
New Mumbai : कुटुंबाची जबाबदारी पेलण्यासाठी केवळ राज्यातूनच नाही, तर परराज्यातून लोक मुंबईत येत असतात. उत्तर प्रदेशातील कानपूरहून एक तरुणी मुंबईमध्ये नोकरीसाठी आली होती. ती एका कंपनीत कर्मचारी म्हणून रुजू झाली. पण तिचा अपेक्षाभंग झाल्यानं तिने आत्महत्या केली. तिचं नाव नंदिनी (वय २२) असं आहे. तिनं आर्थिक चणचणीतूनच आपलं जीवन संपवलं. ही घटना नवी मुंबईतील ऐरोलीत घडली आहे.
आर्थिक चणचणीतून केली आत्महत्या
नंदिनीच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची होती. त्यामुळे नंदिनीने कानपूर सोडून नवी मुंबई गाठली. त्यानंतर ती नवी मुंबईतील ऐरोलीतील सेक्टर १ मध्ये पेईंग गेस्ट म्हणून राहू लागली. अशावेळी घरभाडे आणि आई वडिलांच्या आजारपणाचा खर्च झेपत नसल्यानं तिनं आत्महत्या केली. १२ हजार वेतनावर ती एका कंपनीत नोकरी करायची. मात्र, या वाजवी पगारात तिचा सर्व खर्च भागत नव्हता.
तिचे सहकारी गावी गेल्यानं काही दिवसांपासून ती एकटीच राहू लागली होती. तिच्या स्वभावाने तिची शेजाऱ्यांशी चांगली मैत्री झाली होती. शनिवारपर्यंत तिने कोणाशीही संपर्क केला नाही. घराचा दरवाजा आतून बंद असल्याचं पाहून शेजाऱ्यांनी रविवारी दुपारी बनावट चावीचा वापर करत बंद असलेला दरवाजा उघडला. अशावेळी तिचा गळफास घेतलेला मृतदेह दिसून आला.
|
Ulhasnagar : मावळनंतर उल्हासनगरचा पूल कोसळला; ५०० जणांचा संपर्क तुटला, पूल खचला पण.. |
डायरीत सुसाईड नोट
अशावेळी तिने एका डायरीत मनातली सल व्यक्त करत लिहिली आणि आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने डायरीत लिहिलं की, मिळणाऱ्या पगारातून काही भागत नसल्याची खंत तिने व्यक्त केली आहे. संबंधित प्रकरणात पोलिसांनी तपास केला आहे.
महिला पोलीस निरीक्षक वृषाली पवार यांनी सांगितलं की, तरुणीने आर्थिक अडचणीतूनच पुन्हा कानपूरला जाण्याचा निर्णय घेतला होता, असं तिने मैत्रिणीला सांगितलं होतं. मुंबईत येऊन तिचा अपेक्षाभंग झाल्यानं तिने आत्महत्या केली. याबबत तिच्या कुटुंबियांना कळवलं असून यातील पुढील अधिक तपास सुरु आहे.
शहर
- वेदांत आयर्न अँड स्टीलच्या शेअरची जोरदार घोडदौड; सलग ११ व्या दिवशी लागलं अपर सर्किट!
- 'चंपत राय यांच्याशी आमचा काहीही संबंध नाही'; राम मंदिर दान चोरी प्रकरणावर आचार्य धर्मदास महाराज आक्रमक!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- आरटीई (RTE) प्रवेशाकडे पालकांची पाठ; शाळांची पडताळणी आणि शिक्षक पात्रतेच्या त्रुटींमुळे पालक चिंतेत!
महाराष्ट्र
- वेदांत आयर्न अँड स्टीलच्या शेअरची जोरदार घोडदौड; सलग ११ व्या दिवशी लागलं अपर सर्किट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- पुणे 'टँकर माफिया'वर सभागृहात संताप! खासगी टँकरच्या मनमानी दरांविरोधात नगरसेवकांचा हल्लाबोल; दर निश्चित करण्याची मागणी.
- आरटीई (RTE) प्रवेशाकडे पालकांची पाठ; शाळांची पडताळणी आणि शिक्षक पात्रतेच्या त्रुटींमुळे पालक चिंतेत!
गुन्हा
- जळगाव: ४० वर्षीय महिलेवर मित्रासमोरच सामूहिक अत्याचार; नराधमांनी व्हिडीओ बनवून केला व्हायरल, १४ जण अटकेत!
- पुणे: लोहगड हत्याकांडात नवा ट्विस्ट! मुख्य आरोपी सिया गोयलच्या वकिलांची भाऊ साहिलला १० कोटींची कायदेशीर नोटीस; वकीलांच्या हक्कांवरून न्यायालयात हाय-व्होल्टेज ड्रामा!
- मध्य प्रदेश: आयपीएल स्टार शशांक सिंग आणि निवृत्त आयपीएस पिता कायदेशीर कचाट्यात! घरातील आचाऱ्याला मारहाण आणि वेठीस धरल्याप्रकरणी एफआयआर दाखल.
- मुंबई: तुकाराम मुंढेंचा बड्या हॉटेल्सना दणका, स्वयंपाकघरात उंदीर ते झुरळे; ६ नामांकित हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सचे परवाने थेट निलंबित!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- आजचे राशिभविष्य ३० जून २०२६: 'या' राशींचे नशीब फळफळणार, मिळेल अमाप यश आणि संपत्ती!
- बळीराजा मालामाल! नाशिकच्या आदिवासी पट्ट्यात 'पांढऱ्या मुसळी'ची कमालीची क्रेझ; बाजारात मिळतोय २ ते ३ हजार रुपये प्रति किलोचा बंपर भाव
- आजचे राशिभविष्य: शनिदेव करणार या राशींची कर्जमुक्ती; जाणून घ्या २७ जून २०२६ चा तुमचा लकी दिवस!
- आंबा बाग छाटणीचे तंत्र: दर्जेदार उत्पादनासाठी झाडांची छाटणी का आणि कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती!
मनोरंजन
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- 'वन नेशन, वन इलेक्शन' २०२९ पर्यंत शक्य नाही; २०२३४ पर्यंत सर्व निवडणुका एकाच वेळी घेण्याचे नवे लक्ष्य.
- अलाहाबाद: उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, पहिल्या पतीशी घटस्फोट न घेता दुसऱ्या जोडीदाराकडून 'पोटगी' मागता येणार नाही!
- मध्य प्रदेश: आयपीएल स्टार शशांक सिंग आणि निवृत्त आयपीएस पिता कायदेशीर कचाट्यात! घरातील आचाऱ्याला मारहाण आणि वेठीस धरल्याप्रकरणी एफआयआर दाखल.
- पश्चिम बंगालचा मोठा निर्णय! ओबीसी आरक्षणात बदल करणारी दोन महत्त्वाची विधेयके विधानसभेत मंजूर; १७% वरून ७% वर आरक्षणाची मर्यादा.


























Subscribe to my channel


