वाहन चालवल्यामुळेच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडल्याचं सांगण्यात येत आहे.
|
|
अपघातानंतर इनोव्हा कारची तपासणी केली असता, वाहनावर ‘पोलीस’ अशी नेमप्लेट असल्याचे आढळून आली. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि संताप व्यक्त करण्यात आला. पुढील तपासात कारमधून मुंबई पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण बबन पोखरकर यांचे ओळखपत्र सापडल्याची माहिती मिळत आहे. ही बाब समोर आल्यानंतर 'कायद्याचे रक्षकच कायदा मोडत आहेत का?' असा सवाल उपस्थित होत असून, प्रकरणाला वेगळे वळण मिळालं आहे.
पोलिसांच्या नावाची पाटी
सामान्य नागरिकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास तात्काळ कारवाई केली जाते. मात्र, पोलिसांच्या नावाची नेमप्लेट असलेल्या वाहनामुळे नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सोशल मीडियावरही या घटनेची चर्चा सुरू असून, दोषी व्यक्ती कोणही असो, कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहनांची पाहणी करण्यात आली असून, नुकसानग्रस्त वाहनचालकांचे जबाब नोंदविण्यात येत आहेत. तसेच संबंधित इनोव्हा कार नेमकी कोण चालवत होती, ती व्यक्ती प्रत्यक्षात पोलीस अधिकारीच होती की ओळखपत्र आणि नेमप्लेटचा गैरवापर करण्यात आला आहे, याचा सखोल तपास सुरू आहे. चालकाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली का, रक्तनमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत का, याबाबतही चौकशी केली जात आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात सत्य काय आहे, दोषी कोण आहे आणि कायद्याची अंमलबजावणी समानपणे होणार का, याकडे संपूर्ण नवी मुंबईचे लक्ष लागले आहे. दोषी आढळल्यास कोणताही दबाव न घेता कठोर कारवाई केली जाईल, असे संकेत पोलिस प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
शहर
- मुंबई: सीएसएमटी रेल्वे स्थानकावर बुकिंग हॉलजवळ छताचा भाग कोसळला; दुर्घटनेत दोन प्रवासी जखमी, सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू
- मुंबई: विद्यार्थ्यांपाठोपाठ आता शिक्षकांवरही डिजिटल वॉच राज्यातील शाळांमधील शिक्षकांसाठी 'स्वित्चॅट' ॲपद्वारे ऑनलाईन उपस्थिती अनिवार्य
- मुंबई: मनोज जरांगे पाटलांच्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणावरून शिंदे गटाचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, सखोल चौकशीची मागणी
- मुंबई: उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्देश: राज्यातील सर्व समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षक आणि चेतावणी फलक बंधनकारक करण्याचे आदेश
महाराष्ट्र
- मुंबई: सीएसएमटी रेल्वे स्थानकावर बुकिंग हॉलजवळ छताचा भाग कोसळला; दुर्घटनेत दोन प्रवासी जखमी, सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू
- मुंबई: विद्यार्थ्यांपाठोपाठ आता शिक्षकांवरही डिजिटल वॉच राज्यातील शाळांमधील शिक्षकांसाठी 'स्वित्चॅट' ॲपद्वारे ऑनलाईन उपस्थिती अनिवार्य
- नाशिक: साक्षी चांडक देशात पहिली सीए इंटरमीडिएट परीक्षेत ५०२ गुणांसह ऑल इंडिया रँक १ मिळवत घडवला ऐतिहासिक इतिहास
- रत्नागिरी: जिल्ह्याला दुष्काळाचा भीषण फटका १२ हजार ८५० हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त, ४३ हजारांहून अधिक शेतकरी संकटात
गुन्हा
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: एआय धोरण २०२६ जाहीर तरुणांना प्रशिक्षण, स्टार्टअप्सला चालना आणि तंत्रज्ञान क्रांतीच्या दिशेने मोठी झेप!
- उत्तर प्रदेश: मनेागरणात डेंगूमुळे पतीचा मृत्यू, पाठोपाठ पत्नीनेही दम तोडला; एकाच चितेवर झाले अंत्यसंस्कार
- नवी दिल्ली: परिसीमन विधेयकासाठी भाजपची मोठी चाल इंडिया आघाडीतील सर्वात मोठ्या पक्षाला सोबत घेण्याची तयारी
- नवी दिल्ली: ३० वर्षे तरी तुमचा नंबर लागत नाही, तुम्ही आता परदेशात आहात... केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची राहुल गांधींवर जोरदार टीका!




























Subscribe to my channel





1 thought on “Navi Mumbai Crime : मद्यधुंद अवस्थेत कार चालवून वाहनांना धडक; कारवर ‘पोलीस’ पाटी, दरवाजा उघडताच धक्कादायक प्रकार उघड”