
Pune : पुणे ग्रैंड चॅलेंज टूर स्टेज-४ सायकल स्पर्धा आज, शुक्रवारी (२३ जानेवारी) शहरातील मध्यवर्ती मागाँवरून पार पडणार आहे. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथून स्पर्धेला सुरुवात होईल. बाणेर-औंधमार्गे ही स्पर्धा शहराच्या मध्यभागातून जात बालगंधर्व चौक परिसरात समाप्त होणार आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी शहरात व्यापक वाहतूक बदल व निर्बंध लागू केले आहेत.
नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी खासगी वाहनांचा वापर शक्यतो टाळावा आणि आवश्यक असल्यास मेट्रोचा पर्याय वापरावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. या संदर्भात सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा आणि अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी शहरातील प्रमुख रस्त्यांवर दुपारी १२ ते चार या वेळेत गरजेनुसार टप्प्याटप्प्याने वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
मात्र, स्पर्धेचा प्रारंभ व समारोप परिसर वगळता कोणताही रस्ता ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ बंद राहणार नाही, असे मनोज पाटील यांनी स्पष्ट केले. 'स्पर्धा मार्गावर वाहने उभी करू नयेत. स्पर्धा पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी रस्त्याच्या कडेला उभारलेल्या बॅरिकेड व स्टॉपलाइनच्या मागे उभे राहावे,' असे आवाहन वाहतूक विभागाचे उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले आहे. दरम्यान, या स्पर्धेसाठी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, १२ पोलिस उपायुक्त, १९ सहायक पोलिस आयुक्त, ७८ पोलिस निरीक्षक, २४३ सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक आणि चार हजार ३८१ पोलिस अंमलदार सहभागी असणार आहेत.
बंद ठेवण्यात येणारे रस्ते
(दुपारी १२ ते ४)
राधा चौक ते पूनम बेकरी (बाणेर-सूस रस्ता), पाषाण सर्कल ते राजीव गांधी पूल (विद्यापीठ रस्ता), राजीव गांधी पूल ते सेनापती बापट जंक्शन, सेनापती बापट रस्ता ते बालभारती,लॉ कॉलेज के शेलार मामा चौक, कर्वे पुतळा चौक ते वनाझ पौड रस्ता,नळस्टॉप ते सेनादत्त पोलिस चौकी, सेनादत्त चौक ते टिळक चौक, टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, अप्पा बळवंत चौक ते राष्ट्रभूषण चौक, राष्ट्रभूषण चौक ते सावरकर चौक, सावरकर चौक ते महाराष्ट्र मित्र मंडळ, महाराष्ट्र मित्र मंडळ ते सेव्हन लव्हज चौक, सेव्हन लव्हज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक (नेहरू रस्ता), पुणे स्टेशन परिसर घोरपडी जंक्शन परिसर, लाल महल चौक ते स. गो. बर्वे चौक, न. ता. वाडी चौक ते गरवारे चौक ते बालगंधर्व चौक (स्पर्धा समाप्त)
जंगली महाराज रस्त्यावरील दुकाने बंद ?
सायकल स्पर्धेचा समारोप बालगंधर्व रंगमंदिराच्या परिसरात होणार आहे. या पार्श्वभूमीवर जंगली महाराज रस्त्यावर सकाळी नऊपासून वाहनांसाठी नो-हॉल्टिंग आणि नो-पार्किंग असणार आहे; तसेच या रस्त्यावरील दुकाने बंद ठेवण्याबाबत स्थानिक पोलिसांनी आस्थापनांना नोटीस बजावली आहे.
शहर
- टोमॅटोच्या किमती गगनाला भिडल्या! सामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकारचा 'अनुदानित' विक्रीचा मोठा निर्णय
- शेअर बाजाराची दमदार 'यु टर्न' कामगिरी; सेन्सेक्स ७९० अंकांनी वधारला, निफ्टी पुन्हा २४,००० च्या पार!
- जालन्यात खळबळ: दीड वर्षात १५ बांगलादेशी घुसखोर जेरबंद; बनावट ओळखपत्रांचे मोठे रॅकेट उघड!
- इंडिगोची एअरपोर्ट टॅक्सी सेवा सुरू! आता अवघ्या ४९ रुपयांपासून कॅब बुकिंग, प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा
महाराष्ट्र
- शेअर बाजाराची दमदार 'यु टर्न' कामगिरी; सेन्सेक्स ७९० अंकांनी वधारला, निफ्टी पुन्हा २४,००० च्या पार!
- जालन्यात खळबळ: दीड वर्षात १५ बांगलादेशी घुसखोर जेरबंद; बनावट ओळखपत्रांचे मोठे रॅकेट उघड!
- इंडिगोची एअरपोर्ट टॅक्सी सेवा सुरू! आता अवघ्या ४९ रुपयांपासून कॅब बुकिंग, प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा
- अमरावतीत अंगावर काटा आणणारी घटना! सकाळी फिरायला निघालेल्या मुलालाच आढळला वडिलांचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह; ६५ वर्षीय वृद्धाची निर्घृण हत्या
गुन्हा
- अमरावतीत अंगावर काटा आणणारी घटना! सकाळी फिरायला निघालेल्या मुलालाच आढळला वडिलांचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह; ६५ वर्षीय वृद्धाची निर्घृण हत्या
- लोहगड किल्ला हत्याकांडाचा धक्कादायक खुलासा! केतन अग्रवालचा मृत्यू 'अपघात' नसून मंगेतर आणि तिच्या प्रियकराने केलेली सुनियोजित हत्या
- मुंबई: लोकलमध्ये प्रवाशावर जीवघेणा हल्ला; दरवाजा बंद करण्याच्या वादातून तरुणावर चाकूने वार!
- गोव्यातील आलिशान सोसायटीतून चालत होते सायबर फ्रॉडचे साम्राज्य; ६.२५ कोटींचे व्यवहार उघड, १२ जणांना बेड्या
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- स्कोडाची दमदार एन्ट्री! एका चार्जवर ६४७ किमी धावणार ७-सीटर लक्झरी इलेक्ट्रिक एसयूव्ही 'पीक' (Peaq) लाँच
- उत्तर प्रदेशात खळबळ! काकी गरोदर राहिली अल्पवयीन पुतण्यामुळे; नात्याला काळीमा फासणाऱ्या प्रकरणामुळे गाव हादरले!
- प्रवाशांसाठी मोठा दिलासा! हायवेवर आता मिळणार गाडी दुरुस्ती आणि पंचरची सुविधा; NHAI चा महत्त्वाचा निर्णय
- टेलिग्रामवरील बंदी अखेर उठली; मात्र 'मेसेज एडिटिंग' फिचर ३० जूनपर्यंत बंदच राहणार
























Subscribe to my channel





1 thought on “Pune : पुण्यात आज मोठे वाहतूक बदल; मध्यवर्ती भागातील अनेक मार्गांवर परिणाम, वाहतूक पोलिसांची महत्त्वाची सूचना—‘हे’ टाळा”