
Dharashiva : धाराशिव जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान भयंकर घटना घडली आहे. हा कार्यक्रम सुरू असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी मोहन जाधव (वय ५५) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. तिरंग्याला मानवंदना देत असतानाच ही दुर्दैवी घटना घडली. उमरगा तालुक्यातील तलमोड सीमा तपासणी नाक्यावर हा कार्यक्रम सुरू होता. जाधव हे सोलापूरचे रहिवासी होते आणि उमरगा येथे कर्तव्य बजावत होते. त्यांच्या निधनाने सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील उत्पादन शुल्क विभागात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रजासत्ताक दिनानिमित्त रविवारी सकाळी धाराशिवमधील तलमोड येथील चेक पोस्टवर ध्वजारोहणाचे आयोजन करण्यात आलं होतं. मोहन जाधव हे पोलीस कर्मचारी सोहळ्यात उत्साहाने सहभागी झाले होते. ध्वजवंदन सुरू असताना आणि राष्ट्रगीत सुरू असतानाच जाधव यांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं आणि ते स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच अचानक सर्वांसमोर जमिनीवर कोसळले.
|
|
उपस्थित कर्मचाऱ्यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. परंतु त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. ही संपूर्ण घटना तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, जाधव हे तिरंग्यासमोर उभे होते आणि अचानक त्यांचा तोल गेला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दरम्यान, मोहन जाधव हे मूळचे सोलापूरचे रहिवासी होते. उमरगा येथील कर्तव्य निभावत असताना त्यांनी आपल्या कामाप्रती नेहमीच निष्ठा जपली. त्यांच्या निधनाची बातमी समजताच सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील अबकारी विभागात शोककळा पसरली आहे. "जाधव हे मनमिळावू आणि कामात शिस्तप्रिय अधिकारी होते, प्रजासत्ताक दिनीच त्यांचे असे जाणे मनाला चटका लावणारे आहे," अशा शब्दांत त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे.
शहर
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
महाराष्ट्र
- अमरावती: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबई आणि पुण्यासाठी थेट विमानसेवेला मंजुरी, 'उडान' योजनेअंतर्गत दोन्ही मार्गांची निवड!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- अमरावती: पन्नासाची नोट उचलण्याच्या मोहात गमावले तब्बल ५ लाख रुपये; अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात घडलेल्या थरारक घटनेने व्यापारी वर्गात खळबळ!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!
- दिल्ली: मोठ्या राजकीय हालचाली! संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची शक्यता; पावसाळी सत्र अद्याप अधिकृतपणे समाप्त नाही!




























Subscribe to my channel





1 thought on “Republic Day 2026 : ध्वजारोहण सुरू असतानाच धक्कादायक घटना; पोलीस कर्मचारी अचानक कोसळला आणि क्षणातच मृत्यू, धाराशिवमधील VIDEO समोर”