नऊ न्यायाधीशांचे घटनापीठ सबरीमाला प्रकरणाचीसुनावणी करत आहे. 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयानेनिर्णय दिला होता की, सबरीमाला मंदिरात 10 ते 50 वर्षेवयोगटातील महिलांच्या प्रवेशावर असलेली बंदीअसंवैधानिक आहे आणि ती समानता व धर्मपालनाच्यास्वातंत्र्यासारख्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करते.आता घटनापीठासमोर सुनावणीचा उद्देश हा आहे की,इतर धर्मांमधील भेदभावपूर्ण प्रथांचेही पुनरावलोकनकेले जावे आणि या मुद्द्यांवर घटनात्मक तत्त्वे प्रस्थापितकेली जावीत. आतापर्यंत हिंदू आणि मुस्लिम या दोन्हीधार्मिक संघटनांनी अशी भूमिका घेतली आहे की,न्यायालयांना मूळ धार्मिक प्रथा ठरवण्याचा अधिकारनाही, कारण हे श्रद्धेशी निगडित विषय आहेत. परंतु सबरीमाला प्रकरणात प्रश्न हा उद्भवतो की, धार्मिकप्रथा नक्की कुणाच्या? केरळमधील माला अरयन आदिवासी समुदाय सबरीमाला मंदिराचा पारंपरिक संरक्षक होता. 19 व्या शतकाच्या सुरुवातीला मंदिराचे नियंत्रण स्वतःच्या हातात घेण्यापूर्वी ब्राह्मण त्या विधींचे पालन करत नव्हते, ज्यांचेते आज संरक्षण करू इच्छितात. माला अरयनआदिवासी हे मासिक पाळीच्या वयोगटातील महिलांच्याप्रवेशावर कोणतेही निर्बंध घालत नसत. सध्या मंदिराच्या‘तंत्री’ (मुख्य पुजारी) द्वारे केल्या जाणाऱ्या शुद्धीकरणविधीवरही त्यांचा विश्वास नव्हता. आता सबरीमाला प्रकरण अशा एका चित्ररूपातसमोर येत आहे, जिथे एक समूह दुसऱ्याच्या क्षेत्रावरअतिक्रमण करत आहे, तर दुसरा समूह या मंदिराचापारंपरिक संरक्षक राहिला आहे. दोन्ही समूहांचेविधीदेखील वेगवेगळे आहेत : एक लैंगिकदृष्ट्या तटस्थआहे, तर दुसरा महिलांच्या विशेषतः मासिक पाळीच्यावयोगटातील महिलांच्या मंदिर प्रवेशाला मान्यता देतनाही. माला अरयन आदिवासी समुदायाचा दावा आहेकी, सबरीमाला मंदिरातील देवता अय्यप्पन हे त्यांच्यापूर्वजांचे आराध्य दैवत आहे. त्यांचे म्हणणे आहे की,इ.स.1800 च्या सुमारास त्यांना त्यांच्या जमिनीवरूनबेदखल करण्यात आले. तरीही, त्यांचे सदस्य मंदिरातपरतून आपल्या विधींचे पालन करत राहिले आहेतआणि आजही सबरीमालाला आपल्या पूर्वजांचे दैवतमानतात. 2013 पासून त्यांनी केरळ उच्च न्यायालय आणि राज्यसरकारकडे अनेकदा याचिका दाखल केल्या आहेत,जेणेकरून मंदिराच्या वार्षिक विधीचा भाग म्हणून‘मकरविलक्कू’ प्रज्वलित करण्याचा आपला अधिकारपुन्हा प्राप्त करता येईल. परंतु सरकारने आणिन्यायालयाने आतापर्यंत कोणताही स्पष्ट निर्णय दिलेलानाही. ऐतिहासिक पुरावे असे संकेत देतात की, मालाअरयन समुदायाचे दावे रास्त आहेत. 19 व्या शतकाच्यामध्यावर दक्षिण भारताची यात्रा करणाऱ्या सॅम्युअलमतीर यांनी त्यांच्या ‘नेटिव्ह लाइफ इन त्रावणकोर’(1883) या पुस्तकात या समुदाय आणि सबरीमालामंदिर यांच्यातील संबंधांचा उल्लेख केला आहे. असेदिसून येते की, 19 व्या शतकातही हे मंदिरदीर्घकाळापर्यंत लैंगिकदृष्ट्या तटस्थ राहिले होते आणि1950 च्या दशकापर्यंत तिथे महिलांना प्रवेशाची अनुमतीहोती. मंदिराच्या विधींमध्ये पुरुषी प्रवृत्ती 20 व्याशतकाच्या मध्याच्या सुमारास वाढू लागली आणि 1965मध्ये 10 ते 50 वर्षे वयोगटातील महिलांच्या प्रवेशावर बंदीघालण्यात आली. 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचानिर्णय येऊनही, 10 ते 50 वर्षे वयोगटातील खूप कमीमहिलांनी सबरीमाला मंदिरात प्रवेशाचा प्रयत्न केलाआहे. म्हणजेच न्यायालयाचा निर्णयदेखील व्यावहारिकस्तरावर वस्तुस्थिती बदलण्यास सक्षम ठरलेला नाही.केरळमधील सत्ताधारी एलडीएफ सरकारनेसबरीमाला प्रकरणावरील आपल्या भूमिकेत ‘यू-टर्न’घेतला आहे. त्यांना या निर्णयाचा पश्चात्ताप होऊशकतो, कारण यामुळे महिला, उदारमतवादी पुरुष आणिआदिवासी मतदार या तिन्ही घटकांना दुरावण्याचा धोकाआहे. ( हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.) माला अरयन आदिवासी समुदायाचादावा आहे की, सबरीमालाची देवताअय्यप्पन हे त्यांच्या पूर्वजांचे आराध्यदैवत आहे. त्यांचे म्हणणे आहे की, इ.स.1800 च्या सुमारास त्यांना त्यांच्याजमिनीवरून बेदखल केले गेले होते.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



