Nashik : ऑफिस बॉय नीरज जाधव स्वतःहून माझ्याकडे आला नाही, समोरासमोर चौकशीदरम्यान खरातचा वेगळा दावा

Nashik : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणातील चौकशीदरम्यान नवीन खुलासे होत आहेत. विशेष पोलीस तपास पथकाने (SIT) अशोक खरात आणि त्याच्याकडे ऑफिस बॉय म्हणून काम करणाऱ्या नीरज जाधव यांची समोरासमोर चौकशी केली. या चौकशी दरम्यान खरातने खळबळजनक दावा केला आहे की, “नीरज जाधव स्वतःहून माझ्याकडे आलेला नाही, त्याला पूर्वनियोजित कट रचून ऑफिस बॉय म्हणून पाठवले गेले आहे.”

या दाव्यामुळे प्रकरणाच्या तपासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नीरज जाधव सन २०१९ ते २०२४ या काळात खरातच्या कार्यालयात काम करत होता आणि त्याला एका वर्तमानपत्रातील जाहिरातीच्या माध्यमातून अत्यंत कमी पगारावर कामासाठी नेले गेले होते.

सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे, तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने खरातचा दावा बनाव असल्याचे म्हटले आहे. समितीच्या मते, तपासाची दिशा भरकटवण्यासाठी खराताने हा दावा केला असावा. त्यांनी याबाबत आधी कार्यालयात काम करणाऱ्या दहा कर्मचाऱ्यांवर सखोल चौकशी करण्याचीही मागणी केली आहे.

एसआयटीच्या चौकशीत आता हा दावा तपासला जात आहे की नाही आणि खरातकडे नीरज जाधव काम करण्यामागे खरोखर पूर्वनियोजित कट होता की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *