
Pune : एकीकडे तापत्या उन्हामुळे विजेची मागणी वाढत असल्याने वीज वितरण यंत्रणेवर ताण आला आहे. त्यातच शहरी आणि ग्रामीण भागात असलेल्या महापारेषण आणि महावितरणच्या वीजयंत्रणेजवळ किंवा वीजतारांखाली ऊस, गवत तसेच कचरा पेटवण्याचे प्रकार घडत आहेत. गेल्या महिन्याभरात आगीमुळे पारेषण आणि वितरण यंत्रणेत सहा ठिकाणी बिघाड झाल्यामुळे तब्बल ६ लाख २३ हजार वीजग्राहकांना खंडित वीजपुरवठ्याचा नाहक त्रास सहन करावा लागला. महावितरणला देखील वीजविक्रीमध्ये नुकसान सहन करावे लागले आहे.
शहरी आणि ग्रामीण भागातील विजेचे उपकेंद्र, शेती तसेच सार्वजनिक ठिकाणी किंवा घरे, इमारतींच्या परिसरात असलेल्या वीजयंत्रणेजवळ सुका व ओला कचरा टाकल्यामुळे किंवा वीजतारांखाली ऊस, गवत किंवा कचऱ्याच्या ढिगारा पेटवल्यामुळे वीजयंत्रणेला धोका निर्माण होत आहे. वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. नागरिकांनी वीजयंत्रणेजवळ किंवा वीजतारांखाली कचरा किंवा गवत टाकू नये किंवा त्याचा ढिगारा जाळू नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
शहरी आणि ग्रामीण भागात अनेक ठिकाणी महापारेषण आणि महावितरणच्या वीजवाहिन्या शेतातून, जंगलातून गेलेल्या आहेत. प्रामुख्याने महापारेषणच्या टॉवर लाइन्सखाली (वीजतारांच्या वाहिन्या) २३ फेब्रुवारी ते २८ मार्चपर्यंत गवत, ऊस व जंगलातील वणवासदृश आगीचे पाच प्रकार घडले आहेत. त्यामुळे प्रामुख्याने चाकण, भोसरी आणि हिंजवडी फेज १ ते ३ मधील सर्व लहानमोठे उद्योग तसेच पिंपरी-चिंचवड शहर, वाकड, भोसरी गाव आदींसह मुळशी तालुक्यातील अनेक गावांतील सुमारे ५ लाख ९६ घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर ग्राहकांना दोन ते तीन वेळा प्रत्येकी ४५ ते ६० मिनिटे खंडित वीजपुरवठ्याला सामोरे जावे लागले.
|
|
तर, शहरातील नवले पूल ओढ्याजवळ टाकलेल्या कचऱ्यांच्या ढिगाऱ्याला आग लागल्याने महावितरणच्या अमित उपकेंद्राला वीजपुरवठा करणारी वीजवाहिनी जळाली. परिणामी २७ हजार वीजग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागला. या आगीच्या सर्व प्रकारांत महावितरणचे वीजविक्रीमध्ये नुकसान झाले.
महावितरणकडून सार्वजनिक ठिकाणी असलेल्या रोहित्रांना संरक्षक जाळ्या, संरक्षक आवरण लावलेले आहे. परंतु. अनेक ठिकाणी त्याच्या आतमध्ये कचरा आणि शिळे खाद्यपदार्थ टाकण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. खाद्यपदार्थामुळे मांजर, उंदीर, घूस, पक्षी यांच्यासह सरपटणारे प्राणी तेथे येतात आणि वीजयंत्रणेच्या संपर्कात आल्यावर शॉर्टसर्किट होऊन वीजपुरवठा खंडित होतो. प्राण्याचा नाहक जीव जाण्याचेही प्रकार घडले आहेत.
नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वीजवाहिन्यांच्या खाली तसेच रोहित्र, फिडर पिलर व इतर वीजयंत्रणेजवळ ओला व सुका कचरा टाकू नये. साठवलेला कचरा जाळू नये. कचरा, वाढलेले तण, गवत, उसाच्या आगीमुळे प्रामुख्याने वीजवाहिन्यांमध्ये ट्रिपिंग आल्याने वीजपुरवठा खंडित होतो. वीजयंत्रणेला जवळच्या आगीमुळे धोका असल्याचे लक्षात येताच २४ तास सुरू असलेल्या महावितरणच्या १९१२ / १८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!



























Subscribe to my channel

