
Mumbai : गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या अनेक भागात पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विमागाने मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात आजही पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाले आहे. यामुळे कमाला तापमानात अधूनमधून घट होताना दिसत आहे. मागील दोन दिवसांपासून काही भागात पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली.
मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर भागात आज पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या कालावधीत काही भागात ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील. पश्चिमी प्रकोपामुळे ही शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुंबईमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. दरम्यान, सध्या राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण आणि अवकाळीच्या वातावरणामुळे तापमानात काहीशी घट झाली आहे. तर काही भागात पूर्वी मोसमी पावसाने हजेरी लावली आहे. कोल्हापूर, सांगली भागात सोमवारी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.
मुंबईसह नवी मुंबईत हलक्या सरी
बोरिवली, दहिसर, खोपोली भागात सोमवारी सायंकाळी हलक्या सरी कोसळल्या. तसेच वाशी आणि आसपासच्या परिसरात मंगळवारी पहाटे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.
|
Mumbai : निसर्ग उन्नत मार्गावर पर्यटकांची झुंबड, सर्व स्लॉट हाऊसफुल्ल |
पुढील ३६-४८ तासांत पावसाची शक्यता
मुंबईत पुढील ३६ ते ४८ तासांत पूर्वमोसमी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यावेळी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. काही भागात मुसळधार पाऊस कोसळेल.
संपूर्ण दिवस ढगाळ वातावरण
मुंबईत पावसाची शक्यता असल्याने मंगळवारी संपूर्ण दिवस वातावरण ढगाळ राहील. यामुळे मुंबईकरांना काहीसा उकाड्याचा सामना करावा लागेल.
पूर्वमोसमी पावसाची शक्यता कुठे ?
कोकणात १ ते ४ एप्रिलदरम्यान पूर्वमोसमी पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांत काही भागांत हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. कोकणच्या दक्षिण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रायगड आदी भागांतही हलका पाऊस होणार आहे. धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, बुलढाणा आदी जिल्ह्यांतही चार-पाच दिवस पावसाळी स्थिती असणार आहे.
पूर्वमोसमी आणि मोसमी पाऊस यात फरक काय ?
पूर्वमोसमी पावसादरम्यान दिवसभर खूप उकडते, हा उकाडा असह्य होतो आणि मग पाऊस कोसळतो. मोसमी पावसात ढग जमा होतात. ऊन आणि सावली यांचा खेळ सुरू होतो, काही वेळा संथ वाराही वाहतो आणि मग हा पाऊस पडतो.
पूर्वमोसमी पावसात उष्णतेमुळे ढग निर्माण होतात. वारा खालून वर जातो आणि बाष्प साठून पाऊस पडतो. मोसमी पावसात ढग जमिनीला समांतर दिशेने पुढे सरकतात आणि पाऊस पडण्यास सुरुवात होते.
पूर्वमोसमी पाऊस गडगडाटी, आणि रौद्र स्वरुपाचा असतो. मोसमी पाऊस संततधार, संथ आणि शांतपणे येतो.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



