
Mumbai : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अखेरचे दोन दोन दिवस शिल्लक असतानाही महायुती आणि महाविकास आघाडीतील घोळ संपलेले नाहीत. दोन्ही आघाड्यांतील सर्वच पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली आहे. बंडोबांना शांत करण्याची मोहीम पक्षांच्या नेत्यांना हाती घ्यावी लागली आहे. महायुतीतील जागावाटपाचा तिढा कायम असतानाच महाविकास आघाडीतील सुंदोपसुंदीही चव्हाट्यावर आली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मंगळवारपर्यंत मुदत असली तरी महायुती आणि महाविकास आघाडीत अजूनही जागावाटपाचा घोळ सुरू आहे. महायुतीतील तिढा सोडविण्याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बराच खल झाला. भाजप, शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी (अजित पवार) हे तीन पक्ष किती नेमक्या जागा लढणार हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. महाविकास आघाडीतही जागावाटपाचा घोळ सुरूच आहे. शिवसेना (ठाकरे) आणि काँग्रेसमधील वाद मिटण्याची लक्षणे नाहीत. परिणामी महाविकास आघाडीत काही जागांवर मैत्रीपूर्ण लढतींची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेसने दावा केलेल्या मतदारसंघांमध्ये शिवसेनेने उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेसमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली.
|
|
काँग्रेस नेत्यांचा दिवसभर खल सुरू होता. सोमवारपर्यंत तोडगा न निघाल्यास मंगळवारी काही मतदारसंघांमध्ये शिवसेनेच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. शिवसेनेच्या आडमुठ्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत तिढा निर्माण झाल्याचे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. काँग्रेस आणि शिवसेनेतील वाद वाढला असताना राष्ट्रवादीचे (शरद पवार) नेते सारी मजा बघत आहेत. शरद पवार यांनी मध्यस्थी करावी, अशी काँग्रेस व शिवसेनेच्या नेत्यांची भूमिका आहे. भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या मुलाला भाजपने उमेदवारी दिली असताना मुलीने शिवसेनेत (शिंदे) प्रवेश केला. एकूणच इच्छुकांची संख्या लक्षात घेता सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना सर्वांचे समाधान करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सोमवार व मंगळवार हे दोन दिवस राजकीय घडामोडींच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या, सोमवारी कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या वेळी मोठ्या प्रमाणावर शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे.
घालमेल आणि पक्षांतरे
मुदत संपत आल्याने उमेदवारी जाहीर न झालेल्या इच्छुकांमधील घालमेल वाढली आहे. उमेदवारी न मिळालेले अन्य पर्यायांचा विचार करीत आहेत. उमेदवारीसाठी दुसऱ्या पक्षाचा झेंडा हाती घेण्यासाठी सर्वच पक्षांमध्ये गर्दी वाढली आहे. भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता मावळल्याने दिवंगत आमदार राजेंद्र पटणी यांच्या मुलाने राष्ट्रवादीत (शरद पवार) प्रवेश केला. विविध पक्षांमधील इच्छुकांचा दिवसभर अशाच पद्धतीने प्रवास सुरू होता.
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ

























Subscribe to my channel




