
Uddhav Thackeray : राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. या पूरस्थितीत राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मदतकार्य सुरु आहे. दुसरीकडे अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून शेतकऱ्यांना कर्जमाफीची मागणी केली जात आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांकडून कर्जमाफीबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. याच कर्जमाफीवरून उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. शेतकरी भाजपमध्ये आले तर कर्जमाफी, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी दसरामेळाव्याआधी भाजपला टोला लगावला आहे.
ठाकरे गटाचा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी ठाकरे गटाने जोरदार तयारी केली आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. मात्र, दसरा मेळाव्याआधीच उद्धव ठाकरे यांनी राज्यातील अतिवृष्टी आणि कर्जमाफीवर भाजपवर निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, 'महाराष्ट्रात अतिवृष्टीचं संकट आहे. गेल्या आठवड्यात अतिवृष्टीच्या ठिकाणी जाऊन आलो. त्यावेळी तुमच्याशी बोललो. मी सरकारला विनंती केली की, आपण एकत्र येऊन मार्ग काढण्याचा विचार करू. परंतु सरकारची तयारी दिसत नाही. मुख्यमंत्री हे त्यांच्या जाहिरातीत व्यग्र आहे. दुसरे उपमुख्यमंत्री मदतीच्या पाकिटावर फोटो छापण्यात व्यग्र आहे. तिसरे उपमुख्यमंत्री अंगाला काहीच लावून घेत नाही. कोणताही विषय आला, तेव्हा दुसरे उपमुख्यमंत्री दिसत नाही'.
'काही साखरसम्राट भाजपमध्ये गेले. त्यानंतर त्यांनी शेकडो करोडो रुपयांवर थकहमी मिळवली. आमची गोरगरीब शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी मागत आहोत. कर्जासाठी जमीन, बैल, पत्नीचं मंगळसूत्र गहान ठेवावं लागतं. काही तरी गहाण ठेवल्याशिवाय कर्ज मिळत नाही. त्यांच्या कर्जाची हमी सरकार घेत नाही. अतिवृष्टीतमुळे शेतकरी कर्जाखाली दबले गेले आहेत. साखरसम्राटांची थकहमी सरकार घेत आहे. मग शेतकरी भाजपमध्ये आले तरच सरकार कर्जमाफी देईल का? याची वाट सरकार पाहत आहे का? ही अत्यंत संतापजनक बाब आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel




