Pune : पोलिस स्मृतीदिनानिमित्त पुण्यात हुतात्म्यांना आदरांजली; उपमुख्यमंत्र्यांकडून पुष्पचक्र अर्पण

Pune : देशासाठी प्राणार्पण केलेल्या शूर पोलिस जवानांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी पाषाण येथे मंगळवारी (ता. २१) पोलिस स्मृतीदिनानिमित्त शोक कवायतीचे आयोजन करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पोलिस स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. या प्रसंगी राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि कुटुंबीय उपस्थित होते.

लडाखमधील हॉटस्प्रिंग येथे २१ ऑक्टोबर १९५९ रोजी चिनी सैन्याने केंद्रीय निमलष्करी पोलिस दलाच्या तुकडीवर हल्ला केला. या हल्ल्यात दहा पोलिस जवानांनी वीरमरण पत्करले. त्यांच्या शौर्याची आठवण ठेवण्यासाठी दरवर्षी २१ ऑक्टोबर हा दिवस 'पोलिस स्मृतीदिन' म्हणून देशभर पाळला जातो. या दिवशी देशाच्या सेवेत प्राणार्पण केलेल्या सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना आदरांजली अर्पण करण्यात येते.

Pune : फुरसुंगी नगरपरिषद निवडणुकीसाठी महापालिकेचे ३५ कर्मचारी नियुक्त

पुणे पोलिसांकडून पाषाण येथील पोलिस संशोधन केंद्रात सकाळी शोक कवायतीचे आयोजन करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्मृतीस्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. त्यानंतर उपस्थित पोलिस जवानांनी बंदुकीतून फैरी झाडून हुतात्म्यांना मानवंदना दिली.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक सुनील रामानंद, दळणवळण, माहिती-तंत्रज्ञान व परिवहन विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक दीपक पांडे, पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल आदी यावेळी उपस्थित होते.

 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *