
Harshada Wanjale speaks for MNS Khadakwasala Candidate Mayuresh : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हडपसर येथून मनसे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर,कोथरूड येथून किशोर शिंदे आणि मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचे चिरंजीव मयुरेश वांजळे यांना खडकवासला मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. दरम्यान, गुरुवारी (१४ नोव्हेंबर) राज ठाकरे यांनी खडकवासल्यात मयुरेशसाठी प्रचारसभा घेतली. यावेळी, मयुरेशची आई हर्षदा वांजळे यांनी देखील उपस्थितांना संबोधित केलं. हर्षदा वांजळे म्हणाल्या, आज या सभेला संबोधित करताना मला रमेश वांजळे यांची खूप आठवण येत आहे.
मात्र, ते आजही आपल्यातच उपस्थित आहेत असं मला वाटतं. कधी कधी मला त्यांची उणीव भासते. २००९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी तुम्ही सर्वांनी रमेश वांजळे यांच्यावर विश्वास दाखवला होता. तोच विश्वास तुम्ही यावेळी मयुरेशवर दाखवाल, अशी मला अपेक्षा आहे. राज ठाकरे यांनी मयुरेशवर विश्वास दर्शवला आहे. मयुरेश राज ठाकरेंचा विश्वास सार्थ ठरवेल, याबाबत माझ्या मनात जरा देखील शंका नाही. त्यामुळे मी तुम्हा सर्वांना आवाहन करते की येत्या २० नोव्हेंबरला रेल्वे इंजिन या आपल्या निवडणूक चिन्हासमोरचं बटन दाबून मयुरेशला भरपूर मतांनी विजयी करा.
रमेश वांजळे यांच्या पत्नी म्हणाल्या, “मला आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन करायचं आहे की आपल्यासमोर जे उमेदवार आहेत, ते व त्यांचे कार्यकर्ते आपल्या कार्यकर्त्यांना दमदाटी करत आहेत. मला तुम्हाला आवाहन करायचं आहे की तुम्ही त्यांच्या दमदाटीला भीक घालू नका. न घाबरता मयुरेशसाठी काम करा. तुमचा तडफदार, शिकलेला उमेदवार विधानसभेत पाठवा. मयुरेशचा प्रचार करत असताना तुमच्या केसाला जरी धक्का लागला तरी एक गोष्ट लक्षात ठेवा इथे तुमची आई उभी आहे. मी केवळ मयुरेशची आई नाही, मी तुमची देखील आई आहे. तुमच्या केसाला जरी कोणी धक्का लावला तरी त्यांचे पाय तोडल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही”.
|
Pimpri : ‘या’ मतदारसंघात पारंपरिक विरोधकांतील चौथी लढत अस्तित्वाची |
हर्षदा वांजळे म्हणाल्या, समोर कोणीही असो, तुमच्या मदतीसाठी मयुरेश तर आहेच, पण मी देखील तुमच्या बरोबरच आहे. मी तुम्हाला विनंती करते, मागच्या वेळी समोरचे उमेदवार केवळ २,६०० मतांनी जिंकले आहेत. येत्या २० तारखेला तुम्ही मयुरेशवर भरभरून मतदान करा आणि त्याला जिंकवा.
“रमेश वांजळे शेवटचं माझ्याशी बोलले”, राज ठाकरेंनी सांगितली आठवण
खडकवासल्यातील सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले, “रमेश वांजळे यांचा मुलगा मयुरेशला मी जेव्हा पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मला वाटलं मांझे बंधू जयदेव ठाकरे त्यांचा मुलगा राहुल ठाकरे हाच आला आहे. कारण हा त्याच्यासारखाचं दिसतो. मला तो दिवस अजही आठवतो. रमेश वांजळे शेवटचं कोणाशी बोलले असतील तर ते माझ्याशी बोलले. मी तेव्हा फोन केला होता, तेव्हा मला त्यांनी सांगितलं की मी रुग्णालयात आलो असून एमआरआय काढायचा आहे. एमआरआय झाला की १० मिनिटात तुम्हाला फोन करतो, मी तेव्हा त्यांना म्हटलं की हो फोन करा मला, जरा महत्वाचं बोलायचं आहे. मात्र, त्यानंतर मला १५ ते २० मिनिटांनी फोन आला आणि सांगितलं की ते आपल्यात राहिले नाहीत. तेव्हा मला काय बोलावं तेच समजत नव्हतं. मला बाकीचे अनेक जण सोडून गेले. पण आज रमेश वांजळे माझ्याबरोबर असते.”
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!



























Subscribe to my channel

