
Pune Crime : ‘पैसे दिल्याशिवाय सुटका नाही’; कॅफेत गप्पा, प्लॅन्ट दाखवायला नेलं अन् पुढे थेट किडनॅप; ५० लाख रुपये देणी वसूल करण्यासाठी प्रकार, पुण्यात खळबळ
Pune businessman Kidnapping Case : पुण्यातील मेट्रो कंत्राटदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खडी क्रशर प्लॅन्ट दाखवण्याच्या बहाण्याने ओळखीच्याच व्यक्तीने व्यावसायिकाला बोलावून कंटेनरमध्ये डांबले आणि मारहाण केली. आरोपींनी वडिलांकडे खंडणी मागताच पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली.
पुणे : मेट्रो प्रकल्पात काम करणाऱ्या एका कंत्राटदाराला खडी क्रशर प्लॅन्ट दाखवण्याच्या बहाण्याने बोलावून, त्याचं भरदिवसा अपहरण केल्याची खळबळजनक घटना पुण्यात घडली आहे. ५० लाखांच्या जुन्या वादातून पाच जणांनी व्यावसायिकाला कंटेनरमध्ये डांबून मारहाण केली आणि त्यांच्या वडिलांकडे खंडणी मागितली. मात्र, खराडी पोलिसांनी जीवाची पर्वा न करता अहिल्यानगर रस्त्यावर सिनेस्टाईल पाठलाग करून नाकाबंदी केली आणि गुंडांच्या तावडीतून व्यावसायिकाची सुखरूप सुटका करत पाचही जणांच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणाने सध्या एकच खळबळ उडाली आहे.
आरोपी अटक
या प्रकरणात सागर दत्तात्रय झुरुंगे (३९), विजय सुरेश वाळुंज (३८), राजू विजयकुमार सहाणे (३२), रुपेश शिवाजी गावडे (३८, सर्व रा. लोणीकंद) आणि प्रकाश बाळासाहेब राऊत (३४, रा. तुळापूर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
किडनॅपरसोबत आधीच होती ओळख
या प्रकरणी गहुंजे येथे राहणाऱ्या ४० वर्षीय व्यावसायिकाने याबाबत तक्रार दिली आहे. हे व्यावसायिक मेट्रो प्रकल्पात सिव्हिल वर्क करतात. आरोपी झुरुंगे याच्याशी त्यांची ओळख आधीपासून होती. झुरुंगे हा खडी-क्रशर माल पुरवठा करत होता आणि त्याच्याकडे सुमारे ५० लाख रुपये देणे बाकी होते.
त्यादिवशी नेमके काय घडले?
१३ एप्रिलला झुरुंगेने फोन करून व्यवसायिकाला “कामाबद्दल बोलायचं आहे” असं सांगितलं. त्यानुसार १४ एप्रिलला खराडीतील इराणी कॅफेत दोघे भेटले. काही वेळ गप्पा मारल्या. त्यानंतर “क्रशर प्लॅन्ट बघायला जाऊया” असं सांगत आरोपींनी त्यांना गाडीत बसवलं. मात्र, हा प्रवास थेट सापळ्यात नेणारा ठरला.
असा होता प्लॅन
खराडी जकात नाका परिसरात गाडी नेण्यात आली. त्याठिकाणी एका कंटेनरमध्ये त्यांना नेण्यात आलं. तिथे आधीपासूनच काही जण थांबलेले होते. अचानक वातावरण बदललं आणि “आजच माझे ५० लाख दे, नाहीतर सोडणार नाही,” अशी धमकी देण्यात आली. त्यांचे मोबाईल बंद करून त्यांना मारहाण करण्यात आली.
'तुमचा मुलगा आमच्या ताब्यात'
यानंतर आरोपींनी त्यांना पुन्हा गाडीत बसवलं. त्यानंतर पुणे-अहिल्यानगर मार्गे रांजणगावच्या दिशेने नेलं. मध्येच एका ठिकाणी गाडी बदलून दुसऱ्या वाहनात बसवण्यात आलं, जेणेकरून पोलिसांची दिशाभूल होईल. दरम्यान, आरोपींनी व्यावसायिकाच्या वडिलांना फोन करून स्पष्ट इशारा दिला “५० लाख दिल्याशिवाय मुलगा सोडणार नाही.” वडिलांनी तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली.
पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई
खराडी पोलिसांनी लगेच कारवाई करत संशयित गाडीचा माग काढला. अहिल्यानगर रोडवरील विजय स्तंभाजवळ नाकाबंदी करून गाडी अडवण्यात आली. गाडीतून अपहरण झालेला व्यावसायिक सुरक्षित सापडला आणि पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून,वेळेत कारवाई केल्यामुळे मोठी घटना टळली आहे.
शहर
- पुणे: अंगावर पेट्रोल ओतून जिवंत मारण्याच्या गंभीर प्रकरणातील आरोपीला उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा; जामीन मंजूर
- पुणे: अल्पवयीन नात घरात एकटी दिसली अन्...; इंदापूर तालुक्यात ६७ वर्षीय आजोबाचे संतापजनक कृत्य, पोलिसांनी केली अटक
- मुंबई: शेतकऱ्यांचा संताप आणि पेच: शासकीय योजनांसाठी आयटीआर सक्तीची अट अन् कर्जमाफीचा प्रश्न; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
- पुणे: भारत आता मार खाणारा देश राहिलेला नाही, गरज पडल्यास घरात घुसून मारणारा देश बनलाय - देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र
- जळगाव : मासे पकडण्याची हौस पडली भारी; जळगावच्या धरणगाव तालुक्यात नदीच्या पात्रात पुराच्या पाण्यात अडकला तरुण, पाच तास काढले झाडावर
- पुणे: अंगावर पेट्रोल ओतून जिवंत मारण्याच्या गंभीर प्रकरणातील आरोपीला उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा; जामीन मंजूर
- पुणे: अल्पवयीन नात घरात एकटी दिसली अन्...; इंदापूर तालुक्यात ६७ वर्षीय आजोबाचे संतापजनक कृत्य, पोलिसांनी केली अटक
- मुंबई: शेतकऱ्यांचा संताप आणि पेच: शासकीय योजनांसाठी आयटीआर सक्तीची अट अन् कर्जमाफीचा प्रश्न; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
गुन्हा
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
- वाशिम: अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची पत्नी आणि प्रियकराकडून निर्घृण हत्या; दारू पाजून दोरीने गळा आवळत केला गेम
- ठाणे: डोंबिवलीत संतापजनक प्रकार; नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर तिघा नराधमांकडून अत्याचार; मानपाडा पोलिसांकडून आरोपी जेरबंद
- नागपुर: विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या संघात निवड न झाल्याने १७ वर्षीय महिला क्रिकेटपटूचे टोकाचे पाऊल
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
- आजचे राशिभविष्य २७ जुलै २०२६ : या राशींना नोकरीत प्रमोशन तर काही राशींना व्यवहारात सतर्क राहण्याचा इशारा, जाणून घ्या आजचे भविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली
- पश्चिम बंगाल: पश्चिम बंगालमध्ये माजी सरकारी बस चालकाच्या घरी पोलिसांची धाड, २८ कोटींची रोकड आणि १५ किलो सोने जप्त


























Subscribe to my channel





https://shorturl.fm/jHCVd