Maharashtra politics : पांडुरंगाच्या मर्जीने महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होईल, अजित पवारांच्या शिलेदारांचा मोठा दावा

Will Ajit Pawar become Chief Minister by next Ashadhi Ekadashi? राज्याच्या राजकारणात येत्या वर्षभरात मोठी राजकीय लथापाल होईल, तेही पांडुरंगाच्या मर्जीने असा मोठा दावा राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. त्यांच्या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आमदार अमोल मिटकरी आज विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपुरात आले होते. पुढच्या वर्षी आषाढीची विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्याचा मान मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांना मिळावा, असं साकडं घातल्याचे मिटकरी यांनी सांगितले.

राज्याच्या राजकारणात असा कोणता चमत्कार होणार आहे की त्यामुळे अजित पवार मुख्यमंत्री म्हणून विठ्ठलाची शासकीय महापूजा करतील असं आमदार मिटकरी यांना विचारले. त्यावर त्यांनी थेट पांडुरंगाच्या मर्जीने राज्याच्या राजकारणात उलथापालथ होईल आणि अजित पवार मुख्यमंत्री म्हणून पंढरीला येतील असा दावा केला आहे. अमोल मिटकरींच्या वक्तव्यानंतर राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

मी एक अजित पवारांचा भक्त आहे. माझा नेत्याने मुख्यमंत्री म्हणून विठ्ठलाची शासकीय महापूजा करावी असं मला‌ वाटल म्हणून मी आज देवाला साकडं घातलं आहे. असं साकडं अनेक जण देवाला घालतात. येणारे भाविक भक्त ही पाऊस, पाणी भरपूर पडू दे... शेती चांगली पिकू दे असे देवाला साकडं घालतात. त्याच पद्धतीने मी माझा नेत्यांसाठी देवाला साकड घातल्याचे ही त्यांनी सांगितले. आमदार अमोल मिटकरी यांच्या वक्तव्या नंतर भाजपचे पदाधिकार्यांनी मात्र नाराजी व्यक्त करत आहेत.

पुढच्या आषाढी एकादशीला पंढरपूरच्या पांडुरंगाची शासकीय महापूजा करण्याचा मान मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांना सपत्निक मिळावा, असं साकडं मिटकरींनी विठ्ठलाला घातलं. एरव्ही सध्या महायुतीत मुख्यमंत्रीपदावरून कोणतीच चर्चा नसताना मिटकरींच्या या वक्तव्यावरून महायुतीत धुसफूस होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.. दरम्यान, याआधी अनेकदा अमोल मिटकरींनी अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाबद्दल आपली ईच्छा बोलून दाखवली होती.

 

 

 

 

 

 

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *