
Mumbai : सिडकोच्या इतिहासात प्रथमच "प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य" तत्त्वावर ४.५०८ घरांची गृहनिर्माण योजना जाहीर करण्यात आली आहे. शनिवारी २२ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ०४.०० वाजेपासून योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीस सुरुवात होणार आहे. या योजनेंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गट यांकरिता नवी मुंबईतील तळोजा, द्रोणागिरी, घणसोली, खारघर आणि कळंबोली येथील सिडकोच्या गृहसंकुलांतील ४,५०८ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्यात. अर्जदारांना प्रथमच स्वत:च्या पसंतीची सदनिका निवडण्याचे स्वातंत्र्य हे या योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य असणार आहे.
“सिडकोच्या सोयी सुविधांनी सुसज्ज गृहसंकुलांतील ४,५०८ सदनिका या योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात आल्यात. या योजनेकरिता सोडत किंवा लॉटरी नसून आपल्या पसंतीची सदनिका निवडण्याचे स्वातंत्र्य अर्जदारांना देण्यात आले आहे. यामुळे त्यांना आपल्या स्वप्नातील घर साकारता येणार आहे.
|
Dubai : तेजस लढाऊ विमान कोसळून पायलटचा मृत्यू; टेकऑफपासून क्रॅशपर्यंतचा थरारक VIDEO समोर आला |
पुन्हा एकदा सर्वसामान्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या व देशातील सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक असलेल्या नवी मुंबईमध्ये आपले घर घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. याकरिता अधिकाधिक नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आपण आवाहन करतो, असं विजय सिंघल उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको म्हणालेत.
सिडकोतर्फे सातत्याने विविध आर्थिक उत्पन्न गटांतील नागरिकांकरिता गृहनिर्माण योजनांद्वारे परवडणाऱ्या दरातील घरे उपलब्ध करून देण्यात येतात. या योजनेंतर्गत तळोजा, द्रोणागिरी, घणसोली, खारघर आणि कळंबोली येथील सिडकोच्या गृहसंकुलांतील उर्वरित ४,५०८ सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. एकूण ४,५०८ सदनिकांपैकी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता १,११५ तर अल्प उत्पन्न गटाकरिता ३,३९३ सदनिका उपलब्ध आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सदनिकांकरिता प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत रु. २.५० लाख अनुदान उपलब्ध आहे.
सदर योजनेतील सदनिका या तयार (रेडी टू मूव्ह) असून अर्जदारांना त्यांच्या पसंतीची सदनिका निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर सदनिकांची विक्री करण्यात येणार आहे. सदनिकेच्या किंमतीच्या संपूर्ण रकमेचा भरणा केल्यानंतर अर्जदारांना लगेच सदनिकेचा ताबा देण्यात येणार आहे. कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर पात्र अर्जदारांना त्यांच्या पसंतीची सदनिका निवडण्याची संधी मिळणार आहे.
या योजनेतील सर्व गृहसंकुले ही नवी मुंबईतील विकसित नोडमध्ये आहेत. या परिसरामध्ये सर्व मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून नजीच्या अंतरावर असलेल्या या गृहसंकुलांना उपनगरीय रेल्वे, मेट्रो आणि महामार्ग यांद्वारे उत्तम कनेक्टिव्हिटी लाभली आहे.
ऑनलाइन अर्ज नोंदणीकरिता cidcofcfs.cidcoindia.com हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. योजनेचा सविस्तर तपशील देण्यात आलाय. सदनिकेचे क्षेत्रफळ, किंमत इ. देखील सदर संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. ऑनलाइन अर्ज नोंदणी दि. २२ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी चार वाजेपासून सुरू होणार आहे. दि. २१ डिसेंबर २०२५ पर्यंत नोंदणी केलेल्या पात्र अर्जदारांना दि. २८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजेपासून त्यांच्या पसंतीच्या सदनिकेची निवड करता येणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर सदनिकांची विक्री केली जाणार असल्याने अर्जदारांनी उपरोक्त कालावधीमध्ये, लवकरात लवकर अर्ज करून आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करावे, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!



























Subscribe to my channel

