Shocking : बायको बॉयफ्रेंडसोबत रंगात, बेडरुममधील फोटो हळूच नवऱ्याला पाठवला; संतापलेला पती सासरी गेला अन्...

Nadia : पश्चिम बंगालच्या नदिया जिल्ह्यातील येथील हावडा येथील रहिवासी शुभेंदु साहा याच्या रहस्यमय मृत्यूने परिसरात खळबळ उडाली आहे. शुभेंदु याच्या मृत्यू प्रकरणी पत्नी आणि तिच्या कुटुंबावर हत्येचा आरोप ठेवत नदिया जिल्ह्यातील हरणघाटा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. हावड्यातील शियालदांगा येथील रहिवासी शुभेंदु साहा याचं नदियातील उमा देवी हिच्याशी लग्न झालं होतं. कुटुंबीयांचा आरोप आहे की, लग्नानंतरही उमा देवीचे तिच्या जुन्या प्रियकराशी संबंध होते. शुभेंदु याच्या मोबाइलवर उमा देवी आणि तिच्या प्रियकराचे अनेक खासगी फोटो पाठवलेले असायचे. ते पाहून शुभेंदु मानसिक तणावात राहायचा.

सुमारे दोन महिन्यांपूर्वी कौटुंबिक वादानंतर उमा देवी आपल्या माहेरी नदियाला गेली होती. शुभेंदु दर रविवारी आपली पत्नी आणि मुलांना भेटण्यासाठी जायचा. गेल्या रविवारीही तो भेटण्यासाठी गेला होता, पण सोमवारी त्याच्या सासरकडून त्याच्या मृत्यूची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली. शुभेंदु याच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, त्याला बेदम मारहाण करून मारण्यात आलं आहे. मृतदेहावर अनेक ठिकाणी जखमांचे निशाण आहेत. दुसरीकडे, पत्नी उमा देवी यांचा दावा आहे की, शुभेंदु नेहमी तिला मारहाण करायचा आणि त्या दिवशीही त्याने मारहाण केली. त्यानंतर शुभेंदु छतावर गेला आणि तिथे त्याने आत्महत्या केली.

शुभेंदु याच्या कुटुंबीयांनी उमा देवी आणि तिच्या माहेरील अनेक सदस्यांविरुद्ध हरणघाटा पोलीस ठाण्यात हत्येच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. कुटुंबाचं असंही म्हणणं आहे की, उमा देवीचा प्रियकर त्यांना सतत फोनवर धमक्या द्यायचा आणि खटला मागे न घेतल्यास गंभीर परिणाम भोगण्याची धमकी द्यायचा. पोलिसांनी प्रकरण नोंदवलं असून संपूर्ण घटनाक्रमाचा सखोल तपास सुरू केला आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *