मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?

Nashik :भोंदू अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस गंभीर होत असून दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात आता माजी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचं नावही जोरात चर्चेत आहे.

अशोक खरात याच्याविरोधात अनेक महिलांनी लैंगिक अत्याचाराच्या तक्रारी दाखल केल्या असून, या प्रकरणात मोठं रॅकेट असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. काही राजकीय व्यक्तींसोबतचे फोटो समोर आल्यानंतर या प्रकरणाला आणखी वेगळं वळण मिळालं आहे.

 

दरम्यान, रुपाली चाकणकर यांना सहआरोपी करण्याची मागणी जोर धरत आहे. त्यांच्यावर हवाला व्यवहारात सहभाग, दुबईला मोठी रक्कम पाठवल्याचा संशय आणि जमीन व्यवहारात भागीदारी असल्याचे गंभीर आरोप केले जात आहेत.

एसआयटीकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, चाकणकर यांना नोटीसही बजावण्यात आली होती. मात्र, तब्येतीचं कारण देत त्यांनी यापूर्वी चौकशीला हजर राहणं टाळलं होतं. त्यामुळे त्या कारवाईपासून दूर राहत असल्याची चर्चा रंगली आहे.

आज त्या चौकशीला हजर राहणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सुषमा अंधारे आणि रुपाली ठोंबरे पाटील यांनीही चाकणकर यांच्यावर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *