
Mumbai : मुंबईतील भांडूप रेल्वे स्टेशनबाहेर सोमवारी रात्री बेस्ट बसने १३ मुंबईकरांना चिरडले. काम संपल्यानंतर घराकडे जाण्यासाठी रांगेत उभे असणाऱ्या मुंबईकरांवर काळाने घाला घातला. ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यामध्ये ३ महिलांचा समावेश होता. मृतामध्ये २४ वर्षाच्या वर्षा सावंत यांचाही समावेश होता. त्या टाटा हॉस्पिटलमध्ये नर्सचे काम करत होत्या. रूग्णासाठी जिवाचे अहोरात्र झटणाऱ्या वर्षाचा मात्र रूग्णालयात पोहचण्यापूर्वीच मृत्यू झाला. वर्षा सावंत भांडूपमधून घराकडे निघाल्या होत्या. पण त्याचवेळी बसने चिरडले अन् त्यांचा मृत्यू झाला. साताऱ्यातील एका लग्नाहून वर्षा आली होती, ती घराकडे जात होती. पण वाटातेच काळाने गाठले.
२४ वर्षांच्या वर्षा सावंत या मागील काही दिवसांपासून टाटा हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून कार्यरत होत्या. भावाच्या सुट्टीसाठी त्या सुट्टीवर होत्या. साताऱ्यातील लग्न आटोपून वर्षा सोमवार मुंबईत परतल्या होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी कामावर जायचं, हा विचार वर्षाच्या मनात घोंगावत होता. त्या भांडूप रेल्वे स्टेशनबाहेर बसच्या रांगेत उभ्या होत्या. मुलगी गावाकडून घरी येणार म्हणून कुटुंबाकडून काळजीपोटी फोन केला जात होता. पण फोन उचललाच जात नव्हता. कारण, रांगेत उभ्या असलेल्या वर्षा सावंत आणि आणखी १२ जणांना बेस्ट बसने चिरडले होते. एका अनोळखी व्यक्तीने वर्षाच्या कुटुंबियांचा फोन उचलला अन् घडलेली घटना सांगितली. वर्षाचा अपघात झालाय, हे ऐकताच बापाच्या पायाखालून वाळू सरकली. वर्षाची आई आणि बहीण सातऱ्याहून निघाले होते, ते बसमध्येच होते. त्यांना याबाबत काहीच माहिती नव्हते.
|
|
अपघातानंतर वर्षाला मुलुंड येथील एमटी अग्रवाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु यश आले नाही. उपचारावेळीच तिचा मृत्यू झाला. वडील, मित्र आणि नातेवाईकांनी राजावाडी रुग्णालयाच्या पोस्टमार्टम केंद्रात तिचा मृतदेह आणला, त्यावेळी तिची आई आणि धाकटी बहीण साताराहून मुंबईकडे येत होते. वर्षा सावंत यांच्या पश्चात् आई-वडील आणि दोन बहिणी असा परिवार आहे.
बेस्ट अपघातात ४ जणांचा मृत्यू -
सोमवारी रात्री साडेनऊ वाजताच्या आसपास भांडूप रेल्वे स्टेशनबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. मुंबईकर घराकडे जाण्यासाठी रांगेत उभे होते. काही दुकानाबाहेर होते. त्याचवेळी बेस्ट बस चालकाचा युटर्न चुकला अन् १३ जणांना चिरडले. यामध्ये ३ महिला आणि एका पुरूषाचा मृत्यू झाला. प्रणिता संदीप रसम (वय ३५), वर्षा सावंत (वय २५) - , मानसी मेघश्याम गुरव (वय ४९) आणि प्रशांत शिंदे (वय ५३) अशी मृताची नावे आहेत.
जखमींची प्रकृती आणि रुग्णालयानुसार तपशील:
एम.टी. अगरवाल रुग्णालय (स्थिर प्रकृती):
नारायण भिकाजी कांबळे (वय ५९)
मंगेश मुकुंद दुखंडे (वय ४५)
ज्योती विष्णू शिर्के (वय ५५)
सायन रुग्णालय (किरकोळ दुखापत):
शितल प्रकाश हडवे (वय ३९)
रामदास शंकर रुपे (वय ५९)
मिनाज रुग्णालय, भांडूप (खाजगी):
दिनेश विनायक सावंत (वय ४९)
पूर्वा संदीप रसम (वय १२)
फोर्टिस आणि हिरा मोंगी रुग्णालय:
प्रताप गोपाळ कोरपे (वय ६०) - फोर्टिस रुग्णालय (स्थिर)
रवींद्र सेवाराम घाडिगावकर (वय ५६) - हिरा मोंगी रुग्णालय (स्थिर)
राजावाडी रुग्णालय:
प्रशांत दत्ताराम लाड (वय ५१) - यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याविरुद्ध (DAMA) डिस्चार्ज घेतला आहे.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



