
Pune : पुण्यातील वाकड परिसरातून हत्येची खळबळजनक घटना समोर आली आहे. मित्राने मैत्रीमध्ये विश्वाघात केल्याने एका मित्राने दुसऱ्याची हत्या केल्याचं प्रकरण समोर आलं. आपल्या पत्नी सोबत अनैतिक संबंध ठेवल्याचा संशय असल्याने सोबत काम करणाऱ्या पेंटर मित्राला सिमेंटच्या ब्लॉकने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हत्या केल्यानंतर आरोपी पती पसार झाला होता. याप्रकरणी वाकड पोलिसांनी आरोपीच्या गावी जाऊन त्याचा शोध घेत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. १० सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास काळेवाडी फाटा ते तापकीर चौक रस्त्यावरील धनगरबाबा मंदिराजवळ ही घटना घडली होती.
अली अन्सारी असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. याप्रकणी वाकड पोलिसांनी आरोपी बाळू विठ्ठल साळवे (३२, रा. श्रीनगर कॉलनी, रहाटणी. मूळ रा. केसापुरी, माजलगाव, बीड) याला १२ तासांत अटक केली आहे.
|
|
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी काळेवाडी फाटा ते तापकीर चौक रस्त्यावरील धनगरबाबा मंदिराजवळ अंदाजे ३५ वर्षे वयाचा पुरुष बेशुध्द अवस्थेत पडल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली होती. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांना रक्ताच्या थारोळ्यात एक मृतदेह आढळून आला. पोलिसांनी परिसरात चौकशी करून अली अन्सारी अशी मृत व्यक्तीची ओळख पटवली. तसंच तो पेंटर असल्याचंही पोलिसांना समजलं.
दरम्यान, गुन्हा उघडकीस आणण्यासाठी तपास पथकातील अधिकारी, अंमलदार यांच्या दोन टीम तयार करण्यात आल्या. दोन्ही टीमने अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला. प्रत्यक्ष साक्षीदार, घटनास्थळ आणि आजूबाजूच्या सीसीटीव्ही आणि गोपनीय माहितीच्या आधारे अली अन्सारी याच्या सोबत काम करणारा बाळू साळवे (रा. रहाटणी फाटा) याने ही हत्या केल्याचं समोर आलं.
त्यानुसार, पोलिसांनी रहाटणी परिसर पिंजून काढत आरोपीचं घर शोधून काढलं. आरोपीच्या पत्नीकडे पोलिसांनी विचारपूस केली असता तिने आपला पती घरी आलाच नसल्याचं सांगितलं. त्यानंतर तांत्रिक माहितीच्या आधारे बाळू साळवे हा मूळ गावी गेल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर एका पथकाने थेट बीड गाठलं. आता मूळ गावातून आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून वाकड पोलीस पुढील तपास करत आहेत.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती




























Subscribe to my channel


