
Maharashtra Mahayuti strategy for local body elections : महानगर पालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजलेय. नाव्हेंबरपासून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. त्याआधी महायुतीने जुळवाजुळव सुरू केली आहे. ज्या ठिकाणी शक्य आहे, त्या ठिकामी महायुतीने एकत्र निवडणूक लढण्यावर जोर दिला आहे. तर काही ठिकाणी महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये ठाकरेंच्याविरोधात महायुती ताकदीने लढणार आहे. बीएमसीवर सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप अन् शिंदेंनी कंबर कसली आहे. तर ठाण्यामध्ये महायुती स्वतंत्र मैत्रीपूर्ण लढती होण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकींबाबात भाजपकडून तसे संकेत मिळत आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता रंगतदार होणार, यात काही शंकाच नाही.
मुंबईत एकत्र, ठाण्यात स्वतंत्र?
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि मनपा निवडणुका ३१ जानेवारी २०२६ च्या आधी पार पडणार आहे. आयोग आणि राज्य सरकारकडून तशी तयारी करण्यात आली आहे. महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नोव्हेंबरनंतर घेण्यात येतील. ठाकरेंचं वचर्स्व असलेली मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांची महायुती एकत्रित लढेल. तर ठाणे महापालिका निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र व शिवसेना स्वतंत्रपणे रिंगणात उतरणार असल्याचे संकेत भाजपकडून मिळाले आहेत.
निवडणुका कधी होणार?
दिवाळीनंतर राज्यात निवडणुका होतील. नोव्हेंबरनंतर दोन ते तीन टप्प्यात राज्यातील निवडणुका होण्याची शक्यता आहे. काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती ताकदीने मैदानात उतरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर ठाणे अन् इतर काही भागात महायुती स्वतंत्र मैदानात उतरू शकते, असेही सांगण्यात येतेय. मुंबईमध्ये ठाकरेंची ताकद जास्त आहे. त्यात राज ठाकरेंसोबत संभाव्य युतीची चर्चा सुरू आहे. त्यामुळे ठाकरेंची ताकद आणखी वाढणार आहे. अशात महायुतीनेही आपल्या बाजूने एकत्र, ताकदीने लढण्यावर भर देण्याचा प्लॅन आखल्याचे सांगण्यात येतेय. ज्या ठिकाणी युती शक्य नाही, त्या मनपामध्ये मैत्रीपूर्ण लढती होतील, असं समजतेय.
कुठे भाजप-राष्ट्रवादी, तर कुठे भाजप-शिवसेना..
मुंबई मनपा निवडणुकीत ठाकरेंना शह देण्यासाठी महायुतीने एकत्र लढण्यावर जोर दिल्याचे सांगण्यात येतेय. पण काही ठिकाणी भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काही ठिकाणी भाजप शिवसेना अशी युती होऊ शकते, असे सांगण्यात येतेय. ठाण्यामध्ये शिंदेंनी स्वतंत्र लढण्यावर जोर दिलाय. तर पिंपरी चिंचवड, पुणे या मनपामध्ये अजित पवार स्वतंत्र लढण्याचा विचार करत असल्याचे समजतेय. छत्रपती संभाजीनगर, नागपूर यासारख्या महत्त्वाच्या मनपाबाबत महायुतीमध्ये चर्चा सुरू आहे.
शहर
- नक्कीच पुढच्या जन्मी डॉक्टर बनेल... वैद्यकीय परीक्षेच्या तणावातून १९ वर्षीय सूरजचे टोकाचे पाऊल!
- पुणे: कोल्हापूरकरांसाठी विशेष गाडी झाली कायमची डेली एक्स्प्रेस
- हिंमत असेल तर मुंबईतील दहीहंडी बंद करून दाखवा! पुण्यातील गणेशोत्सवावर निर्बंध आणणाऱ्या पोलिसांना भाजप शहराध्यक्षांचा थेट इशारा!
- पुणे: मावळमध्ये प्रसूतीदरम्यान मातेचा आणि बाळाचा मृत्यू; मायमर हॉस्पिटलवर नातेवाईकांचे गंभीर आरोप!
महाराष्ट्र
- पुणे: कोल्हापूरकरांसाठी विशेष गाडी झाली कायमची डेली एक्स्प्रेस
- हिंमत असेल तर मुंबईतील दहीहंडी बंद करून दाखवा! पुण्यातील गणेशोत्सवावर निर्बंध आणणाऱ्या पोलिसांना भाजप शहराध्यक्षांचा थेट इशारा!
- पुणे: मावळमध्ये प्रसूतीदरम्यान मातेचा आणि बाळाचा मृत्यू; मायमर हॉस्पिटलवर नातेवाईकांचे गंभीर आरोप!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
गुन्हा
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
- कचरा वादातून अमानुष हत्या! कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू, हातोडी-चाकूच्या हल्ल्याने सांगली हादरली
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!
- पश्चिम बंगाल: परवाना नाही, एनओसी नाही आणि सुरक्षेची साधनेही नाहीत; कोलकातामधील भीषण हॉटेल आगीत ९ बांगलादेशी पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू!
- नवी दिल्ली: बार्कच्या शास्त्रज्ञापासून थेट पंतप्रधान मोदींच्या खाजगी सचिवापर्यंत; आयएफएस निधी तिवारी यांची प्रेरणादायी यशोगाथा!
- नवी दिल्ली: फाशीऐवजी विषारी इंजेक्शन देण्याची मागणी; मृत्युदंडाच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल

























Subscribe to my channel




