
Pune : पुण्याचा कारभारी बदलून ‘किंगमेकर’ होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पुण्यात एकही जागा मिळविता आली नाही. भारतीय जनता पक्षासमवेत महायुतीत १५ जागांची ‘ऑफर’ धुडकावून स्वबळावर ११९ शिवसैनिक निवडणुकीच्या रिंगणात उतरविणाऱ्या शिवसेनेला सर्व जागांवर पराभवाचा मोठा झटका बसला असून, ‘स्वबळा’चा नारा पथ्यावर पडण्याऐवजी फासच ठरल्याचे दिसले.
महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीची घोषणा केली. पुणे महापालिका निवडणूक एकत्रित लढविण्याचा निर्णय दोन्ही पक्षांच्या शहर पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. शिवसेनेचे ‘इलेक्टिव्ह मेरिट’ लक्षात घेऊन भाजपने महापालिकेच्या १६५ जागांपैकी १६ जागा सोडण्याची तयारी दर्शवली. मात्र, शिवसेनेला २५ जागा हव्या होत्या.
|
|
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना अपेक्षित असलेल्या जागा सोडण्यास भाजपचा ठाम विरोध होता; तर भाजपकडून सन्मानजनक जागा दिल्या जात नसल्याचा रोष शिवसेनेचे पदाधिकारी व्यक्त करीत होते. परिणामी, महायुतीच्या जागावाटपाचा तिढा शेवटपर्यंत सुटला नाही. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपत असतानाच शिवसेनेने एबी फॉर्मची खिरापत वाटून ११९ उमेदवारांना लढण्यासाठी सज्ज केले. त्यानंतरही शिवसेनेचे नेते उदय सामंत यांच्याकडून महायुती अभेद्यच असल्याचे दावे केले जात होते; तर स्थानिक पदाधिकारी ‘राष्ट्रवादी काँग्रेस’समवेत जाण्याची चाचपणी करीत राहिले. अखेरीस शिवसेनेने एकूण ४१पैकी ३९ प्रभागांत आपले उमेदवार उभे केले. त्यात १५ प्रभागांमध्ये सेनेने संपूर्ण पॅनेल उतरविले.
पुण्याचा सर्वांगीण विकास आणि एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर असताना सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या प्रचारावर सेनेच्या उमेदवारांनी मतांचा जोगवा मागितला. आक्रमक प्रचारासाठी प्रसिद्ध असलेल्या शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी निवडणूक प्रचारात प्रतिस्पर्धी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करणे पूर्ण टाळले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कात्रज आणि नाना पेठेत जाहीर सभा घेतल्या.
पुणे शहर गुन्हेगारीमुक्त, भ्रष्टाचारमुक्त, झोपडपट्टीमुक्त, वाहतूक कोंडीमुक्त करण्याचे आश्वासन देतानाच ‘पाण्याचे मीटर’ काढून फेकून देण्याची घोषणा केली. मंत्री उदय सामंत यांनी पदाधिकाऱ्यांचे मेळावे घेतले. नेत्या नीलम गोऱ्हे, गुलाबराव पाटील यांनीही सेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेतल्या. मात्र, मतदारांनी मतपेटीतून ‘धनुष्यबाणा’ला पाठबळ दिले नाही. ‘लाडकी बहीण’चा करिष्माही पुण्यात चालला नाही. त्यामुळे पुण्याची राजकीय समज ही आर्थिक लाभापेक्षा स्थानिक नेतृत्व आणि पक्षीय बांधणीवर अधिक अवलंबून असल्याचे अधोरेखित झाले.
ही ठरली पराभवाची कारणे...
पक्षांतर्गत धुसफूस हेदेखील शिवसेनेच्या पराभवाचे मोठे कारण ठरले.
तिकीट वाटपावरून निष्ठावंत कार्यकत्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्य निवासस्थानाबाहेर आंदोलने केली.
पक्षाच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या भांडणातून अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले. निवडणूक प्रचारातही पदाधिकाऱ्यांची एकजूट दिसली नाही.
परिणामी पक्षाचे शहरप्रमुख प्रमोद उर्फ नाना भानगिरे यांना स्वतःची जागा राखता आली नाही. महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांची पत्नी प्रतिभा आणि चिरंजीव प्रणव धंगेकर यांना पराभवाचा सामना करावा लागला.
निवडणुकीच्या तोंडावर धनुष्यबाण उचलणाऱ्या आबा बागूल यांना निकालात तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळाले.
एकंदरीतच पुण्याचा 'कारभारी' बदलायला निघालेल्या शिवसेनेला पुणेकरांनी 'पाहुण्या'चीच वागणूक दिली. या मानहानीकारक पराभवानंतर पक्षाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे पक्षाच्या शहर नेतृत्वात खांदेपालट करण्याची शक्यता आहे.
शहर
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- पुणे: आषाढी वारीची सांगता! 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषाने देहूनगरी दुमदुमली, तुकोबा पोहोचले देहूला.
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
- चंद्रपूर: अंगणवाडीतील पोषण आहाराच्या तांदळात आढळले जिवंत किडे; प्रयोगशाळेकडून तांदूळ 'असुरक्षित' घोषित.
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: आंबोलीत मन हेलावणारी दुर्घटना: धबधब्यावर सर्पदंश झालेल्या पर्यटकाचा वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने उपचाराअभावी मृत्यू
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- जळगाव: जामनेर आगारातून नवी कोरी एसटी बस लांबवली; बसचे चाक पंक्चर होताच चोरट्याने रस्त्यातच सोडली!
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
गुन्हा
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.
- पुणे: माणुसकी वेशीवर! पुण्यातील खराडी येथे मुळा-मुठा नदीपात्रात आढळला नवजात चिमुकलीचा मृतदेह; पोलिसांनी सुरू केला सखोल तपास.
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- बिहार: आईच्या उपचारासाठी जमीन गहाण ठेवली, एका गायीपासून सुरू केला प्रवास; बिहारच्या रोशन कुमार यांची प्रेरणादायी यशोगाथा.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.



























Subscribe to my channel




1 thought on “Pune Election Results : पुण्यात शिंदे गटाला मोठा धक्का; शिवसेनेचा सर्व जागांवर पराभव, नेमकं काय चुकलं?”