
Ahilyanagar : जिल्ह्यात महावितरणकडून ग्राहकांना दिल्या गेलेल्या वीज देयकासंदर्भात गेल्या वर्षभरात ७४ हजार २७० तक्रारी प्राप्त झाल्या. या तक्रारींमध्ये ५१ हजार ५८० ग्राहकांच्या देयकांमध्ये महावितरणला दुरुस्ती करुन देणे भाग पडले आहे. म्हणजे ६९ टक्के ग्राहकांच्या तक्रारीत तथ्य असल्याचे आढळले आहे तर १८ हजार ७२२ तक्रारी तथ्य नसल्याचे आढळले आहे. हे प्रमाण केवळ ३१ टक्के आहे.
महावितरणकडून माहिती उपलब्ध झाली आहे. ही आकडेवारी १ एप्रिल २०२४ ते २५ फेब्रुवारी २०२५ अशा अकरा महिन्यांच्या कालावधीतील आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी महावितरणच्या जिल्ह्यातील कामकाजाचा आढावा घेण्यासाठी घेतलेल्या बैठकीतही हीच आकडेवारी सादर केली होती. म्हणजे महावितरणकडून ग्राहकांना चुकीची वीज देयके देण्याचे प्रमाण अधिक आहे.महावितरणकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार ग्राहकांच्या वीज देयकासंदर्भात मीटर रिडींग न घेताच देयके देणे, मीटर नादुरुस्त आहे, विज नसतानाही देयके दिली अशा स्वरूपाच्या सर्वसाधारण तक्रारी प्राप्त होतात.
मिटर वाचन करुन देयके घरोघर वितरित करण्याचे काम महावितरणकडून जिल्ह्यात २० संस्थांना दिलेले आहे. जिल्ह्यात महावितरणचे विविध प्रकारचे एकूण ८ लाख ४ हजार ग्राहक आहेत. त्यामध्ये घरगुती ६ लाख ८९ हजार, वाणिज्य वापराचे ८० हजार, औद्योगिक वापराचे १७ हजार, पथदिव्यांची ४ हजार २३ तर इतर स्वरूपाचे १३ हजार ग्राहक आहेत.
|
|
सुमारे वर्षभरात प्राप्त झालेल्या २३४ वगळता सर्वच तक्रारींचे महावितरणकडून निराकरण करण्यात आलेले आहे. प्राप्त ७४ हजार २७० तक्रारींमध्ये केवळ १५५६ तक्रारींमध्ये मीटर वाचननुसारच वीज देयक दिले गेलेले आढळले. १८ हजार ७२२ तक्रारींमध्ये वीज देयक योग्य असल्याचे आढळले, ५१ हजार ५८० तक्रारींमध्ये वीज देयकात सुधारणा करावी लागली. २४१२ तक्रारी वीज देयक मिळालेच नाही किंवा उशिरा मिळाल्याच्या तक्रारी आहेत.
मिटर वाचनासाठी कर्मचारी आल्यानंतर घराला, सदनिकेला कुलूप असणे, बंद बंगल्याच्या कुंपणामुळे मीटर वाचनासाठी आत न जाता येणे, त्यामुळे सरासरी विज देयक दिले जाते. मीटर वाचन किती आहे याचे छायाचित्र महावितरणकडून ग्राहकाच्या व्हाट्सअपवर पाठवले जाते, मात्र अनेकदा ग्राहक त्याकडे दुर्लक्ष करतात.
वीजजोड दिले मात्र देयकच नाही
महावितरणला प्राप्त झालेल्या ७४ हजार २७० तक्रारींमध्ये सरासरी वीज देयक असल्याच्या ३५२४, अधिक रकमेचे देयक मिळाल्याच्या ५६ हजार ७५६, उशिरा देयक पावती मिळाल्याच्या ५८६, देयक कमी रकमेचे मिळाल्याच्या ८५०, मीटर वाचन दुरुस्तीच्या २३५०, मीटर वाचन केलेच नाही अशा १५७८, देयकाची पावती न मिळण्याच्या १७३८, वीजजोड असूनही देयक न मिळालेले ९० ग्राहक आढळले तर चुकीचे वीज देयक मिळाल्याचे ६८९८ तक्रारी प्राप्त झाल्या.
वीज देयक ऑनलाइन प्रमाण वाढले
महावितरणची देयके ऑनलाइन पद्धतीने भरण्याचे प्रमाण ८० टक्के आहे. त्याची पावती ऑनलाइन पद्धतीने मिळते. तरीही पावती न मिळाल्याच्या, उशिरा पावती मिळाल्याच्या तक्रारी प्राप्त होतात. मीटर वाचन, देयकाची रक्कम महावितरणकडून ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठवले जाते. मात्र त्यात अनियमित असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत
शहर
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- महिला T20 विश्वचषक: भारत उपांत्य फेरीत कसा पोहोचणार? जाणून घ्या संपूर्ण समीकरण!
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
महाराष्ट्र
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
- पुण्याच्या 'सारथी' कार्यक्रमात खुर्चीवरून राडा! पहिल्या रांगेत बसण्यावरून आमदार अभिमन्यू पवार आणि खासदार मेधा कुलकर्णी आमनेसामने; मेधा कुलकर्णी कार्यक्रमातून निघून गेल्या!
गुन्हा
- "हा क्रिमिनल आहे... आम्ही त्याची वरात काढतोय"; खून प्रकरणातील फरार आरोपीची पुणे पोलिसांकडून धिंड!
- नाशिक: दारूच्या नशेत मित्रानेच मित्राचा काढला काटा, देवळाली परिसरात खळबळ.
- मुंबई: कारमध्ये बसताच मागचा दरवाजा उघडून चाकूचा धाक, आईच्या धैर्याने लुटारूला केले जेरबंद!
- मुंबई: लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ॲपल उत्पादनांच्या किमतीत मोठी वाढ; इलॉन मस्क यांनाही बसला धक्का, म्हणाले- "मी पाहिलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ!"
- 'ऑपरेशन सिंदूर'च्या वीरांना मानाचा मुजरा; ६ जवानांची नावे अखेर जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकात कोरले जाणार नाव!
- राजस्थान: 'गोल्डन ऑवर' म्हणजे काय? सायबर फसवणूक झाल्यास एक चूक पडेल महागात, त्वरित करा हे काम.
- वाहनचालकांसाठी मोठा झटका! आता लोकअदालतीत जाण्यापूर्वी ५०% दंड भरणे अनिवार्य; नवीन नियमांमुळे बेशिस्त चालकांवर वचक!


























Subscribe to my channel




