
Pune : राज्यात सत्ता मिळवण्यासाठी मतदारसंघाचे पुनर्रचना करण्याबरोबरच हमखास मिळणारी मते असलेला भाग मतदारसंघात नव्याने समाविष्ट करण्याचे डावपेच सत्ताधारी पक्ष कायम करत आला आहे. त्यामुळेच विकासाच्या नावाखाली पुण्यात नवीन गावे समाविष्ट करण्याचा प्रयोग अनेकदा झाला आहे. त्या सर्वातून समाविष्ट गावांचा विकास किती झाला हा भाग निराळा. मात्र, यशाची हमी देणारे आपापल्या परिसराचे मतदारसंघ सत्ताधारी पक्षांनी तयार केले. तथापि काळ बदलला, तसे मतदारही बदलले असून, काही मतदारसंघ तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या हातातून निसटले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये पुणेकरांबरोबरच समाविष्ट गावांतील मतदार हे ‘निर्णायक’ ठरणार आहेत. त्यामुळे पुण्याचा निकाल आता पुणेकरांबरोबरच नव्याने समाविष्ट गावांवर अवलंबून असणार आहे.
पुण्याच्या हद्दीत ३८ गावे समाविष्ट करण्याचा निर्णय ११ सप्टेंबर १९९७ रोजी तत्कालीन भाजप-शिवसेना युती सरकारने घेतला. त्यामध्ये बाणेर, बालेवाडी, म्हाळुंगे, सूस, बावधन, आंबेगाव, कात्रज, धनकवडी, हिंगणे-खुर्द, वडगाव बुद्रुक, वडगाव-धायरी, सातववाडी, विठ्ठलनगर, साडेसतरा नळी, मुंढवा, केशवनगर, महंमदवाडी, शिवणे, कोंढवे, उत्तमनगर आदी गावांचा समावेश होता. या गावांचा विकास वेगाने करण्यासाठी रस्ते, पाणीपुरवठा, वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, शाळांच्या इमारती यांसारख्या मूलभूत सोयी-सुविधांसाठी सुमारे ३५ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची तरतूद पुणे महापालिकेच्या अंदाजपत्रकात करण्यात आली. या समाविष्ट गावांचा समावेश प्रामुख्याने खडकवासला आणि हडपसर या मतदारसंघांमध्ये करण्यात आला. हा परिसर सुरुवातीला काँग्रेस आणि तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसला फायदेशीर होता. मात्र, हा सर्व परिसर नव्याने विकसित होत असल्याने भाजप-शिवसेना युतीसाठी मदतीचा हात देणारा ठरत गेला.
|
Mumbai : विमानात बॉम्बच्या धमकीप्रकरणी आतापर्यंत १२ गुन्हे दाखल |
सत्ताधारी आपल्या सोयीनुसार मते मिळविण्यासाठी गावे पुणे महापालिकेत समाविष्ट करण्याचा खेळ खेळत आले आहेत. विकासाच्या नावाखाली गावे महापालिकेत समाविष्ट करायची, जमिनीचे भाव वधारले, की आपल्या पक्षाचे स्थानिक नेते आणि बांधकाम व्यावसायिकांना मदत होण्यासाठी त्यांपैकी काही गावे वगळायची. त्यानंतर दिसेल तिथे इमारती बांधायच्या. मोकळ्या जागा संपल्या, की गावे पुन्हा महापालिकेकडे देऊन मोकळे व्हायचे. तोपर्यंत गावांचे रूप पालटून तेथे सिमेंटची जंगले उभी राहिलेली असतात. पुण्यात नव्याने समाविष्ट गावांमध्ये हेच चित्र पाहायला मिळते. यापूर्वी समाविष्ट करण्यात आलेल्या गावांपैकी १५ गावे पूर्ण आणि ५ गावे अंशत: वगळण्याचा निर्णय १७ नोव्हेंबर २००१ रोजी घेण्यात आला. मात्र, हे मतदार खडकवासला आणि हडपसर विधानसभा मतदारसंघांमध्ये कायम राहिले.
महापालिका निवडणुकीमध्ये मतदारांची साथ लाभण्यासाठी गावे समाविष्ट करण्याचा दुसरा प्रयोग २०१७ मध्ये झाला. तत्कालीन राज्य सरकारने ४ ऑक्टोबर २०१७ रोजी नियोजित ३४ पैकी ११ गावांचा समावेश महापालिकेत केला. तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. उर्वरित २३ गावांचा तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला.
प्रतीक्षेत असलेली ही गावे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्याचा निर्णय २०२१ मध्ये पुढील महापालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून घेण्यात आला. त्यामुळे राज्यात भौगोलिकदृष्ट्या पुणे ही मुंबईपेक्षाही मोठी महापालिका ठरली. तेव्हा महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असले, तरी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आग्रहामुळे म्हाळुंगे, सूस, बावधन बुद्रुक, किरकटवाडी, पिसोळी, कोंढवे धावडे, कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी बुद्रुक, नऱ्हे, होळकरवाडी, औताडे-हांडेवाडी, वडाचीवाडी, शेवाळेवाडी, नांदोशी, सणसनगर, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, जांभूळवाडी, कोल्हेवाडी, वाघोली ही गावे महापालिकेत घेण्यात आली. यातील काही परिसर हा खडकवासला, हडपसर या विधानसभा मतदारसंघांबरोबरच वडगाव शेरी मतदारसंघामध्ये समाविष्ट झाला. विशेषत: वडगाव शेरी आणि हडपसर हे मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेससाठी सकारात्मक झाले.
समाविष्ट गावांपैकी फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही गावे वगळण्याचा निर्णय हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आणि माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या हट्टामुळे घेण्यात आला. या दोन गावांची मिळून नगरपालिका स्थापन करण्याचा निर्णय झाला आहे. खरे तर हा भाग राष्ट्रवादी काँग्रेससाठीच फायदेशीर होता. मात्र, हा भाग वगळला गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे हक्काचे मतदार कमी झाले आहेत.
पुण्याच्या हद्दीत नवीन गावे समाविष्ट करताना हक्काचे मतदान डोळ्यांसमोर ठेवून तत्कालीन सत्ताधारी पक्षांनी निर्णय घेतलेले दिसतात. मात्र, ही गावे विकसित होत असताना पुण्याबाहेरील अनेक मतदार या गावांमध्ये स्थायिक झाले आहेत. सध्या तर काही समाविष्ट गावांमध्ये मूळ रहिवाशांपेक्षा पुण्याबाहेरील मतदारांची संख्या जास्त झाली आहे. हक्काचे मतदार पाहून गावे समाविष्ट करण्यात आली असली, तरी आता नवीन मतदारांचा अंदाज राजकीय पक्षांना येत नसल्याने आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये समाविष्ट गावांतील मतदार निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे या मतदारांना आपलेसे करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची धडपड सुरू झाली आहे.
शहर
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- महिला T20 विश्वचषक: भारत उपांत्य फेरीत कसा पोहोचणार? जाणून घ्या संपूर्ण समीकरण!
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
महाराष्ट्र
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
- पुण्याच्या 'सारथी' कार्यक्रमात खुर्चीवरून राडा! पहिल्या रांगेत बसण्यावरून आमदार अभिमन्यू पवार आणि खासदार मेधा कुलकर्णी आमनेसामने; मेधा कुलकर्णी कार्यक्रमातून निघून गेल्या!
गुन्हा
- "हा क्रिमिनल आहे... आम्ही त्याची वरात काढतोय"; खून प्रकरणातील फरार आरोपीची पुणे पोलिसांकडून धिंड!
- नाशिक: दारूच्या नशेत मित्रानेच मित्राचा काढला काटा, देवळाली परिसरात खळबळ.
- मुंबई: कारमध्ये बसताच मागचा दरवाजा उघडून चाकूचा धाक, आईच्या धैर्याने लुटारूला केले जेरबंद!
- मुंबई: लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ॲपल उत्पादनांच्या किमतीत मोठी वाढ; इलॉन मस्क यांनाही बसला धक्का, म्हणाले- "मी पाहिलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ!"
- 'ऑपरेशन सिंदूर'च्या वीरांना मानाचा मुजरा; ६ जवानांची नावे अखेर जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकात कोरले जाणार नाव!
- राजस्थान: 'गोल्डन ऑवर' म्हणजे काय? सायबर फसवणूक झाल्यास एक चूक पडेल महागात, त्वरित करा हे काम.
- वाहनचालकांसाठी मोठा झटका! आता लोकअदालतीत जाण्यापूर्वी ५०% दंड भरणे अनिवार्य; नवीन नियमांमुळे बेशिस्त चालकांवर वचक!


























Subscribe to my channel




