
Saif Ali Khan : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वांद्रे येथील सैफ अली खानच्या घरामध्ये चोर घुसला होता. या चोराला पकडत असताना सैफवर त्याने चाकू हल्ला केला. चोराने पाच ते सहा वेळा त्याच्यावर वार केले. या हल्ल्यामध्ये सैफ गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. सैफच्या घरामध्ये मध्यरात्री चोरीचा आणि हल्ल्याचा थरार कसा घडला याची माहिती समोर आली आहे.
सैफ अली खानच्या घरामध्ये चोरीच्या उद्देशने चोर शिरला होता. या चोराने सैफवर वार केले. मध्यरात्री हा थरार घडला. चोरीच्या उद्देशाने अज्ञात व्यक्ती सैफच्या घरात घुसला होता. रात्री दीड वाजता करीना कपूर घरी आली. करीनाला तिची बहीण करिश्मा कपूरने घरी सोडले. करीना घरी आल्यानंतर सर्वजण घरामध्ये झोपले होते. पहाटे सैफच्या मुलांसोबत झोपलेल्या मोलकरणीला चाहूल लागली. ती बाहेर आली. तेव्हा एक अज्ञात व्यक्ती घरात होती.
मोलकरणीने आरडाओरडा केला तेव्हा तिचा आवाज ऐकून सैफ बाहेर आला. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने सैफवर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यामुळे सैफच्या उजव्या हातावर जखमा झाल्या. सैफने चोराला पकडण्याचा प्रयत्न केला तर चोराने त्याच्यावर चाकूने पाच ते सहा वेळा वार केले. या हल्ल्यानंतर चोराने पळ काढला. त्यानंतर जखमी सैफला उपचारासाठी लीलावती रुग्णालयात हलवण्यात आले.
|
|
घरामध्ये चोर घुसल्यानंतर तो आधी तैमूरच्या खोलीमध्ये शिरला. तैमूरसोबत नॅनी म्हणजेच मोलकरीन झोपली होती. चोराला मोलकरणीने पाहिले. चोराला पाहून ती जोरजोरात ओरडून लागली. चोराने वार करण्याचा प्रयत्न केला. तैमूर आणि जेहला काही होऊ नये यासाठी मोलकरणीने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मोलकरणीने आरडाओरडा केल्याने चोराने तिच्यावर हल्ला केला. यामध्ये मोलकरणीच्या हाताला दुखापत झाली. ती जखमी झाली आहे.
मोलकरणीचा आवज ऐकून सैफला जाग आली आणि तो तैमूरच्या खोलीकडे धावला. सैफने चोराला पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा चोराने त्याच्यावर देखील चाकू हल्ला केला. या हल्ल्यादरम्यान चोराने सैफवर पाच ते सहा वेळा चाकू मारला. या हल्ल्यात सैफ जखमी झाला असून हात, मान आणि पाठीवर जखमा झाल्या आहेत. मानेवर १० सेंटिमीटरची जखम झाली आहे. हल्ल्यानंतर चोर पळून गेला. त्यानंतर जखमी झालेल्या सैफला तात्काळ लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले.
शहर
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- महिला T20 विश्वचषक: भारत उपांत्य फेरीत कसा पोहोचणार? जाणून घ्या संपूर्ण समीकरण!
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
महाराष्ट्र
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
- पुण्याच्या 'सारथी' कार्यक्रमात खुर्चीवरून राडा! पहिल्या रांगेत बसण्यावरून आमदार अभिमन्यू पवार आणि खासदार मेधा कुलकर्णी आमनेसामने; मेधा कुलकर्णी कार्यक्रमातून निघून गेल्या!
गुन्हा
- "हा क्रिमिनल आहे... आम्ही त्याची वरात काढतोय"; खून प्रकरणातील फरार आरोपीची पुणे पोलिसांकडून धिंड!
- नाशिक: दारूच्या नशेत मित्रानेच मित्राचा काढला काटा, देवळाली परिसरात खळबळ.
- मुंबई: कारमध्ये बसताच मागचा दरवाजा उघडून चाकूचा धाक, आईच्या धैर्याने लुटारूला केले जेरबंद!
- मुंबई: लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ॲपल उत्पादनांच्या किमतीत मोठी वाढ; इलॉन मस्क यांनाही बसला धक्का, म्हणाले- "मी पाहिलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ!"
- 'ऑपरेशन सिंदूर'च्या वीरांना मानाचा मुजरा; ६ जवानांची नावे अखेर जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकात कोरले जाणार नाव!
- राजस्थान: 'गोल्डन ऑवर' म्हणजे काय? सायबर फसवणूक झाल्यास एक चूक पडेल महागात, त्वरित करा हे काम.
- वाहनचालकांसाठी मोठा झटका! आता लोकअदालतीत जाण्यापूर्वी ५०% दंड भरणे अनिवार्य; नवीन नियमांमुळे बेशिस्त चालकांवर वचक!


























Subscribe to my channel




