
Pune : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत कोथरुड विधानसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मोठे भगदाड पडले आहे. प्रभाग क्रमांक ९ आणि ११ मधील उबाठा गटाच्या अधिकृत आणि बंडखोर उमेदवारांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला असून, यामुळे कोथरुडमध्ये भाजपची ताकद कित्येक पटीने वाढली आहे.
या राजकीय घडामोडीत प्रभाग ९ मधील उबाठा गटाचे बंडखोर उमेदवार महेश सुतार आणि पूजा सुतार, तसेच नियोजन समितीचे सदस्य सुखदेव तापकीर यांनी भाजपचा झेंडा हाती धरला. त्याचप्रमाणे प्रभाग ११ मधून उबाठा गटाचे अधिकृत उमेदवार बाळासाहेब धनवडे, विद्यार्थी सेनेचे अमर गायकवाड आणि माजी नगरसेवक पैलवान दिलीपदादा गायकवाड यांनीही आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करत महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला.
|
|
चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या पुणे येथील निवासस्थानी सर्व नूतन सदस्यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, "भाजपचे दोन उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत आणि आता या महत्त्वाच्या पक्षप्रवेशांमुळे भाजपच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले आहे. ही केवळ सुरुवात असून आगामी काळात भाजप महापालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवेल."
या प्रसंगी भाजपचे उमेदवार लहू बालवडकर, गणेश कळमकर, रोहिणी चिमटे, अजय मारणे, अभिजीत राऊत यांसह डॉ. संदीप बुटाला, प्रकाशतात्या बालवडकर आणि इतर प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर उबाठा गटाच्या उमेदवारांनीच साथ सोडल्याने या प्रभागांमध्ये भाजपचे पारडे आता जड झाले आहे.
अर्जमाघारी उलटली, मग आता पुढे काय?
दरम्यान, अर्जमाघारीची मुदत उलटून गेल्यामुळे आता ईव्हीएमवर ठाकरे गटाच्या उमेदवारांची नावं असतीलच. त्यामुळे मतदारांना संबंधित उमेदवारांच्या नावापुढे मशालीचं चिन्ह आणि मतदानाचा पर्याय उपलब्ध राहील. परंतु, पक्षांतर करणारे उमेदवार प्रचाराच्या उर्वरित काळात "भाजपला मतदान करा, आमच्या नावासमोरील किंवा मशाल चिन्हापुढील बटण दाबू नका", असे आवाहन करताना दिसतील.
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल


























Subscribe to my channel




1 thought on “Pune : ठाकरेंना पुण्यात धक्का, कोथरुडमध्ये 'मशाल' विझली, अधिकृत उमेदवारांचा भाजप प्रवेश; राजकारणात गोंधळ कायम”