Pune : पुण्यात उच्चभ्रू परिसरात रेव्ह पार्टी, पोलिसांनी मध्यरात्री धाड टाकली, ३ महिला अन् २ पुरूषांना बेड्या

 Pune : पुण्यातील उच्चभ्रू खराडी परिसरात हाउस पार्टीच्या नावाखाली सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने छापेमारी करत कारवाई केली. या धाडीत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ, दारू आणि हुक्का जप्त करण्यात आले. ही पार्टी खराडीतील एका फ्लॅटमध्ये आयोजित करण्यात आली होती, जिथे अवैधरित्या अमली पदार्थांचे सेवन आणि दारूचा मारा सुरू होता.

मिळालेल्या माहितीनुसार, खराडीमधील या रेव्ह पार्टीत तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश होता. गुप्त माहितीच्या आधारे रात्री उशिरा घातलेल्या छाप्यात पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले. जप्त करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये अमली पदार्थ, हुक्का आणि दारूचा समावेश आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या अमली पदार्थांचे स्रोत आणि त्यांचा पुरवठा याबाबत सखोल चौकशी करण्यात येत आहे.

Kalyan News : मराठी तरुणीला मारहाण करणाऱ्या गोकुळचा मुक्काम तुरुंगातच, १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

दरम्यान, पुणे शहरातील वाढत्या अमली पदार्थांच्या वापरामुळे नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. रेव्ह पार्टीच्या या घटनेमुळे खराडी परिसरातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेमुळे शहरातील अमली पदार्थांची साखळी आणि परिसरातील सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. खराडीमधील रेव्ह पार्टीसंदर्भात पोलिसांनी तीन महिला आणि दोन पुरूषांना अटक केली आहे. सध्या त्यांची चौकशी करण्यात येत आहे. अमली पदार्थ आणि इतर गोष्टींबाबत त्यांची कसून चौकशी पोलीस करत आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *