
Mumbai : डोंबिवलीजवळील कोपर रेल्वे स्थानकावरून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका अज्ञात व्यक्तीनं भरधाव एक्सप्रेससमोर उडी मारून आयुष्य संपवलं आहे. ही घटना रविवारी दुपारी घडली असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे रेल्वे वाहतूक काही काळासाठी रखडली होती. मात्र, त्यानंतर सुरळीत झाली. धडकेमुळे तो व्यक्ती काही फूट दूर फेकला गेला. यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. रूग्णालयात नेले असता डॉक्टरांनीही त्याला मृत घोषित केले. त्या व्यक्तीनं आत्महत्या का केली? भरधाव एक्सप्रेससमोर उडी घेण्यामागचं कारण काय? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कोपर रेल्वे स्थानकावर तो व्यक्ती काही वेळ प्लॅटफॉर्मवर इकडे - तिकडे फिरताना दिसला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तो शांत दिसत होता. त्याच्याकडे बॅग होती. अचानक तो प्लॅटफॉर्मवरून खाली उतरला. स्टेशनच्या पूर्वेच्या दिशेनं चालू लागला. कल्याणहून एक भरधाव एक्स्प्रेस आली. एक्स्प्रेस ट्रेन येताच त्यानं रेल्वे रूळावर उडी मारली'.
'ही घटना आत्महत्याचं असल्याचं दिसून येत आहे. पुढील तपासात नेमके कारण समोर येईल', असं अधिकारी म्हणाले. भरधाव एक्स्प्रेस कोपर रेल्वे स्थानकावर दाखल होताच त्या व्यक्तीनं उडी घेतल्यामुळे तो दूरवर फेकला गेला. तो थेट रेल्वे रूळावर पडला. यातच त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) कर्मचाऱ्यांनी आणि कर्तव्यावर असलेल्या कमांडोंनी जीआरपीला माहिती दिली.
जीआरपीनं घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह रूग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासून त्या व्यक्तीला मृत घोषित केले. जीआरपीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'मृत व्यक्तीचे वय सुमारे ३५ वर्षे असल्याचं दिसून येत आहे. त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. आम्ही या घटनेची अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. कोणतीही सुसाईड नोट किंवा ओळखपत्र सापडले नाही. आत्महत्यामागील कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहे', अशी माहिती त्यांनी दिली.
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel




