
21-year-old Avinash Dodmane killed in Mumbai Pune highway accident : मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात २१ वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाला. मावळ नजीकच्या जांभूळ फाटा येथील माऊली हॉटेल समोर रात्री साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाल्याचे समोर आलेय. भरधाव वेगात आलेल्या हायवाच्या धडकेत मोटारसायकलस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर हायवा चालक वाहनासह पसार झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटानस्थळी धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून वाहन चालकाचा तपास करण्यात येत आहे.
भीषण अपघातामधील मृत तरुणाचे नाव अविनाश चंद्रकांत दोडमणे (वय 21, रा. शिवतेजनगर, बिबेवाडी, पुणे) असे आहे. तो आपल्या एमएच-14 एलवाय 3205 या क्रमांकाच्या दुचाकीवरून रस्ता ओलांडत होता. त्यावेळी हा दुर्दैवी अपघात झाल्याचे समजतेय. या धडकेत त्याच्या पोटाला व हाताला गंभीर दुखापत झाली. धडक इतकी भयंकर होती की तरूणाचा जागीच मृत्यू झाला. मोटारसायकलचाही चक्काचूर झाला आहे. बिबेवाडीमध्ये या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तरूण कामावरून घराकडे येत होता, त्यावेळी काळाने घाला घातला.
या प्रकरणी मृताचा चुलत भाऊ कुमार जयभीम दोडमणे (वय 28, रा. शिवतेजनगर, बिबेवाडी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात हायवा चालकाने निष्काळजीपणे, अविचाराने व भरधाव वेगात वाहन चालवून अपघात घडवला म्हणून गुन्हा झाला आहे. या घटनेवरून वडगाव पोलीस ठाण्यात गु.र.नं. 270/2025 भा.दं.सं. कलम 281, 125 (ब), 106, 324 (4), मो.वा.का. कलम 184 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम करीत आहे.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

