Chennai : भीषण अपघात: दोन बसांची समोरासमोर धडक; हृदयद्रावक घटना 6 जणांचा मृत्यू, 50 हून अधिक जखमी


Chennai : तामिळनाडूच्या तेनकासी जिल्ह्यात सोमवारी दोन बसचा भीषण अपघात झाला. दोन बसची समोरासमोर धडक झाली. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला असून ५० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक खासगी बस मदुराईहून सेनकोट्टाईच्या दिशेनं जात होती. त्याच सुमारास दुसरी बस टेनकासीहून कोविलपट्टीला निघाली होती. या दोन बसची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन्ही बसचं मोठं नुकसान झालं. त्यानंतर स्थानिक अधिकारी आणि अग्निशमन दलाचे अधिकारी अपघातस्थळी पोहोचले. त्यांनी मदत आणि बचावकार्य सुरु केलं.

Pune : मोजणी थेट रद्द करण्याचा निर्णय; हद्द कायम न केलेल्या बांधकाम प्रकल्पांवर प्रशासनाची कठोर कारवाई निर्णयाच्या उंबरठ्यावर

मदुराईहून सेनकोट्टाईच्या दिशेनं जाणाऱ्या बसचा चालक बेजबाबदारपणे वाहन चालवत होता. तो बस भरधाव वेगानं दामटत होता, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं दिली. बसचा वेग जास्त असल्यानं हा अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला असून ५३ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काही जणांचा प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पोलिसांनी अपघाताचा तपास सुरु केला आहे. सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले जात आहेत. प्रत्यक्षदर्शींकडून माहिती घेतली जात आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. जखमींना तातडीनं उपचार देण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. अपघात स्थळाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात पोलिसांचं पथक बुलडोझरच्या मदतीनं बचावकार्य राबवत असताना दिसत आहे. घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अपघातात दोन्ही बसचं मोठं नुकसान झालं आहे.

उत्तराखंडमध्येही भीषण अपघात झाला आहे. टिहरी जिल्ह्यातील नरेंद्र नगर परिसरात येणाऱ्या कुंजापुरी-हिंडोलाखाल भागात एक बस खोल दरीत कोसळली. या बसमध्ये २८ प्रवासी होते. या अपघातात ५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *