
Saturday Night : नागपूरच्या कामठी येथे शनिवारी रात्री रंगलेल्या रेव्ह पार्टीचा पोलिसांनी भंडाफोड केला आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभाग आणि अँटी ह्यूमन ट्रॅफिकिंग युनिट पथकाने छापा टाकून ही कारवाई केली आहे. तसेच हा प्रकार उघडकीस आणला आहे. या छाप्यात पोलिसांनी एक बिल्डर, दोन प्रॉपर्टी डिलर आणि एका व्यावसायिकाला अटक केली आहे. तसेच, मुंबईहून बोलावण्यात आलेल्या चार तरुणींनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या कामठी येथे शनिवारी रात्री ‘एस फार्म’ नावाच्या फार्महाऊसवर रेव्ह पार्टी सुरू होती. या रेव्ह पार्टीमध्ये सुनिल अग्रवाल, गौतम सुशील जैन, नीलेश बाबुलाल गडिया आणि मितेश मोहनलाल खक्कर यांचा समावेश होता. या आरोपींमध्ये एक जण बिल्डर असून, सुनील आणि त्याचे २ मित्र, प्रॉपर्टी डिलर असल्याची माहिती समोर आली आहे.
या रेव्ह पार्टीत ड्रग्ज, एमडी, हुक्का आणि ब्रँडेड अल्कोहोलची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच या फार्म हाऊसवर मुंबईहून चार तरूणींना देखील बोलावण्यात आलं होतं.
फार्म हाऊसमध्ये रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस उपायुक्त राहुल माकणीकर, साहाय्यक आयुक्त अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यरात्री १ वाजता पोलिसांनी छापा टाकला.
पोलीस पथकाने छापा टाकत चार आरोपींना ताब्यात घेतलं आहे. तसेच फार्म हाऊसवर मुंबईहून आलेल्या ४ तरूणींना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. तसेच पोलिसांनी फार्महाऊसवरून १.३१ ग्रॅम एमडी, हुक्क्याचे साहित्य, दारूच्या बाटल्या, ६ मोबाईल, २ कार आणि इतर साहित्य मिळून एकूण २६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायदा आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- उत्तर प्रदेश: जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- उत्तर प्रदेश: जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती

























Subscribe to my channel


